पण माणूस बरा भला होता..!
पण माणूस बरा भला होता..!
1 min
532
झाली होती गर्दी कुणाच्या मौतीची
एकजण सांगत होता मोठ्या बात्या सौतीची
कुठे हशा पिकला होता
कुठे घसा सुकला होता
पण माणूस बरा भला होता
आला होता अंतेला
घेऊन घरून घाई
पोरं रडत होती कुठे घेऊ सई
रडल्या रडल्या मेल्यागत झाली होती बाई
पण गर्दी कशाची कळल्यागत कळेना
कधी तरी भेटले होते पाहुणे एकमेकांना
रात्री बसणार होते दुःखात
झिंगणार होते मद्यात
हा खरच शोक होता की शौक
तो गेला होता
पण माणूस बरा भला होता..!
