STORYMIRROR

Dr.Sandesh M. Satpute

Tragedy

4  

Dr.Sandesh M. Satpute

Tragedy

वाह रे लेका..!

वाह रे लेका..!

1 min
634


पोरगा बापाला विचारतो तुम्ही काय केले माझ्यासाठी?

बापाला सांगता येत नाही

हिशोब नसतो कशाचा

धोधो रडतो रांगडा बाप

तरी पोराच्या कौतुकाला नाही माप


माईनं स्वतःच्या पोटाला आढी पाडून

जनलं ज्याला

तिला म्हणतो नाय जमलं तुला मला पोसाला..!

सगळं अर्ध एक होतं नव्हतं

पोऱ्याच्या नावावर उतरवलं

खरचं आता कुठून पोसायचं?

रगरगत्या धास्तीनं कसं सोसायचं?

दोन दमडीचं आयतं जगणं जगणारं

तायटीत बाप काढतो चार चौघात

तेव्हा उधार आयुष्य कुठून आणायचं

जेव्हा धगधगता श्वास ही दम तोडतो

आणि लेक म्हणतो कसली कमी नाही पडू दिली मह्या बापाला....!










Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy