यश म्हणजे काय
यश म्हणजे काय
यश म्हणजे काय..!
तहान ज्याला लाटेची असते
थेंबाने त्याच पोट भरत नाही
हरणार तो अनेकदा, पण
जिंकल्याशिवाय रहाणार नाही
ही म्हण सर्वांनी ऐकलेली आहे. यश म्हणजे काय तर एखादी गोष्ट ठरवून मिळवणे. आपण ठरवलेले धैर्य पूर्ण करणे म्हणजे यश मिळवणे होय. यश नेहमी वैयक्तिक असते. आपल्याला किंवा प्रत्येकाला वेळ ही सारखीच मिळत असते. पण मिळालेल्या वेळेचा जो योग्य वापर करतो तोच यशस्वी होतो. जेव्हा तुम्ही तुमचे ध्येय, उद्दिष्ट गाठता तेव्हा यश मिळते. जे यशस्वी आहेत त्यांनी त्यांच्या जीवनात आणि करिअरमध्ये त्यांच्या सर्वात मोठी इच्छा साध्य करण्यासाठी काम केलेल असते किंवा सध्या ते त्या क्षेत्रात कार्यरत असेलही पण यशाचा अर्थ काय याविषयी व्यक्तींना अनेकदा भिन्न समज असतात. यश ही अशी गोष्ट आहे की ती केवळ आपली आपणच अनुभवू शकतो आणि जर आपल्याला जगाला आपला आत्मविश्वास सिद्ध करावयाची गरज भासत असेल तर याचा अर्थ आपल्यात आत्मविश्वास नाही. कारण एखादी गोष्ट सिद्ध करण्याची किंवा यश म्हणजे काय हे समजून घेताना माणसाच्या मानसिकतेचे दोन प्रकार समजून घ्यावे लागेल. जिथे यशाची वृत्ती आणि पराभूतीची किंवा पराभवाची भीती असते. मनासारखे यश मिळणे किंवा कितीही प्रयत्न करूनही अपयश पदरी आले तरीही जो मनातून ठरवतो तो सतत विजेताच रहातो. तो विजेता स्वतःला मानतो. जर वृत्ती पराभूतीची असेल तर कितीही यश मिळवले तरीही अशी माणसे स्वतःला पराभूतच समजतात. कधीही आनंदी होत नाही. समाधानी होत नाही. स्वतः चांगली काम करत नाही. इतरांवर प्रेम करू शकत नाही. इतरांच्या कामी पडत नाहीं. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी काय करायला हवे. तर केवळ आपण परीक्षेत चांगले मार्क्स मिळवून, चांगली नोकरी मिळणे, किंवा स्वतःच्या बळावर भरपूर पैसे मिळवने असं म्हणता येत नाहीं. नोकरीं, पैसे, चांगले मार्कस म्हणजे खरं यश नसतं. यश ही वृत्ती आहे. ती पास, नापास, मार्क पैसे यावर अवलंबून नसते. जीवनातील यश आणि शाळेतल यश याचा काही संबंध नसतो. तुम्ही भरपूर शिकले. भरपूर पैसा कमावला. स्वतः जवळ गाडी, बंगला, सर्व येशो आराम असूनही बरीच माणसे हें समाधानी दिसून येत नाहीं. असं का तर त्यांची इतरांबरोबर स्पर्धा सुरु असते. इतरांकडे ज्या सुखसुविधा आहे त्या आपल्याकडे ही असावं. ही भावना मनाला समाधानी राहू देत नाहीं. सतत मनात इतरांना घेऊन पुढे जाण्याची पैज लागलेली असते. मात्र आपण जे काम आपल्याला मनापासून करायला आवडते ते काम करत असतांना जो आनंद मिळतो. जे समाधान मिळते, ते म्हणजे आपले यश आहे. मग ते शिक्षणाबद्दल असू शकते, निवडलेल्या बिझनेसबद्दल किंवा साहित्य क्षेत्र अशा बऱ्याच क्षेत्राचा उल्लेख आपण करू शकतो. आपल्या आवडीनुसार, आपल्या इच्छेनुसार आपण कार्य करत आहोत आणि त्यात मिळणार यश आपल्यासाठी खूप महत्वाच ठरते. पण आपल्याला न आवडत्या एखादया क्षेत्रात जेव्हा पदार्पण करतो तेव्हा त्यामध्ये मिळालेलं यश हे आपल्याला समाधानकारक ठरत नाही. आपल्याला त्यामध्ये कितीही यश मिळालं तरी सुद्धा आपण आनंदी राहत नाही. बरेच विद्यार्थी दहावी बारावी मध्ये 98 टक्के गुण घेऊन पास होतात मात्र म्हणाव तसे आनंदात दिसत नाही. बरेच विद्यार्थी आत्महत्या करतात. आत्महत्या करण्याच कारण म्हणजे कमी मार्क्स किंवा जास्त मार्क असे होऊच शकत नाही. कोणी तरी आपल्यापेक्षा पुढे गेलेलं आहे. किंवा या पेक्षा वेगळं ही कारण असू शकते. जीवनात जिद्द संयम आणि प्रामाणिकपणा असेल तर आपले अस्तित्व कोणी संपवू शकत नाही. पण नेमकं यश म्हणजे काय त्यांना हेच कळत नाही. यश या मध्ये आपण आपला विचार करायला हवा. आपली तुलना इतरांबरोबर करता कामा नये. आपली आवड वेगळी इतरांची आवड वेगळी हे प्रथम स्वतःला समजून सांगता आले पाहिजे. आपण आपल्या क्षेत्रात आपल्या वेगानुसार पुढे जाता आलं पाहिजे. आपला मित्र दुसऱ्या क्षेत्रामध्ये भरपूर पैसा कमवत आहे म्हणून आपणही त्या क्षेत्रात जाणार हे योग्य नाही. कारण आपला मित्र ज्या क्षेत्रात काम करतो तो त्याच्या आवडीनुसार काम करतो त्याला ते क्षेत्र आवडते म्हणूनच तर भरपूर पैसा कमवत आहे, यश मिळवत आहे. हे अगोदर आपल्याला समजलं पाहिजे. आपण आपल्या आवडत्या क्षेत्रात जेव्हा काम करतो त्यावेळी आपला आनंद हा द्विगुणित असतो आणि आपल्या कामाचा वेग सुद्धा यामुळे आपल्या कामात नीटनेटकेपणा येतो. आपल्या कर्माचा, आपल्या कार्याचा आलेख हा वाढत जातो. आपण यशाचा आपल्या प्रगतीचा विचार सुद्धा केला नाही तरी सुद्धा नकळत आपल्या वाटेला यश येते. सतत आपल्याला आवडणाऱ्या गोष्टीविषयी आवडणाऱ्या क्षेत्रांविषयी शिकत राहिलं तर आपल्या कामांमध्ये नीटनेटकेपणा कामामध्ये स्पीड सुद्धा येते. आपण आपल्या कामाच्या क्षेत्राशी व इतरांशी आपल्याला जुळून घेता येते. बऱ्याच गोष्टी शिकताना त्रास होत नाही. म्हणून सतत आपल्याला जे आवडते जे कराव वाटते. मनापासून ते आपण केलं पाहिजे आपल्या आयुष्याचे निर्णय आपण स्वतः घेतले पाहिजे. आपण इतरांच मार्गदर्शन घ्याव मात्र निर्णय हा आपलाच असला पाहिजे. त्या निर्णयावर आपण ठाम असल पाहिजे. 'यश' आपल्यापासून दूर राहणार नाही तर धावत आपल्या जवळ येईल. सवडीने नव्हे तर आवडीने आवडणारे काम केले पाहिजे.
संघर्ष सुद्धा त्यांनाच निवडतो
ज्यांच्यात लढण्याची ताकद असते
जे संघर्षाला घाबरत नाही
त्यांच्याच वाटेला 'यश' येते
©® चैताली वरघट
मूर्तिजापूर, जि अकोला
