लेखन द्या मह्या हातात
लेखन द्या मह्या हातात


लेखन द्या मह्या हातात
बाबा! लेखन द्या मह्या हातात
तुटक्या आयुष्याला शिवेल मी
शाळा शिकीन लै मोठा होईल
चीर पडक्या भिंती रंगवेल मी
धो धो दारिद्र्याच्या पावसातही
कुठे अडुसा शोधेल मी
चिंधक्या जोडलेल्या अंगाला
अभ्यासाचा पदर जोडेल मी
बाबा! तुझ्या फाटक्या भेगांना
अभिमानाने भरेल मी
थबकनाऱ्या घामाच्या धारेला
बेमुदत रिक्त करेल मी
माई उपाशी आज झोपली तु
उद्याची पहाट शिजवेल मी
पुस्तकाच्या सातबाऱ्यात
आपलं घर सजवेल मी...!