SANGRAM SALGAR

Abstract Inspirational

4.3  

SANGRAM SALGAR

Abstract Inspirational

व्हेन यु लाॅस्ट ऑटोबायोग्राफी

व्हेन यु लाॅस्ट ऑटोबायोग्राफी

7 mins
214


पुस्तकं ही ज्ञानाची भांडार असतात. आपण पुस्तकं वाचली पाहिजेत. त्यातून सर्वकाही शिकता येते, आचरणात आणता येते, फक्त वाचण्याची इच्छा जागृत झाली पाहिजे. आपण वाचन केल्यानंतर चांगल्या विचारांची टिप्पणी केली पाहिजे. आपल्या विचारात काही दोष आहेत का की नाही ते आतुरतेने जाणून घेतले पाहिजे. पुस्तक वाचल्यानंतर आपण आपल्या चांगल्या विचारांची जडणघडण दुसऱ्या चांगल्या मित्रांसमवेत, आपल्या जिवलग व्यक्तींसोबत केली पाहिजे. "पुस्तकात ज्ञान भरलेलं असतं ते अभ्यासाने वाचनाने हस्तगत होत असते " आपण त्या विचारांचे ग्रहण केले पाहिजे. पुस्तकं तुम्हाला खर्याअर्थी आयुष्य जगायला शिकवतात. म्हणायचंच झालं तर ते तुमचं जीवनच बदलून टाकतात. जे आपल्यासाठी अनमोल आहेत त्यांची आपण पूजा केली पाहिजे. प्रत्येक संस्कृतीही आपल्याला हेच सांगते. आपण वह्या पुस्तकांची पुजा फक्त दसऱ्याच्याच दिवशी करतो पण तसं न करता आपण त्यांना साधा नमस्कार तरी करावा. ह्या सर्व खटाटोपीने आपली पुस्तकांवरची श्रद्धा-भक्ती वाढते. ते आपल्याला हवीहवीशी वाटतात. आणि तीच पुस्तकं तुम्हाला अंधारातही दिवा होऊन मदत करतात.

शिर्षक वाचताच तुमच्या मनात खळबळ चालू झाली असेल. "ऑटोबायोग्राफी" म्हणजे तुम्ही स्वतः तुमच्याबद्दल लिहिलेले चरित्र. लिहायला वयाची मर्यादा किंवा कोणतीच सीमारेखा नसते. ऑटोबायोग्राफी म्हणजे स्वतःचं स्वलिखीत आत्मचरित्र. आपण आपले अनुभव, आपले विचार, आपलं बालपण, तारुण्य आपली सुख-दुःखं, अडथळे निर्मळ मनाने लिखीत स्वरूपात रेखाटत असतो. आत्मचरित्रामध्ये आपण अनुभुवलेले प्रसंग, प्रसंगीक गोष्टी मांडत असतो. आपण जेव्हा स्वतःचं आत्मचरित्र लिहितो तेव्हा आपल्याजवळ आठवणींचा खजिना असतो, अनुभवांची डायरी असते, सुख-दुःखाचे क्षण असतात आणि डोळ्यात आनंदाश्रू.

" व्हेन यु लाॅस्ट युवर ऑटोबायोग्राफी " म्हणजेच जेव्हा तुम्ही तुमचं आत्मचरित्र गहाळ करता तेव्हा. हे वाक्य जेव्हा आपण उच्चारतो तेव्हा आपल्यालाही दुःख वाटते. मेहनतीची मथुरा पाण्यात जाण्यासारखी ही पण एका लेखकासाठी ही गोष्ट आहे. असंच माझ्याही आयुष्यात झालं. माझं सध्या वय एकोणवीस आहे. काहीदिवसांपूर्वी मी एका वयस्कर व्यक्तीशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केलता. त्यांना मी आत्मचरित्र लिहीत आहे असं सांगितले पण माझ्या संभाषणाला त्यांचा नकारार्थी प्रतिसाद/ प्रतिउत्तर मिळालं. त्या व्यक्तीचं म्हणणं असं होतं की आत्मचरित्र हे उतारवयी आयुष्यात लिहावं, थोडक्यात काय तर साठीच्या नंतर. पण माझ्या मते तसं नाही. कारण साठ-पासष्ठी मध्ये आपल्या शरीराचीही घसरण व्हायला लागते. शरीर आपल्याला साथ देत नाही. आपले जेवायचेही वांदे होऊन बसतात. आणि खरंतर माणसाचा क्षणभरायचाची विश्वास नाही. आजकाल वेगवान युगामुळे काहीजण तर पन्नाशीही गाठत नाहीत. ते ह्या जगाचा निरोप घेतात. उतारवयी आपल्याला जास्त काही आठवत नसते. जवळपास जास्तीत जास्त आठवणींचा आपण विचारही करत नाही. म्हणून आपण दैनंदिनी रुपी का होईना, आपल्या आठवणींचा सुख-दुःखांचा खजिना आपण जपला पाहिजे.

माझं लहानपणीच म्हणजे प्राथमिक शिक्षण हे माझ्या गावातच झाले. प्राथमिक शिक्षण हे आपल्या उच्चशिक्षणाचा पाया असतो. तो जर का भक्कम नसेल तर आयुष्याची इमारतच ढासळते. माझ्या प्राथमिक शिक्षकांचा माझ्या आयुष्यात खूप मोठा मोलाचा वाटा आहे. त्यांचे ऋण हे न फिटणारे आहेत. त्यानंतर मी माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी जिल्हास्तरीय शाळेत प्रवेश मिळवला. माझी शाळा ही सैनिकी होती. जेव्हा खाकी सदरा अंगावर घालतो तेव्हा आपल्यामध्ये एक वेगळीच धमक, वेगळीच ऊर्मी असते. आपल्याला स्वतःचा अभिमान वाटायला लागतो. शाळेला बर्‍यापैकी शुल्क भरावी लागत असल्याने परिस्थिती चटके देत होती. बिकट परिस्थितीमुळे जास्त खर्च किंधा हट्ट पुरवण्याचा प्रश्नच आला नाही. कारण, जन्मल्यापासूनचा अनुभव साथीला होता.

"गरीबीत जन्माला येणं ही चूक नाही,

पण,

गरिबीतच शेवटचा श्वास सोडणं म्हणजे चूक आहे "

आयुष्यात खूप मोठं बनायचा आहे, नाव कमवायचं आहे. अशी जिद्द, चिकाटी, विचार घेऊन मी खेड्यातला मुलगा त्या शाळेत शिकत होतो. त्या वेळेस मला वेगवेगळे वर्गमित्र भेटले. काहींनी साथ दिली तर काहीजणांनी आपला स्वार्थ साधला. वर्गमित्रांनी दिलेला त्रास म्हणजे आपल्यासाठी वाईट गोष्ट नसती. आपण नेहमीच त्याचा सकारात्मकपणे विचार करायचा असतो. मीही तेच केलं आणि स्वतःला पोलादासारखं भक्कम बनवलं. त्या शाळेतील शिक्षक म्हणजे ज्ञानाचा खजिनाच. त्यांचा माझ्या आयुष्यात अनमोल वाटा आहे. त्यांचा मी ऋणी आहे. त्यांनी मला मूर्तीप्रमाणे घडवले. कधीकाळी मूर्तीलाही घडवताना घाव सोसावे लागतात तसेच माझ्या आयुष्यातील खूप प्रसंग आले पण जवळपास सगळेच प्रसंग माझ्या हिताचेच होते. मी शालेय शिक्षण देत असताना मला वेगवेगळ्या परीक्षांचं वेढ लागलेले. मी खूप परीक्षा दिल्या. मला त्यातून खूप अनुभव मिळाले.

मी सातवीत असताना वायुदलातील शिक्षकांनी मला दैनंदिनी लिहिण्याचा कानमंत्र दिला. आणि आजही हा कानमंत्र मी काही गरजू लोकांपर्यंत पोहोचवत आहे. हा कानमंत्र म्हणजे आपणच रेखाटलेले आपल्या आयुष्याचं अनोखं सार. मला माझ्या सुख-दुःखात त्यांनी दिलेला हा दैनंदिनीचा कानमंत्र खूप कामी आला. खऱ्याअर्थी ह्या कानमंत्राने माझं आयुष्यच बदलले.

" परिस्थिती कितीही बिकट असो

त्या परिस्थितीशी

दोन हात करण्याची धमक

तुमच्यामध्ये पाहिजे "

त्यावेळेस मला दैनंदिनी लिहिण्यासाठी साधी वहीही नव्हती पण मी मात्र माझं काम करत होतो. काहीदिवस सातत्य आलच नाही. म्हणतात ना चांगल्या गोष्टी अस्तित्वात येण्यासाठी वेळ लागतो. अखेरीस एकदाच सातत्य आले त्यात पण सुधारणा म्हणजे मी दैनंदिनी तोडक्या-मोडक्या इंग्रजीत लिहीत असे. त्याने माझ्या आठवणीही राहिल्या आणि माझी इंग्रजी भाषाही सुधारू लागली.

मला चित्रपट पाहण्याची खूप आवड होती असंच एक चित्रपट पाहिल्यावर आपणही आपली खरी कहाणी लिहावी असं मनात आलं. " एक गोष्ट दोन वेळा तयार होते एक म्हणजे मनात आणि दुसरी अस्तित्वात " तसच माझ्या आयुष्यातही झालं. त्यावेळी मी आठवीत होतो मी पुस्तक लिहिण्याच्या तयारीला लागलो. सगळ्या आठवणींचा खजिना जमा करू लागलो. जसे मला सुचत गेलं तसतसं मी लिहित होतो. मान्य आहे की माझी शब्दसंपत्ती जास्त नव्हती. पण, मला एक नवीन यशाच्या दिशेची वाट सापडलेली आणि मी एक वाटसरू होतो. अनेक वेळी निराशा जेव्हा यायची तेव्हा माझं अर्धवट पुस्तकच मला प्रेरणा द्यायचं. मला लढण्यासाठी ताकद द्यायचं. मी त्या पुस्तकाला "महासंग्राम" हे नाव दिलेलं. ते माझ्यासाठी अत्यंत जवळचे आणि प्रिय होऊन कधी गेला कळालच नाही. मी माझे विचार, सुविचार तर खऱ्याआर्थी मी माझ्या आयुष्याबद्दल लिहित असत. ह्या पुस्तकाने मला माझ्या अस्तित्वाची जाणीव करून दिली.

मी दहावीत आमच्या शाळेतून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालो. आनंद गगनातही मावणारा नव्हता. दहावी झाल्यानंतर मी पुस्तकाचे पुन्हा काम सुरू केलं. कठोर परिश्रमामुळे मला विश्वप्रसिद्ध फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश मिळाला. विविध शिक्षक भेटले प्रत्येकांनी यशप्राप्तीचा कानमंत्र देऊन एक वेगळीच प्रेरणा दिली. काही मित्र-मैत्रिणींनीही दुःखात साथ दिली. काहींचे बोल तर मनाला भावले. मनात जागा करून राहिले. जसे की, " सूर्यालाही ग्रहण लागते मग आपण कोण आहोत? " प्रत्येक दिवशी एक नवीन दिशा मिळत होती. दैनंदिनी लिहिण्याचे काम तर चालूच होते. आता मात्र शब्द संपत्तीमध्ये भर पडत होती.

विश्वव्यापी कोरोना महामारीमुळे सर्व गोष्टी सोडून घराकडे परतावे लागले. मीही त्यातला एक होतो. वाटलं नव्हतं कोरोना इतके महिने माणसांमध्ये राहील. मीही पुन्हा लगेचच दहा-बारा दिवसात माघारी येईल असं समजून थोडंच साहित्य घेऊन घरी आलो. पण, कोरोनाचा वाढता प्रसार पाहून माघारी परतणे हे अशक्यच होते. आपले साहित्य व्यवस्थित असेल की नाही याची खात्रीही नव्हती. मुख्य म्हणजे त्या साहित्यामध्ये माझं आत्मचरित्र "महासंग्राम" हे होतं.

जवळपास आत्मचरित्र लिहून झालतं, पण प्रकाशित केलं नव्हतं. त्याचं कारण म्हणजे भक्कम असे यश आलेलं नव्हतं. खऱ्याअर्थी मी नववीत असताना माझे पुस्तक माझ्या वडिलांच्या हातून वाचण्यात गेलं. पहिल्यांदाच आम्ही दोघे पुण्याला माझी एन. एल. एस. टी. एस. इ. ( NLSTSE ) ची परीक्षा देण्यासाठी रवाना झालतो. परीक्षेच्या वेळी दप्तर बाहेर वडिलांजवळ देऊन गेलतो. अचानकच त्यांनी "महासंग्राम" वाचले. खर्याअर्थी त्याच वेळी पुस्तकाचे प्रकाशन घालते. त्यांना माझा अभिमानही वाटला. ते पुस्तक जास्त कोणाला माहित नव्हतं. सगळं काही गुप्त होतं.

कोरोना लाॅकडाऊन मध्ये कशाचाही न विचार करताना मी कविता, लेख, कथा, सुविचार लिहू लागलो. जवळपास 33 पुस्तकांचा उपलेखक म्हणून लेखन केले. एक पुस्तक प्रसिद्ध लेखकांच्या सहाय्याने संग्रहित केले. तसेच दोन इंग्रजीत आणि एक मराठीत आंतरजालावर कवितासंग्रह प्रकाशित केले. जवळपास 500 वरती डिजिटल प्रमाणपत्रे मिळाली. कित्येक लेख, कविता, कथा; इंग्रजी, मराठी तसेच हिंदीतून लिहिल्या. खूप लेखकांशी मैत्री झाली. दोन राज्यस्तरीय पुरस्कारही मिळाले; राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार आणि राज्यस्तरीय काव्यभूषण पुरस्कार हे एका संस्थेमार्फत मिळाले. आयुष्यात सगळ्या काही गोष्टी सुरळीत चालू होत्या. वेगवेगळ्या विषयांचे ज्ञानही ग्रहण करत होतो. सगळ्यांचे मार्गदर्शनही मिळत होते. आता शब्दसंग्रहात खूप मोठी भर पडलेली.

जवळपास नऊ महिन्यानंतर विद्यालयात बारावीचे परीक्षासाठीचा प्रवेश भरण्यासाठी बोलावले होते. आनंदाला पारा नव्हता. 24 डिसेंबरला सकाळी सकाळी पुण्याला रवाना झालो. मित्रमैत्रिणींच्या भेटी झाल्या. प्रवेश भरण्यासाठी जरावेळ असल्याने मी माझ्या वस्तीगृहाकडे गेलो त्यांना आज माझं साहित्य घेऊन जाईल असे सांगितले. मी विद्यालयीन कामकाज उरकून पुन्हा वस्तीगृहाकडे साहित्य आणण्यासाठी गेलो. मी साहित्य ठेवलेल्या खोलीतकडे गेलो. आत जाताच एक अनोखे दृश्य पाहायला मिळाले. सर्वांचे साहित्य एकत्र ठेवलेलं. खोक्यांमध्ये साहित्य ठेवल्यामुळे लवकरच सापडेल अशी आशा होती पण तसं काही झालं नाही. सगळ्यांचे साहित्य विस्कटलेल्या अवस्थेत होतं. कोणाच्या पुस्तक, कपडे, दप्तर, इत्यादी सगळं हे न बघण्याच्याच परिस्थितीत दिसून येत होतं. दोन-तीन खोल्यांमध्ये शोध घेतल्यानंतर अखेरीस मला माझ्या साहित्याचा माघ लागला..मी साहित्य गोळा करत होतो पण, त्यातले खूप काही साहित्य सापडलच नाही. माझं आत्मचरित्र अदृश्यच होते. पहिल्यांदाच "महासंग्राम" न सापडल्यामुळे निराश झालो. निराशेनेच घरी माघारी परतलो. निराशा ही कोणत्या व्यक्तीजवळ सांगावी अशी एखादा मित्र-मैत्रिणीही नव्हती. म्हणून, पुन्हा दैनंदिनीनेच साथ दिली. माझं पुस्तक गहाळ झालय हा सल आजही मनात आहे. पण, त्याच वेळी निश्चय केला की पुन्हा " महासंग्राम- एक ध्येय वेडा प्रवास " पुस्तकाची नवीन उभारणी करू.

आपल्याला निराशा, दुःख येते जेव्हा आपल्या अत्यंत प्रिय गोष्टी हरवताय. पण, आपण खचून न जाता, स्वतःलाच दिलासा देत पुन्हा उभारणी करण्याचा निश्चय केला पाहिजे. आणि आपलं जे संकल्पित आहे ते अखेरीस पूर्णत्वास घेऊन गेलं पाहिजे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract