आई तुझ्या नावा वाणी
आई तुझ्या नावा वाणी
आई तुझ्या मूर्ती वाणी
नाही जगी मूर्ती कोणी
शोधू किती छबी तुझी
तुज सम दुजी कोणी
ठेच लागता जीवनी
कळ जाणते आतूनी
भय काळाचे जे मनी
दुर पळे स्वत:हूनी
आई तुझ्या नामा वाणी
दुज नसे संजीवनी
दुख सरे भार हरे
अश्रु जपे भाव मनी
तुझ्या चरणाचा स्पर्श
लाभे मोद अंतर्मनी
नित्य लाभो आशिर्वाद
आई तुझ्या या चरणी
सुख नांदते अंगणी
दारी तुळस चंदणी
आई तुझ्या मुर्ती वाणी
सुगंधित चैत्य मुनी
आई ती मर्म जननी
मोह माया विसरुनी
अपत्यावरी काळ येता
जीव टाकी ओवळूनी
