वृद्धाश्रम (अलक)
वृद्धाश्रम (अलक)
(अलक)
रामराव त्यांच्या एकुलत्या एक मुलाबरोबर, विजय बरोबर मागे मागे निमूटपणे चालत होते. मोठ्या कष्टाने पै पै जमवून त्यांनी विजयला शिकवून मोठ्या नोकरीला लावलं होतं. पत्नी सुमतीच्या निधनानंतर ते, आपला मुलगा चांगला सांभाळ करेल हा आशावाद मनात मुलाकडे रहायला आले होते. परंतु सुनबाई रोज काही न काही तक्रार करायची आणि रोज बाप लेकाचा वाद व्हायचा. शेवटी रोजच्या कटकटीला कंटाळून बापाला वृद्धाश्रमात त्यांना घेऊन निघाला. त्याचा पाच वर्षाचा मुलगा अजय खूपच हट्ट करत होता म्हणून सोबत घेतला होता.
"बरं झालं पप्पा, मी सोबत आलो नाही तर तुमच्या म्हातारपणात मलाही वृद्धाश्रम शोधत बसावं लागलं असतं." वृद्धाश्रमात पोहचल्यावर अजय बापाला (विजयला) म्हणाला.
मुलाचे शब्द ऐकताच विजय बापाला घेऊन परत घराच्या वाटेला निघाला.
