लेख : झेंडूची फुले
लेख : झेंडूची फुले
झेंडूची फुले..!
पिवळा लाल नारंगी
रंगात एकत्रित झुले
सणंसमारंभात देखणे
मानाला झेंडूची फुले
झेंडूच्या फुलांची लागवड संपूर्ण भारतामध्ये होते. झेंडूचे फुले ही पिवळ्या नारंगी लाल रंगात आपण बघितलेली आहे. झेंडूच्या फुलांचा लाल पिवळा शेठ मनाला आकर्षित करतो. झेंडूची फुले ही रंगीबेरंगी एकत्रित दलांनी जुळवून तयार झालेली फुले आहे. झेंडूच्या फुलांनी बाग आकर्षण दिसते. घरांच्या अंगणाचे सौंदर्य वाढवते. झेंडूच्या फुलांचा उपयोग सुंदर फुलांची मांडणी करण्यासाठी आणि फुलदाणी मध्ये दीर्घकाळ टिकवणाऱ्या फुलांमध्ये उपयोग केला जातो. झेंडू केवळ बागेतच सुंदर दिसत नाही तर त्रासदायक म्हणजे सुंदर नं दिसणारी बाग असेल तर बागेत झेंडूची फुलांची झाडें लावल्याने बाग सुंदर दिसते. दारिद्र दूर ठेवण्यास मदत करते. त्यामुळे बागेच्या बाहेरची जागा अधिक आनंददायक, देखणी बनवता येते. झेंडूची झाडें बागेसाठी उत्तम पर्याय आहे. मग तुम्ही त्यांना कुंडीत लावा किंवा बागेत लागा. झेंडूची वाढलेली फुले सजावटीसाठी वापरता येतात. झेंडूची फुले सुकल्या नंतर देखील सुंदर दिसतात. झेंडू सौंदर्य वाढवण्यासाठी नवीन गार्डनसाठी योग्य आहे. झेंडूची काळजी घेणे म्हणावं तसे कठीण नाहीं खूप सोपे आहे. झेंडूची झाडें मानवसाठी नेहमीच उपयुक्त आणि फायदेशीर ठरलेली आहे. त्यामुळे बाग सुंदर आणि आकर्षक दिसते आणि तसेचं झेंडूही कमी देखभाल करणारी झाडे आहे. झेंडूची झाडें लावतांना चांगली निचरा होणाऱ्या जमिनीत लागवड करावी लागते. मातीत ओलावा ठेवण्यासाठी सोबतच नियमितपणे पुरेसा सूर्यप्रकाश आणि पाणी द्यावे लागते. फुलांच्या व्यवस्थेसाठी झेंडू उत्कृष्ट आहे. झेंडू या फुलांचा उपयोग फुलांच्या माळा करणे. व्यासपीठ सजवणे. यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. जगभरातील बागांमध्ये आणि घरांमध्ये झेंडूच्या फुलांना त्याच्या ज्वलन रंग आणि आनंदी लुक साठी फार पूर्वीपासून महत्वाचे मानले जाते. झेंडूच्या फुलांनी बाग शोभिवंत आणि देखणी दिसते. झेंडूची फुले बहुउपयोगी आहे. झेंडूचे पिवळा् झेंडू आणि केशरी झेंडू असे दोन प्रकाश आहे. झेंडूची फ
ुले ही कुंडीत बागेत, रस्त्याचा दुतर्फा तसेच फुलांचा गालिचा तयार करण्यासाठी हिरवळीचा कडा सुशोभीकरणासाठी उपयोग केला जातो. झेंडूच्या फुलांची लागवड भारताबाहेर ही केली जाते. दसऱ्याच्या दिवशी झेंडूच्या फुलांचे हार तयार केले जातात. दरवाजाला झेंडूच्या फुलांचे तोरण लावले जाते. दसऱ्याच्या दिवशी वाहनांची पूजा करून झेंडूच्या फुलांच्या हार घालण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. वेगवेगळ्या सण समारंभामध्ये व दसरा दिवाळीला शोभेसाठी आणि हार पूजेसाठी झेंडूची फुले वापरतात. झेंडू हे फक्त राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात महत्त्वाचे फुल पीक आहे. फुलांच्या माळा करणे, व्यासपीठ सजवणे, याशिवाय निर्णयात्मक पुष्परचनेमध्ये बगीच्या मध्ये रस्त्याला दुतर्फा, तसेच कुंड्यांमध्ये लागवड केली जाते. झेंडूची फुले केवळ देवाच्या पूजेसाठीच उपयुक्त ठरत नाही तर त्यात अनेक औषधी गुणधर्म आहे जे बऱ्याच गंभीर रोगाशी लढण्यासाठी प्रभावी आहे. आरोग्याच्या गंभीर समस्या वर लाभदायी आहे. झेंडूची फुले रंगीबिरंगी असतात त्यामुळे फुलांच्या उपस्थितीमध्ये आपला मूड सुधारू शकते. आणि घरात आनंदी वातावरण निर्माण होऊ शकते. हार किंवा इतर सजावटीच्या मांडणीमध्ये झेंडूची फुले जोडल्याने घराचे सौंदर्य आणि आकर्षकता वाढू शकते. शांत वातावरणाला प्रोत्साहन मिळू शकते. झेंडूच्या फुलांचा संस्कृतीक, धार्मिक आणि अध्यात्मिक संस्कारांमध्ये उपयोग केला जातो. प्रार्थनेसाठी किंवा देवघरात, आंनदाचा क्षण असो किंवा दुःखाचा क्षण त्यात मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांचा वापर केल्याने त्याची पवित्रता, सुंदरता वाढू शकते. झेंडू चा वापर उत्सवासाठी सजावट म्हणून सणासाठी आपले घर सजवण्यासाठी त्याचा वापर केल्याने कुटुंब आनंदी आणि समाधानी होऊ शकते. झेंडूला एक विशिष्ट सुगंध असतो जो घराला एक आनंदमय वातावरण आणि चैतन्यदायी वातावरण देऊ शकते. वास्तू नुसार पिवळ्या झेंडूची फुले भाग्य आणि आशावाद दर्शवतात. केशरी फुले सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी अर्पण करतात. मनाला आकर्षित करतात. मुख्य दरवाज्यावर तोरण म्हणून ठेवल्यास ते शुभ मानले जातात. झेंडूची फुले ही सर्वांना आवडणारी फुले आहेत.
©® चैताली वरघट
मूर्तिजापूर, जि अकोला