यात्रा केली पाहिजे
यात्रा केली पाहिजे
आपल्या जीवनात आपण यात्रा केलीच पाहिजे. यात्रा केल्याने अपने तनमन ताजेतवाने होते आणि आपली पृथ्वी किती सुंदर आहे याची प्रचिती घेण्यासाठी आपणास भटकंती केली पाहिजे. पृथ्वी म्हणजे आपली आधारशिला अमूल्य देणी आहे. ही अद्वितीय निसर्गाने परिपूर्ण नटलेली आहे. विशाल सृष्टीच्या प्राकृतिक सौंदर्याने मनामनात स्थानापन्न झाली आहे. या प्रकृतीची किमया प्रत्येक व्यक्तिने जाणून घेतली पाहिजे. मी बहुतेक तीर्थयात्रा व थंड हवेचे ठिकाण बघितलेले आहे. मला अनेक ठिकानी सुंदर अनुभव आलेले आहे. तो शब्दात बखान करणे म्हणजे अतिशयोक्तीच होईल.
भटकंती करूनच आपणास अनुभव येऊ शकतोय. यासाठी आपल्याला सूक्ष्म नजरेची गरज आहे. तेव्हा या प्रकृतिची खरी किंमत कळेल. इथले पहाडे, नद्या, झरणे बाग-बगीचे,वृक्ष,फळे,फुले मनाला मोहून टाकतात मन आनंदाने भाव विभोर होते असते. या स्वच्छ निर्मळ हवेत काहीतरी जादू असल्यागत फ्रेश वार्मिंगचा अनुभव येतो. आपल्या तनामनात बदल घडून येतो फक्त आपण आपले मन उघडून निर्मळ मनाने त्या वातावरणाशी नाते जोडून वागायला पाहिजे.
मी जेव्हा दक्षिण भारतात गेले तेव्हा मला तिथली संस्कृती आणि तिथल्या लोकांची भाषा, खानपान खूप आवडले त्यांचे कष्टाळू जीवन बघून मी अचंभित झाले.
आम्ही जेव्हा सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला गेलो .आमची बस वरती पहाडावर चढायला लागली तेव्हा आम्ही सर्व आनंदाने हर्षित होऊन त्या वातावरणात पूर्णपणे रममान झालो. खूप परोपरी ने उल्हासाने टाळ्या वाजवत मजेने प्रवास आत्मसात केला.जेव्हा पहाडावर आमची बस चढायला लागली तेव्हा वातावरण स्वच्छ निर्मळ होतं परंतू जसजसे आम्ही पुढे वाटचाल करीत गेलो तेव्हा आमच्या आजूबाजूला निळसर ढगांची निर्मिती दिसत होती आम्ही त्या ढगांना जवळ पाहून आनंदाने त्यांना बोलवू लागलोत. जसजशी बस वरती जायला लागली मेघमल्हार आमच्या जवळ यायला लागली, सर्वांचे हात पाय थंडीने गारठलेली होती. इतक्या थंड वातावरणाचा कधीच अनुभव घेतलेला नव्हता त्या मेघांनी आमची हाक ऐकली होती. त्यांनी आम्हाला पूर्णपणे घेरले होते.इतके जवळ की चाहूबाजूनी घेराव टाकल्यागत वाटत होते.त्या मेघाचा रंग काळसर झाला होता. आणि चहूकडे अंधार झाला होता. गाड़ीच्या आतमधे घुसायला त्यांना जागाच नव्हती नाही तर ती आंत आलीच असती... गाडीची काच बंद असल्यामुळे ती बाहेरच घूटमळत होती. तेव्हा एकदम आंधार पडला व अंधारात आम्हाला काहीच दिसेनासे झाले आलेली वाहने सुद्धा दिसत नव्हती भर दुपारीच आम्हाला लाईट लावावी लागलीत. तेव्हा मध्येच आमची गाडी सडकेच्या कडेला थांबवली गेली. तब्बल आम्हास दोन तास त्या गारठलेल्या थंडीत मेघांच्या सानिध्यात थांबावे लागले. तो अप्रतिम सोहळा निसर्गाची किमया तो अद्भुत नजारा पाहून आम्ही सर्व यात्री भीती मिश्रित आनंदाने दंग झालोत.
तेंव्हा मेघांना आम्ही विनंती केली तुम्ही आम्हाला आता सोडून जाऊ शकता तेव्हा आम्हाला थोडा उजेड होताना दिसला आणि मेघ दूर गेल्याचे जाणवले तेव्हा आमची बस पुढे प्रवासाला निघाली. या अनुभवातून मला प्रश्न पडला के माता रेणुका इतक्या उंचावर का व कशी गेली असेल आणि तिथे कशी काय वस्ती केली असेल ? जर आज आपण प्रगति पथावर जावून देवाचे अस्तित्वच नाकारले आहे .परंतू हा निसर्ग पाहुन अंदाज येतो की ही सर्व मानव निर्मित दऱ्या डोंगरे नाहीत.आपल्याला दिसून येईल की इथे एवढ्या उंचावर साधारण मनुष्य वस्ती करू शकत नाही त्यांच्यात काहीतरी शक्ती असेल तोच अश्या ठिकाणी वस्ती करू शकतो आणि राहू शकतो.
या निसर्गाची लीला अद्भुत आहे. ही देणी मानवासाठी, प्राणीमात्रासाठी अमूल्य आहे. आम्ही तिथे खूप ईश्वराला धन्यवाद दिले आणि आनंदाने देवीचे दर्शन करून माघारी फिरलो. इतकी सुंदर निर्मिती पाहुन कित्येक दिवस ते वातावरण आणि तिथली मजा आमच्या मनात घर करून होती.
आम्ही निरनिराळे शहरे,गावे,वने,डोंगर,जंगले बघितली.
जिकड़े तिकड़े हिरवेगार बागबगीचे पाहिले. फळांनी लगडलेले वृक्ष फुलांनी लदबदलेले रंगीबेरंगी गुच्छ अति उल्लास देवून गेला.तोंडातुन वाह वाहचा लयबद्ध नाद क्या दऱ्या खोऱ्यातून सारखा निघत होता.
कित्येक प्रकारची निराळी वेगवेगळी मोठमोठी वृक्ष घनदाट जंगल त्यातले पशुपक्षी इतकी सुंदर निर्मिती पाहूण ईश्वराचे किती धन्यवाद करायचे कळत नव्हते.
मानव निर्मिती लाइटिंग मोठ मोठ्या मुर्ती,पुतळे, अभिजात कलेचा कळस सौंदर्याने गाठला होता. कला कौशल्याने नटलेले विशाल मंदिरे राजवाडे तिथल्या परंपरा,रितीरिवाज, व्यवहार, खानपान खुपच आवडले.ती भव्यदिव्य सुंदर सरोवरे, मोठमोठे खाऱ्या पाण्याचे समुद्र, खाड्या, धबधबे, धरणे, कालवे, केरीव काम केलेल्या लेण्या, मंदिरे, मज्जित,चर्च, गुरुद्वारा,भक्ती साधना योग केंद्र, किल्ले सर्वच बघण्यासारखे होते.पशुपक्षी,जंगली जनावरे एकाच स्थानावर प्राणी संग्रहालयात किंवा झू-मध्ये पहायला मिळालेत.कित्येक प्रकारची सांपाची जाति, कित्येक प्रकारची रंगीबेरंगी मासोळ्या पाहुना मन प्रसन्न झाले.
आणि तिथली कष्टाळू लोके जी काही रुपयांसाठी
मानवास डोंगरावर नेतात. पालखीत किंवा घोड्यावरती टट्टू वरती सवारी बसवून आपल्या बळावर सुखरूप
नेणे आनणे करतात.त्यांचे कष्टमय जीवन बघून मनात दुखद कालवाकालव होत असते. कूठे गरिबी कूठे खूपच श्रीमंती पाहून मनात असंख्य विचार घोळत असतात. गरीबांची डावाडोल परिस्थिति चार पैसे कमविण्या साठी त्यांची धडपड बघावे वाटत नाही. कलाकाराच्या सतत प्रयत्नाने कित्येक अद्भुत नमूने बघायला मिळाले .
किल्ल्यावरती आधीच्या राजाचे वास्तव्य होते.इतक्या उंचावर टी कशा पद्धतीने रहायची. त्यांचे अस्त्र-शस्त्र कुठे ठेवायचे या सर्व गोष्टी जाणून घेतल्या.
तिकडच्या वेगवेगळ्या कथा कहाणी किंवा किवदन्ती ऐकुन अाम्हाला आच्छर्यचकीत करायच्या.
विज्ञानाची बहु तरक्की पाहुन आपण अचंभित झाल्या शिवाय रहात नाही.मानव निर्मित विज्ञानाने अजूनच निसर्गाला देखणे व प्रेक्षणीय केले आहे. यात्रेकरूंसाठी खूप सोयी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. सरकारही सढळ हाताने खूप फंड देऊन सुधारणा करतांना दिसतात.इतक्या मोठ्या प्रमाणात आवागमनाला व्यवस्थित करण्यासाठी भरपूर विमाने, रेल्वे,बसेसची निर्मिती,कैक अन्नसत्र चालविले जातात.यात्रेकरूंसाठी सर्व सुख सुविधा मिळावी याची पूर्णतया दक्षता घेतलेली आहे. तिथल्या धर्मशाळा, हॉटेल्स, सतत चालणारे अन्नसत्र रोजची उलाढाल नीति नियमाने परिपूर्ण केलेली असते.
म्हैसूरचे वृंदावन गार्डन, तिरुपती बालाजीचे मंदिर खऱ्या सोन्याचे पाहून मन प्रसन्न होत असते. बेंगलोर सीटी, उटी, कन्याकुमारीचे विवेकानंद स्मारक शांतिचे ठिकान, मीनाक्षीपुरम, कन्याकुमारीचा सूर्योदय समुद्राच्या मधोमध भला मोठा सूर्य पाहून मन आनंदाने हर्षित होतो .तिथे सर्व ठिकाणी स्वच्छताच दिसत असते आणि ती सुरेख, सुंदर दृश्य पाहुण मनआत्मा भावविभोर होवून आनंदमग्न होवून निसर्गाचा पूरेपूर उपभोग घेत असल्याची वारंवार जाणिव होत असतेय.
मूर्तीमध्ये लागलेले हिरे-मोती जर-जवाहरात हिरे-पन्ने पाचू गोमेद इतर नगानी सुशोभित केलेले देवांचे मूर्तीरूप व भरजरी वस्त्र आणि दाग दागिने, अलंकार पाहून डोळे दिपतात .ईश्वराची तेजस्वी आभा, मोठमोठे झाड,फानूस झूमर पाहुन कैक दिवस मनात ठान मांडून बसतात.
स्वर्गापरी शोभायमान वलय आल्हादक वातावरणाची निर्मिती या सर्व गोष्टी यात्रेकरुला मोहित करीत असतात.
मंत्रोच्चारण, भजन, कीर्तन, पूजाअर्चना, स्तुति, होमहवन, पंचारती, या सौम्य सुंगधात मनुष्य ताल्लिन होत असतो. तनामनात स्फूर्ति येऊन विशेष शक्ति मिळत असते.
आपण स्व:तासाठी वर्षातून एकदा तरी 8 ते 10 दिवसाचा वेळ काढायला पाहिजे. संसाराच्या उलाढालीतून काही दिवस दूर जावून यात्रा केली पाहिजे. त्याने काय होईल की आपणास वेगवेगळा अनुभव येईल. आपल्या देशात अनेकों परंपरा रितीरिवाजाची ओळख होवून त्यांचे रहन सहन ,त्याची संस्कृती, भाषा इतर भरपूर ज्ञान मिळत असते. इतका मोठा भारत देश आहे काही प्रमाणात आपणास माहिती असावी हाच प्रामाणिक हेतू आहे. ती आपल्या राज्यात येतात आपण त्यांच्या राज्यात जावे.आणि तरोताजा होवून आणि नव्या दमाने आपले दैनंदिन कामकाज संभाळायला आनंदाने सज्ज व्हावे.