STORYMIRROR

Chaitali Warghat

Abstract Inspirational Others

4  

Chaitali Warghat

Abstract Inspirational Others

बाबांच्या आठवणीत..!

बाबांच्या आठवणीत..!

4 mins
234


बाबांच्या आठवणीत..


आपल्या बाबाचा आशीर्वाद

आपल्या डोक्यावर असावं 

बाबांच्या छत्र छायेत 

मुलांनी आंनदात जगावं 


ज्या तारखेस एखाद्याचे निधन झाले असेल. ती तारीख दरवर्षी पुण्यतिथी म्हणून साजरी केली जाते. याचं तिथीला दिवंगत आत्म्याला भावपूर्ण आदरांजली अर्पण केली जाते. ज्या तारखेला एखाद्याचे निराकरण केले असेल ती तारीख पुण्यतिथी म्हणून साजरी केली जाते. पुण्यतिथी म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूची जयंती. सतपुरुषाची अथवा थोर व्यक्तींची दरवर्षी येणारी मृत्यूतिथी यास पुण्यतिथी व स्मृतिदिन असे म्हणतात. दरवर्षी मग त्यांच्या आठवणीमध्ये स्मृतिदिन हा साजरा केला जातो. आपल्या जवळच्या व्यक्तीच अचानक आपल्यातून निघून जाणं. आपलं जगणं खूप त्रास दायक करून जाते. मनातून एकच आवाज निघतो, कीं का ? इतक्या लवकर आमच्यातून तुम्ही निघून गेले. जर वडील असेल तर वडील नावाचे छत्र जोपर्यंत डोक्यावर असते तोपर्यंत मुलांना जीवनात कोणत्याही गोष्टीची झळा बसत नाहीं. पण ज्या दिवशी या छत्राची सावली हरपते त्या दिवशी जीवनात या जगात चटक्याची जाणीव होते.आपल्या जवळची कोणतीही व्यक्ती असू शकते. पण वडील असेल तर जगणं म्हणावं तस अगोदर सारखं सोपं रहात नाहीं. आधार सुटतो. जीवाची घालमेल होते. काय करावं हें सुचत नाहीं. मानसिक संतुलन बिघडून जाते. त्या दुःखद प्रसंगातून बाहेर निघणे म्हणावं तस सोपं नसते. कोणालाही आपण आपलं दुःख दाखवू शकत नाही किंवा सांगूही शकत नाही. फक्त डोळ्यातून आठवणींचे अश्रू वाहतात. आपल्याला जन्म देणाऱ्या वडिलांचा आधार सुटला म्हणून आपण रडत असतो. वडील मृत्यू पावले, खूप मोठा डोंगर कोसळतो मनावर. आणि हा मनावरचा डोंगर बाजूला करून कसं धीट उभं राहावं हेच सुचत नाही. वडिलांच्या नसल्यामुळे घराच घरपण हरवून जाते. घरात असणाऱ्या माणसांची संख्या त्यांच्या जाण्याने कमी जाणवते. मनाला कितीही सांगितलं तुम्ही आमच्यातच आहात म्हणून तरीही ती पोकळी मात्र भरत नाहीं. खालीपण शेवट पर्यंत कायमचंच रहाते. रोज सोबत बसून आपण सर्व जेवण करतो तेव्हा ती जागा खाली खाली वाटायला लागते. जीवनाच सत्य हे एकच आहे. जन्माला आलेला व्यक्ती याचा मृत्यू हा अटळ आहे. आपल्याला लहानाचं मोठं करत असताना आपल्या वडिलांनी आपल्याला घेऊन कितीतरी स्वप्न बघितलेली असतात. आपल्या शिक्षणासाठी पै पैसे जमवतात. बऱ्याच गोष्टीची काटकसर करतात आणि आपल्या भविष्यासाठी नियोजन आखून ठेवतात. आपलं शिक्षण, आपल्या संपूर्ण घरातील व्यक्तींना सांभाळण्याची जबाबदारी ही वडिलांवर असते. आपला खर्च, आपल्या मुलींच्या लग्नात होणारा खर्च, आपल्या मुलांच्या गरजांचा विचार करून नियोजन केल जाते. अगदी पैसे देऊन भाड्याने रहाण्यासाठी घेतलेल्या घरापासून सुरू झालेला प्रवास हा स्वतःच्या हक्काच्या घरापर्यंत सुरू असतो. मुलांना स्वतःच्य घर मिळाव. त्यांचं स्वतःच हक्काच घर असाव. ही एकच इच्छा ते जिवंत असतांना असते. वडिलांची यासाठी पैसा जमवण्याची धडपड सतत सुरु असते. सुट्टीच्या दिवशीही ते कामावर जातात. मुलगा मोठा होणार आता मुलाला सायकल पाहिजे म्हणून ते सायकल घेऊन देतात. पुढे मुलांना चालवायला दोन चाकी गाडी लागेल म्हणून पैशाची जमवा जमव बाबा करत असतात. मुलगी मोठी होत आहे, मग तिच्या लग्नाची काळजी

सुरु होते. अगोदर तिने भरपूर शिक्षण घ्यावं. मुलीवर चांगले संस्कार व्हावं या साठी तिच्या बरोबर व्यवस्थित बोलल्या जाते. तिला आदरांनी बोलणं शिकवल्या जाते. मोठ्यांचा मान राखायला सांगितलं जाते.वडिलांना मुलीची जास्त काळजी असते. कारण ती दुसऱ्यांच्या घरी जाणारी असते. आई वडील मुलीला कशाची कमी पडू नये म्हणून तिच्या आवडीनुसार कपडे घेतात. सॅंडल तिच्या आवडीची घेतली जाते. एकंदरीत तिच्या मनाविरुद्ध मात्र काहीही घरात होत नाही. मुलीचे संपूर्ण लाड पूर्ण केले जातात. घरातील कर्ता व्यक्ती म्हणजे वडील. आपले बाबा आणि आपल्या बाबांचं मन हे खूप मोठं असते. बाबांचा चेहरा दिसायला अगदी साधा, सदैव हसरा असतो आणि स्वभावात ही साधेपणा असतो. बाबा घरातील सर्वांनसाठी ते प्रिय असतात. पण ते नसतांना, ती वेळ काही केल्या जात नाहीं. जसे ढग जमतात पण पाऊस पडत नाहीं. आठवणी येतात पण बाबांचा चेहरा दिसत नाही. अशी मनाची अवस्था होऊन जाते. बाबांना कित्येकदा आपण दुःख लपवताना बघितलेलं असते. बाबा सर्वांच्या सुखासाठी झटतांना आपण बघितलेलं असते. फाटलेला खिशा शिवतांना आपण बघितलेलं असते. त्यांची चालून चालून झिजलेली चप्पल पाहिल्यावर आपल्याला त्यांची आपल्यासाठी केलेली काटकसर दिसते. पायातली चप्पल तुटेपर्यंत ते नवीन चप्पल विकत घेत नाही. अंगातली बनियान सुद्धा फाटून जाते मात्र ते त्याकरिता पैसे खर्च करत नाही. आपला जन्म झाला तेव्हापासून आपण आपल्या बाबांना आपली संपूर्ण काळजी घेतांना बघितलेलं असते. दुनियेच्या वाटांवर बाबा एकटेच चालत असतात. लेकराच्या भविष्यासाठी कबाळ कष्ट करून घाम काढताना दिसतात. सूगंधी मखमलीत फुलांनी बाबा मुलांच भविष्य सजवतांना दिसतात. गमतीजमतीच्या गोष्टींमध्ये बाबा जिवलग मित्रा सारखी साथ देतात. चुकल तरीही बाबा संमजवून सांगत असतात, आपल्याला मार्गदर्शन करत असतात. बाबा आपल्यासाठी सर्व काही असतात. बाबा आपल्या जीवनाचे सुंदर पर्व असतात. आपल्याजवळ सर्व काही असलं याची जाणीव जरी असली तरी सुद्धा बाबा नसल्याची उणीव मात्र कायम राहते. बाबा गेल्यानंतर बाबाचे आणि आपले नाते कधीच तुटत नाही. बाबा जरी दिसत नसले तरीही बाबा मात्र आपल्या मनामध्ये कायमचे असतातच. बाबाचे आणि आपले संबंध मिटत नाही. जसे झाडाचे खोड हे फांद्यांना आधार देत असते तसेच बाबांचं रक्त आपल्या अंगात असते. बाबा जरी गेले तरीही बाबा आपल्या मुलांना मार्गदर्शन आणि आधार देत असतात. पण एक मात्र खरं की हे निसर्गाचं चक्र नियमांच्य अधीन आहे आणि बदल हा एक नियम आहे. शरीर हे फक्त एक साधन आहे. आपल्यातून आपले बाबा गेले असले तरीही त्यांच स्मरण आपण केल पाहिजे. बाबांच्या प्रेमळ आणि निस्वार्थ स्वभावाची नेहमी प्रशंशा केली पाहिजे. निरोप घेतांना डोळे आपले पानावले जरी, आपल्या बाबा पेक्षा श्रीमंत माणूस या जगात नाही.


बाबा आहे 

आठवणीच गीत 

बापलेक लेकीची 

सुंदर प्रीत 

आईसारखी करतो 

मुलांवर माया 

वटवृक्षासारखी 

असते बापाची छाया 


©® चैताली वरघट 

मूर्तिजापूर, जि अकोला 



Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract