माझ्या आठवणीच तुझ्या सोबती…
माझ्या आठवणीच तुझ्या सोबती…

1 min

591
बांधूनी शिदोरी नेईन
तुझ्या सहवासाच्या स्मृती
नसेन या जगी मी जेव्हा
माझ्या आठवणीच तुझ्या सोबती…
वाटलंच तुला कधी एकटं
तर पाने पलटव कवितेची
संवाद साधीन त्यातूनी
सांगेन हालहवाल या लोकी….
मला एकटं वाटलं तर
येईन मी तुझ्या स्वप्नात
थांबेन मी तुझ्या उशाशी
झोपवेन तुला गात गीत….
जाताना उठविणार नाही
पहाटेच्या साखरझोतून
पण, पुन्हा नक्की येण्याची
हमी देऊन जाईन…
– देवनाथ गंडाटे