तुझं माझ्यावर झालं प्रेम राव
तुझं माझ्यावर झालं प्रेम राव
तुझं माझ्यावर झालं प्रेम राव
मित्रांनी असंच जोडलं माझं नाव
साऱ्या गावात चर्चा रंगली राव
पाटलांची पोरंगी पटवली राव
माझी हवा झाली राव......
असं कस काय घडलं तुझ्यावर आधी गावं तुटून पडलं
मलाच तु पसंत केलं बाकीच्याना का नाकारलं
तुझ्यापायीं माझ्या घरला कळलं
पाटलाच्या पोरांनी माझ्या बापादेखत
मलाच मारलं तुझ्या मनाला खूप दुःख झालं राव....
तुझं माझ्यावर झालं प्रेम राव
मित्रांनी असंच जोडलं माझं नाव
साऱ्या गावात चर्चा रंगली राव
पाटलांची पोरंगी पटवली राव
असं विपरीत घडलं कसं राव.....
तुला पाहिल्याशिवाय दिवस जातं नाहीं
तुला भेटल्याशिवाय जेवण जातं नाहीं
तुला पाहून हि मन भरत नाहीं
कॉलेज मध्ये लक्ष लागतं नाही
तुझ्या साठी नापास झालं राव.....
तुझं माझ्यावर झालं प्रेम राव
मित्रांनी असंच जोडलं माझं नाव
साऱ्या गावात चर्चा रंगली राव
पाटलांची पोरंगी पटवली राव
माझी अक्कल बंद झाली राव.....
तुझ्या घरच्यांनी माझ्या घरी येऊन दम दिला राव
माझ्या घरच्यांशी बोलू नाही दयाचं राव
तुझ्या शिवाय मला करमत नाहीं राव
एकदा मला तुला भेटू दे की राव
पाटलांनी इतका मारलाय राव
सार गंमत बघत बसलय गावं.....
अख्य शरीर तुझ्या प्रेमात सुजलय राव....
माझ्या घरच्यांनी हुसकावून दिलंय राव
मित्र माझ्या पासून पळत सुटले राव
माझ्या पायी तू घाबरु नको.
थोडा वेळ दे तु राव
तुझ्या घरच्यांना तू सांगून टाक
माझं तुझ्यावर खरंच प्रेम आहे
आपलं लग्न लावून दे राव....
तुझं माझ्यावर झालं प्रेम राव
मित्रांनी असंच जोडलं माझं नाव
साऱ्या गावात चर्चा रंगली राव
पाटलांची पोरंगी पटवली राव
पाटलाच बदनाम झालं नावं....
मित्रांनी बनावं केलाय राव...
खरंच पाटलाच्या पोरीचं ह्याच्यावर झालं प्रेम राव
पाटलाच्या समोर लग्न झालं राव
शेवटी पाटील रडला राव..
पाटलांनी दोघांना आशीर्वाद दिला राव....

