STORYMIRROR

Piyush Lad

Tragedy

4  

Piyush Lad

Tragedy

दुष्काळी शेतकरी...!

दुष्काळी शेतकरी...!

1 min
836

का रे तोडली तू आभाळाशी जमिनीची नाळ

सारून गेला सारा काळ तरी सुनंच आभाळ


फळ म्हणून पडे फक्त त्याच्या झोळीत दुष्काळ 

कुठे लिहिलं भाग्य तू त्याचं रितंच कपाळ


कसे जमवेल धन लग्नावयाच्या त्या पोरी

नाही साठवलेलं काही त्याची कोरीच तिजोरी


सुन्या आभाळासोबत डोक्यावर त्याच्या कर्ज 

त्याने फुटक्या नशीबा किती वेळा द्यावा अर्ज.....?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy