STORYMIRROR

Chaitali Warghat

Abstract Inspirational Others

4  

Chaitali Warghat

Abstract Inspirational Others

जीवनाचा रंगमंच

जीवनाचा रंगमंच

4 mins
248

जीवनाचा रंगमंच..!


रंगमंच म्हणजे अशी भूमी किंवा अशी जागा जेथे प्रत्यक्ष नाटकाचा प्रयोग होतो. ज्या ठिकाणी नाटकाचा प्रयोग होतो त्याला रंगमंच असे म्हणतात. पण नाट्यगृहाचे त्याच्या रंगमंचाचे स्वरूप काय असावे. रंगमंचाची रचना किंवा बांधणी कशी असावी याविषयीचा तपशील ठरलेला असतो. रंगमंचाला इंग्रजीत 'स्टेज' असे म्हणतात. स्टेज वर प्रत्येकाला परफॉर्म करावा असे वाटतं असते . यालाच मराठीत आपण रंगमंच असे म्हणतो. रंगमंचा विषयक कल्पना सतत बदलत गेलेल्या आहेत. नाटक, नाट्यगृह आणि रंगमंच यांचा निकटचा परस्पर संबंध आहे. रंगमंचावर नृत्य केले जातात. नाटक केले जातात. खेळही खेळले जातात. वेगवेगळ्या कार्यक्रमाचे सोहळे साजरे केले जातात.'रंगमंच' हा शब्द रंग आणि मंच या दोन शब्दांपासून तयार झालेला आहे. रंगमंच हा कलाकार किंवा कलाकारांसाठी जागा आणि प्रेक्षकांसाठी केंद्रबिंदू म्हणून काम करत असतो. प्रेक्षक रंगमंचाच्या चारही बाजूला असतात. जीवनाच्या रंगमंचाचा विचार केला तर असे लक्षात येते कीं जीवनाचा रंगमंच हा खूप वेगळा आहे, हे सत्य आहे की जीवन खरच एक रंगमंच आहे आणि त्या रंगमंचावर उपस्थित असणारे तुम्ही,आम्ही आहोत. जीवनाच्या रंगमंचावर कितीतरी अभिनय आयुष्यात करावे लागत असतात. प्रत्येक व्यक्ती स्त्री असो वा पुरुष सर्वांनाचं आयुष्यात जीवन जगत असताना आपल्या जीवनाच्या रंगमंचाचा नट म्हणून आपलं पात्र चांगल्या प्रकारे सांभाळावं लागते. जीवनाच्या रंगमंचावर रोज अभिनय करावा लागतो. प्रत्येक व्यक्तीला आपल्या धैर्यापर्यंत पोहोचण्यासाठी सतत संघर्ष करावा लागतो. व्यक्तीला जीवनाच्या रंगमंचावर अभिनय करत असताना कधी माया, प्रेम, दया दाखवावी लागते. तर कधी गुन्हेगारी, कोणाची फसवणूक ही करावी लागते. प्रत्येक व्यक्ती हा महत्वकांक्षा बाळगत सतत धडपडत असतो. रंगमंचावर असणारे अनेक व्यक्ती हे रंगीत असतात. कोण, कधी, कसा आणि केव्हा रंग बदलेल हें सांगता येत नाही. जीवन हे एक रंगमंच आहे आणि या रंगमंचावर आपण रोज कसे वागलो, कसे बोललो, कसे राहतो हे सगळे एका अभिनयाच्या स्वरूपात करत असतो. आपला अभिनय बघणारा डायरेक्टर प्रत्येकांच निरीक्षण करत असतो. कोणाचे कर्म कसे आहे हें बघून किती पाप पुण्य द्यायचे हे आपलं निरीक्षण करणारा डायरेक्टच्या हातात असते. म्हणून या रंगमंचावर पापाचा भागीदार होऊ नका. सत्य बोला, खोटे बोलू नका, कोणालाही फसवू नका, स्वतःशी इतरांशी प्रामाणिक राहा. जिथे आपल्यासोबत वाईट होत असेल तिथे चांगले वागून फायदा नसतो. म्हणून जशास तसे रहा. जीवनाच्या रंगमंचावर आजूबाजूचे प्रत्येक जण आपले मित्रपरिवार, नातेवाईक, तर बरेच अनोळखी आहेत. पण ते आपले नसतात. प्रत्येकाला स्वतःची पडलेली असते. म्हणून आपण सर्वात अगोदर स्वतःवर प्रेम करावे, स्वतःच्या अस्तित्वावर सर्व साध्य करण्याचा, मिळण्याचा प्रयत्न करावा. कोणावरही अवलंबून राहू नये. सहकार्य भावं निरंतर मनात असावा. अडचणीत असणाऱ्या, दुःखात असणाऱ्या लोकांना मदद करावी, आपली सहकार्य वृत्ती असावी. आणि शेवटी काय तर जीवन हे रंगमंचा सारखे आहे. आणि रंगमंच म्हणजे जीवन आहे. रंगमंचावर जशी सुरुवात होते आणि शेवटही होतो. तसेच जीवनाच्या रंगमंचावरही सुरुवात होते आणि शेवट सुद्धा असतो. दोन्हीकडे प्रवेश केल्यावर रचनेनुसार प्रत्येकाला आपले विचार ठेवावेच लागतात.आणि हे जर जमत नसेल तर वेळे आधीच बाहेर पडावे लागते, निघावं लागते. दोन्हीकडे प्रवेश केल्यानंतरच आपल्याला समजते,कळते अपल्यासोबत असलेले पात्रेही. मग, भले आपल्याला कितीही एखांद पात्र आवडलेले नसले तरीही त्याचा स्वीकार करावाच लागतो आणि यातच आपण समाधानी आहोत हे समजून अभिनय करावाचं लागतो. दोन्हीकडे भूमिका आणि भूमिकेची लांबी ही ठरलेली असते. त्यात बदल करणे अशक्य असते दोन्हीकडेही आपली भूमिका संपली की त्यानंतर क्षणभर तेथेही थांबता येत नाही हें अटळ असते. म्हणूनच जीवन हे रंगमंच आहे आणि आपले जगणे हे संपूर्णता कोणाच्या एका दर्शकांच्या हातात असते असे म्हटले जाते. पण एक सत्य हें ही आहे कीं रंगमंचात अभिनय सादर करतांना आपल्याला अगोदरच संपूर्ण माहिती असते. आपल्याला काय करायचे आहे. आपली भूमिका, आपला पोशाख, आपल्याला काय बोलायचे आहे. एकांदरीत संपूर्ण माहिती आपल्याला मिळालेल्या अपल्या पात्राबद्दल, भूमिकेबद्दल असते. जीवनाच्या रंगमंचाचे तसे नाहीं, येथे आपली भूमिका कोणती, काय बोलायचे, काय करायचे, शेवट कसा होणार. थांबायचे कोठे आहे हें ठरलेलं नसते. जे पात्र येईल ती भूमिका करावी लागते. सर्व काही जीवनाच्या रंगमंचावर अनोळख असते. जस जसे पुढे पुढे आपण पाऊल टाकत चालत जातो तसे नवे वळणं येत रहातात. अपल्या मनानुसार निर्णय घेऊन किंवा कोणाचे तरी मार्गदर्शन घेऊन मार्ग निवडून पुढे चालत रहावं लागते. किती तरी आपुलकीचे भाव, भावना मनी रुजवून जीवनाचा सुख दुःखाचा प्रवास न थकता पूर्ण करावा लागतो. अनोळखी लोकांच्या सहवासात रमुन जावं लागते. जे मिळालं ते चांगल म्हणत आनंद मानावा लागतो. मनाच्या विरुद्ध काही झाल्यास स्वतःमध्ये सहन करण्याची ताकद, हिम्मत ही ठेवावी लागते. अपयशावर मात करावी लागते. अपल्या यशाचा मार्ग शोधावा लागतो. सतत हसत खेळत रहावं लागते. जीवनाच्या रंगमंचावर समाधानी जीवन जगावं लागते.


जीवनाच्या रंगमंचावर 

हतबल होऊन कसे चालणार 

रंगमंच ठरलेला असतो 

जीवनाचा कळलेला असतो 

शेवट जरी सारखा असला 

एक असलेला माहिती 

तर, एक अनोळखा असतो


©® चैताली वरघट 

मूर्तिजापूर, जी अकोला 



Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract