STORYMIRROR

Chaitali Warghat

Abstract Inspirational Others

4  

Chaitali Warghat

Abstract Inspirational Others

लेख : उंच माझा झोका

लेख : उंच माझा झोका

3 mins
306


उंच माझा झोका..!


स्वप्नांच्या जाऊन नगरीत 

मनसोक्त करावं भ्रमणं 

विचारांचा उंच झोका 

जीवनास देई नवं वळणं 


आपण आपल्या आयुष्याला सकारात्मकतेची जोड दिली कीं बऱ्याच गोष्टी चांगल्या होतं जातात. आपल्या शरीराचा रंग, आपलं रूप, आपली उंची एकंदरीत संपूर्ण सौन्दर्यापेक्षा आपल्यात असलेल्या कर्तृत्वाचा रंग किंवा आपल्यात असलेल्या गुणांची छबी ही वेगळीच असते. कर्तृत्वाचा रंग, गुणांची छबी ही चिरकाल टिकणारी असते. आपल्याला उंच भरारी घेण्यासाठी आपल्या स्वप्नाना, विचारांना नवे पंख देते. यातून आपलं व्यक्तिमत्व तयार होते. उंची म्हणजे काय ? तर उच्च आणि उदात्त हे शब्द उंचीचे समानार्थी शब्द आहे. या तिन्ही शब्दांचा अर्थ उंचीच्या सरासरीपेक्षा जास्त असला तरी उंच हे त्याच्या प्रकारातील इतरांच्या तुलनेत जे वाढले किंवा उंच होते त्यावर लागू होते. उंच म्हणजे तुलनेने मोठी उंची असणे किंवा सरासरीपेक्षा जास्त उंची असलेली जेव्हा एखादी गोष्ट जमिनीपासून थोड्या अंतरावर असते तेव्हा लहान असते. जेव्हा एखादी गोष्ट जमिनीपासून जास्त अंतरावर असते तेव्हा उंच असते. पण गुरुत्वाकर्षण शक्तीचा असा नियम आहे कीं कोणतीही वस्तू वर गेली तरी सुद्धा ती जमिनीवर येणारच. ही एक शक्ती जी आपले पाय जमिनीवर ठेवते. तरीही अनेकांसाठी हे कोडं आहे. पृथ्वीवरील सर्व वस्तू पृथ्वीकडे ओढल्या जातात या आकर्षणाला गुरुत्वाकर्षण म्हणतात. पण आपल्या विचारांची उंची मात्र यापेक्षा वेगळी आहे. आपण आपल्या विचारांना आपण म्हणू त्याप्रमाणे उंच शिखरावर नेऊ शकतो. आपण एका क्षणातच डोळे बंद करून हवं तस त्या ठिकाणी भ्रमण करू शकतो. आपल्याला स्वतः जायची गरज पडत नाही. आपल्या विचारांचं मनोराज्य खूप मोठं आहे. ते सतत उंच ठिकाणी राहू शकते. उंच शिखरावर राहून संपूर्ण जग बघू शकते. इतकी ताकद आपल्या विचारात आहे. आपले विचार चांगले असायला हवे. आपले विचार समाज हिताचे असायला हवे. आपल्याला खूप मोठं बनायचं असेल तर तसे परिश्रम घ्यावे लागतात. बऱ्याच गोष्टी शिकाव्या लागणार, सोबतच वाईट गोष्टींचा त्याग करावा लागेल. दिवस रात्र आपल्या स्वप्नांसाठी आपल्याला जगावं लागेल. इतरांपेक्षा लवकर उठून आणि योग्य असं आपल्या कामाचं नियोजन आखावं लागेल. आपल्याला जे करायच आहे, आपल्याला जे बनायचं आहे, त्यासाठी आपल्याला जिथून मिळेल तेथून ज्ञान घ्यावे लागेल. आपली कमकुवत बाजू बळकट करावी लागेल. आपल्या विचारांना सकारात्मकतेची जोड द्यावी ला

गेल. मनामध्ये कोणाबद्दल द्वेष न ठेवता. किंवा इतरांचा विचार न करता आपल्याला हवं ते मिळण्यासाठी परिश्रम घ्यावे लागेल. आपले विचार उंच पातळीचे असले पाहिजे. विचारांचा झोका सतत उंच जाणारा असला पाहिजे. झोका म्हणजे काय? तर झोका म्हणजे झोपाळा किंवा पाळणा. एखाद्याने प्रेरणा द्यावी, किंवा सहजच मनामध्ये काहीतरी करण्याची उर्मी जागृत व्हावी. तशी क्रिया मनानुसार घडत असते. झोका जसा हलवला जातो. म्हणजे आपल्या आई-वडिलांनी किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींनी आपल्याला प्रोत्साहित करणे. आपली चांगली बाजू ओळखून आपल्यात असलेले चांगले गुण सांगून ते करण्यास प्रोत्साहित करणे. आणि मग आपल्यात एखादे कार्य करण्याची प्रेरणा जागृत होते. प्रेरणा ही मनाच्या विचारांचा झोका उंच नेते. मनामध्ये आनंद, चैतन्य, समाधान,आत्मविश्वास निर्माण करते.विचारांचा झोका म्हणजे आनंद. प्रेरणेचा झोका म्हणजे चैतन्य. आत्मविश्वासाचा झोका म्हणजे जगण्याचं खरं समाधान. आयुष्याला बघण्याचा झोका म्हणजे साऱ्या परिवाराचा आनंद होय. आपल्या जिव्हाळ्याची, आपुलकीची आवडती हक्काची जागा म्हणजे आयुष्याचा झोका होय.परिवाराला एकत्र बांधून ठेवणारी गोष्ट म्हणजे झोका. आपल्या आयुष्याचा, स्वप्नांचा झोका नेहमी उंच असला पाहिजे. कोणाच्या म्हणण्यावरून आपल्या स्वप्नांना बघण्याचा, जगण्याचा दृष्टिकोन बदलू नये. आपलं असणं हे आपलं अस्तित्व आहे. आपल्या स्वप्नांचा उंच मनोरा बांधणं ही आपली जबाबदारी आहे. आणि आपल्या स्वप्नांचा मनोरा प्रत्यक्षात आणणे किंवा उतरवणे हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. आपल्या विचारांचा झोका कधीही डगमगू देऊ नये. नेहमीच सत्याच्या बाजूने आपण ठाम असलो पाहिजे. एक सामाजिक बांधिलकी म्हणून सतत समाज हिताचा विचार केला पाहिजे. आपलं जगणं इतरांसाठी प्रेरणादायक ठरल पाहिजे. आपण इतरांना त्रास देऊ नये किंवा इतरांचा त्रास करून घेऊ नये. आपल्या जगण्याचा झोक्यात, विचारांच्या झोक्यात मनसोक्त आपण भ्रमन करत राहावे. सतत 'उंच माझा झोका' म्हणत रहावे..!


उंच माझा झोका 

उंच भरारी घेई

उडण्यास स्वप्नांना 

नवे पंख देई

जमिनीवरती पाय 

जरी असले माझे 

विचारांची उंची 

शिखरावरती विराजे 


©® चैताली वरघट 

मूर्तिजापूर, जि अकोला 



Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract