चला संकल्प करूया
चला संकल्प करूया
स्वतःच्या मनाशी जो संकल्प करतो तोच सफल होतो. ही गोष्ट जवळपास सगळ्या निर्णयाला लागू होते. या सर्वांमध्ये अजून एक महत्वाची गोष्टी म्हणजे आपण वापरत असलेला आपला मोबाईल. सतत मोबाईल बघणे बंद करा. महत्त्वाच्या कामाच्या वेळीच मोबाईलची स्क्रीन ऑन करा. मोबाईल बघण्याचाही एक वेळ निश्चित करून ठेवा. मोबाईल जास्त करून आलेले कॉल घेण्यासाठी आणि कॉल करण्यासाठीच वापरा. रात्री दहा ते सकाळी सात वाजेपर्यंत मोबाईल हातात घेऊ नका. रात्री पूर्ण आठ तासाची झोप घ्या. यामुळे आपली झोप पूर्ण होणार आणि आपले आरोग्य ही चांगले राहणार. घरात सतत मोबाईल बघू नका तर खाली वेळेला एखादे चांगले पुस्तक वाचा. यामुळे घरातील मुलांनाही पुस्तक वाचण्याची आवड निर्माण होईल. तसेही मोठ्यांच अनुकरण ही लहान मुलं करत असतात. मोबाईलचे फायदे आणि तोटे सतत मुलांना सांगत रहा. आणि जास्तीत जास्त मुलांना त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे हे सांगा. नवीन वर्षाला नवा संकल्प करावा असे आपल्या मुलांनाही आवर्जून सांगा. यामुळे मुलांनाही चांगल्या सवयी लागतील. चला तर मग नवं वर्षाला संकल्प करूया आपले स्वप्नं पूर्ण करूया..!
चला संकल्प करूया
स्वप्नांना बळ देऊया
आकांक्षांची नवी शिखरे
नव्या नजरेने नव्याने पाहूया
©® चैताली वरघट
मूर्तिजापूर, जि अकोला
