SANGRAM SALGAR

Inspirational

3  

SANGRAM SALGAR

Inspirational

संघर्ष

संघर्ष

10 mins
725


माझ्या प्रत्येक यशाचं खरं कारण म्हणजे माझ्या आईवडीलांचे थोर, महान संस्कार. आम्हाला लहानपणीच कुटुंबातून वेगळे करण्यात आले, आम्ही लहानश्या कडब्याच्या कोपीत राहत होतो. नवीन शिकण्याची धडपड असल्यामुळे मी अंगणवाडीच पहिलीचा पेपर दिला होता. पहिलीचा 98 टक्के गुण मिळाले दुसरीत असताना 21 पर्यंत पाढे पाठ होते. अशाप्रकारे गणिताची गोडी लागली. राष्ट्रीय सण उत्सव असले की मनाला एक वेगळचं वाटायचं. स्वतःलाच स्वतःचा अभिमान वाटायचा आणि नवीन गणवेश मिळण्याचा आनंद. प्रकाशाचे सुविधा नसल्यामुळे आणि अभ्यासाची आवड असल्यामुळे मी चिमणीच्या प्रकाशात अभ्यास करायचो. घरी एक सायकल होती तिच्या मदतीने आमची सर्व दळणवळणाची कामे पूर्ण व्हायची पण कालांतराने ती ही बाजारातून चोरीला गेली. घर छप्पराचे व पालापाचोळ्याचे असल्यामुळे घरात पावसाचे पाणी शिरायचे, खूप त्रास व्हायचा. आमच्याकडे छ्त्री, रेनकोट असा काहीच प्रकार नव्हता. मला झाडे लावण्याचा खूप मोठा छंद होता. ते त्यांची विविध अवयवांपासून खूप प्रेरणा देत. थंडीच्या ॠतूत आम्हाला ना कानाला टोपी ना स्वेटर.


मला स्पर्धा परीक्षा देण्याचा खूप नाद लागलेला. पप्पांनीही मला प्रोत्साहन दिले. मला नवोदय विद्यालयाची पुस्तके उपलब्ध करून दिली. मला भाषण देण्याची आवड होती. मी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला भाषण द्यायचो त्यातून बक्षीस म्हणून काही पैसे मिळायचे ते मी घरीच द्यायचो. लहानपणीच वडिलांनी व्यायामाचा कानमंत्र दिला, पण त्यावेळी मला कोठे करू वाटत. शिष्यवृत्ती सोबतच मी नवोदय विद्यालयाच्या परीक्षेचा अभ्यास करायचो, पण शेवटी नशीब अपयशच. जिल्हा परिषदेच्या शाळेत मी कवायतेलाही पुढे असायचो. माझं सर्वात पहिले भाषण इंग्रजीमधून होतं ते म्हणजे महात्मा फुले यांचं. आमच्या परिवारामध्ये सतत भांडण होत राहायची पण मी दुर्लक्ष करायचो. पाचवीत चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा म्हणून पप्पांनी खूप धडपड चालू केले. त्यांच्या धडपडीतून मला इंदापूर, अकलूज, माळीनगर, बारामती, सोलापूर, इत्यादी. ठिकाणी माझा प्रवेश झाला, पण आम्ही सोलापूरची सैनिक शाळा निवडलेली. ती आमच्या जिल्ह्यासाठी एकच सैनिक शाळा होती. माझ्या प्रवेशावेळी मला 300 पैकी 202 गुण मिळाले. सर्वजण खूप झाले चांगली शाळा मिळाल्यामुळे. 11 वयात जेव्हा मुलगा आपल्या आई-वडिलांना सोडून शंभर किलोमीटर अंतरावर होस्टेलला राहण्यासाठी जातो त्यावेळेसचे दुःख तेच आई-वडील जाणू शकतात ज्यांनी ते बघितलं अनुभवले, त्यातलेच माझे आई-वडील होते. आजपर्यंत सर्वात महागडे कंपास म्हणजे कॅमलचे किंमत होती 125 रुपये. ते मला पाचवीत असताना घेतलेले. माझ्या माध्यमिक शाळेचे नाव होते "जय जवान जय किसान मुलांची सैनिकी शाळा व ज्युनियर काॅलेज".


लवकर उठण्याची सवय लावून घेतली कारण व्यायामाला उशिरा गेल्यावर मालखरे सर आणि काशिद सर शिक्षा द्यायचे. त्यातूनच माझी शिस्तबद्धपणा निर्माण झाला. घरून येतानाच अभ्यासाची जिद्द, परिस्थितीत जाणीव, स्वतःची चिकाटी बाळगून आलेलो. पाचवीत मराठा मंदिर ची परीक्षा दिली. पहिल्यांदाच मी 15 ऑगस्टला परेड पाहिलेली. त्यावेळी मनात ज्वाला प्रज्वलित झाली. मनाला स्पर्श करून जाणारी एक गोष्ट म्हणजे मलाही वाटायचं की मी ही संचालक होऊन परेड करेल. अशा जिद्दीच्या जोरावर मी सातवीपासून कधी Commander तर कधी Second in commander म्हणून मी संचालन करायला लागलो. माझ्या अंगात भाषण कला असल्यामुळे माझी स्टेज डेरिंग खूप चांगल्या प्रकारे सुधारली. तसेच विविध कार्यक्रमात भाषणामध्ये सहभागी होऊ लागले या परिस्थितीची जाणीव असल्यामुळे मी कधी शैक्षणिक सहलीला गेलो नाही पप्पा आजही सर्वांना सांगतो की खर्च करायचा मधले केस त्याचे लांब करतो गावी गेल्यावर मी जुनी पुस्तके घेतली किंमत होते फक्त रुपये तीस माझा पाचवीमध्ये अर्ध्या गुणांनी पहिला नंबर नाही आला म्हणून पप्पा दोन-तीन दिवस नाही नुसते जेवले नाही मी नवोदय विद्यालय साठी अपात्र लोकांना अभ्यास मराठीत केलेला पण पेपर इंग्रजी मधून आलेले नेहमीप्रमाणे वेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी अपयश मिळत होते म्हणतात ना जवळ असतात तेव्हा त्याला जरा जास्त तो बेडूक असतो पण जर का मोठा पाऊस झाला जेव्हा समुद्राला जाऊन मिळते तेव्हा त्या बेडकाला काहीच करता येत नाही ना तुला जास्त अशाप्रकारे मला स्पर्धेची जाणीव आहे


माझा पहिल्यांदा जय जवान जय किसान शाळेमध्ये डीटीएड चे प्राचार्य देशपांडे सरांकडून सत्कार झाला हो मला ते चित्रकलेची वही मिळाली मी खेळते जोरातच जो काही जन्माला एम एस धोनी म्हणायचे का तरी दोन्ही सारखा करतो होस्टेलला खानावळीची जेवण भोजनालय चांगला नसतो कधीच कधी नसतं केलं नाही उलट आपण काय करणार अभ्यासाची आवड होती परिस्थिती बिकट होती पण आई-वडिलांनी शेतामध्ये काम करून माझ्या शिक्षण पैसे भरायचे त्यावेळेस जास्त असतानाही खूप वाईट वाटायचे त्यांच्या किंमत राहण्यासाठी कधी हार मानावी असे ठरवलेले जास्त काही येत नसल्यामुळे रात्री जागरण करायचे असेल तर मला वाईट म्हणजे मी आजारी पडू लागलो तब्येत कमी होऊ लागली आणि चांगला फायदा म्हणजे मला पहिल्या घटक चाचणी मध्ये 140 पैकी 126 गुण मिळवून मी वर्गात पहिला आलो आमच्या शाळेचा गणवेश होता सैनिक त्यामुळे तो बसल्यावर अनुभव होता अनोळखी दोघांना ते मागायचं नाही तसेच हॉस्टेल वरून पहिल्यांदाच घरी जाणार होते तेव्हाच आहे आनंद शब्दात मांडू शकत नाही माझ्या तब्येतीकडे बघून आई-वडिलांना खूप वाईट वाटायचे त्यांना वाटायचे की आपण घ्यायला हॉस्टेल टाकून गुन्हा केलाय पण तो पुन्हा नव्हता तो एक संघर्ष होता. वर्गामध्ये प्रत्येकाला आपापली स्वप्ने विचारले मी सांगितले की मला कलेक्टर बनायचे पहिल्यांदाच कलेक्टर ला इंग्रजी मध्ये काय म्हणतात असे आमच्या वर्गशिक्षिका सुचेता थिटे मॅडम यांच्याकडून समजले.

"जिवन जगणे सोपे नसते

संघर्षाशिवाय कोणी मोठे होत नसते

जोपर्यंत पडत नाहीत हातोड्याचे घाव

तोपर्यंत दगड सुद्धा देव होत नसतो."

मी सहावीत असताना ITSE ची परीक्षा दिली पण शेवटी अपयशच मला 300 पैकी 132 गुण मिळालेले. मीही असे छोटे-मोठे अपयशाचे धक्के बसायला लागल्यानंतर निराश व्हायचो त्या वेळी मला शब्दच साथ द्यायचे. IRS भरत आंधळे म्हणतात की

"अपयश ही यशाची पायरी असते,

आयुष्यातील अनुभवांची डायरी असते"


माझ्यावर त्याही वेळी खूप चांगले संस्कार रूजू झाले उदा. एक शपथ म्हणून आमच्याकडून असे लिहून घेतलेले की 'मी वाईट शब्द बोलणार नाही'. सातवीत असताना मी पहिल्यांदाच P-cap घालून Commander म्हणून आमच्या platoon चे नेतृत्व करत होतो. त्यावेळीची मजा, आनंद वेगळाच होता. मला 15 ऑगस्टला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीसही मिळाले. परीक्षेचे पेपर कसे लिहितात त्याचे एक उदाहरण म्हणजे मी एक होतो. माझ्या पेपरची चर्चा सार्या स्टाफरूममध्ये होत. माझे वडील मला भेटायला आले की सर्व गुरुवर्यांचीही भेट घेत आणि सांगत थोडी जरी चूक झाली की शिक्षा करत जावा. पण गुरूजन सांगत शक्यतो हा कधी चुकतच नाही. वार्षिक स्नेहसंमेलनाच्या दिवशी अचानक हुल्लूर मॅडमनी मला सांगितले की तुला बक्षीस मिळणार आहे. त्या क्षणी माझ्या घरचे कोणीच नव्हते, कदाचित असते तर खूप खुश झाले असते. त्यांना खूप आनंद झाला असता. मला बक्षीस साहावीत पहिला नंबर तसाच सातवीतला हुशार विद्यार्थी म्हणून मिळालेले. मला चित्रपट बघण्याची आवड लागलेली. मी त्यातून वेगवेगळे संदेश मिळायचे. मी चित्रपटांची नावे तसेच त्यातील संदेशांची टिप्पणी पण करायचो. 19 फेब्रुवारी च्या अगोदर एक दिवस मालखरे सरांनी माझे मनोगत व्यक्त करण्यासाठी सांगितलं, माझं भाषण वेगळेच व त्याची रचना व मांडणी वेगळीच होती. आज ते प्रतिलिपी तसेच blogspot वरती ते वाचून खूप रसिकवर्ग खूष होत आहेत. मी हळूहळू वाचनालयाचा वापर करू लगलो. कधी MPSC, UPSC तर कधी G.K. च्या पुस्तकांवर जोर देत. मी आठवीत आलो. मला परिस्थिती जाणीव करून द्यायची. पप्पा दुसऱ्यांच्या शेतात कामाला जाऊन पैसे आणायचे. त्याही वर्षी मी परेडसाठी कमांडर म्हणून नेमणूक झालेली. त्यावर्षी खानावळ खूप बिघडलेली. कधीकधी जेवणे करत नसायचो. ते खूप वाईट दिवस होते. परिस्थितीही नाजूक होत चालल्यामुळे पप्पांना भेटायला बोलवत नसायचो कारण येण्या-जाण्यामध्ये हजार- दीड हजार खर्च व्हायचा. भ्रमणध्वनीद्वारे पप्पा- मम्मी सतत एक संदेश मिळायचा तो म्हणजे ताण घेत जाऊ नको. जितका अभ्यास होतोय तेवढा कर आणि आजही तोच संदेश असतो. दिवसेंदिवस माझी अभ्यासाची क्षमता वाढत होती. मी दिवाळीमध्ये नवोदयाच्या पुस्तकातील Physics चा अभ्यासक्रम स्वतःच संपवला. मला मदत करणारं तसं कोणीच नव्हतं. स्वतः चाचणी घेऊन मला 200 पैकी 174 गुण मिळाले. नवोदयचा पेपर सोपे होते पण शेवटी नशीब आमच्या जातीसाठी एकही जागा नव्हती, शेवटी अपयशच. पण माझ्यातली हिंमत न तुटू देता घरच्यांनी व मालखरे सरांनी मला विविध परीक्षांना सामोरे जाण्याची प्रेरणा दिली. दिवाळीत असा एक सर्वांपेक्षा वेगळा निश्चय केलता की आपण घरच्यांसाठी एक तरी भेटवस्तू घेऊन जायचे. आपला खर्च कमी करायचा. पप्पा दुसऱ्यांच्या शेतात कामाला जायचे दिवाळीतही व मम्मी घरचे सर्व बघायची.


मी प्रत्येक वेळी पक्ष्यासारखे आकाशात भरारी घ्यायचो आणि कालांतराने काही अडथळ्यामुळे पंख तुटल्यासारखे खाली पडायचो. पण काही अडथळेच सांगायचे की पुन्हा ऊठ आकाशात भरारी घे आणि संग्राम चा "महासंग्राम" होऊन दाखव.

"तकलीफे कामीयाबी के निशान है! "

शाळेतील नागणे मॅडम सांगायच्या इंग्रजीमध्ये बोलत जा पण आम्ही दुर्लक्ष करायचो, पण त्याचा पश्चाताप झाल्यावर मी स्वतःलाच बदलवण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या मार्गांतून चालू केला. मला कोणत्याही विषयावर निबंध लिहीण्यासाठी आवड निर्माण झाली. मी एका निबंध स्पर्धेत भाग घेतला पण काहींनी माझा निबंध बघून लिहील्यामुळे क्रमांक काही आला नाही. तशाचप्रकारे मी मनशक्तीला 3 निबंध पाठवलेले : 1) स्वच्छ पर्यावरणासाठी माझा प्रयत्न 2)माझ्या नजरेतून माझा देश 3) माझ्या आठवणीतील पुस्तक. शेवटीअपयशच.

"पायऱ्या त्यांच्यासाठी ठेवा

ज्यांना छतापर्यंत जायचंय आहे

माझं ध्येय आकाश आहे

माझा रस्ता मला स्वतः तयार करायचा आहे".

मला प्रथम घटक चाचणीमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळाल्यामुळे चव्हाण सरांनी Trimax पेन बक्षीस म्हणून दिला. तो माझ्या आयुष्यातला पहिला महागडा पेन होता. शाळेमध्ये कोण असा जिवलग मित्र भेटला नाही, भेटले ते सर्व स्वार्थी. " One man army " कसे सहा वर्षे गेले कळलेच नाही. माझा नवोदयला क्रमांक न लागल्यामुळे मला सर्वजण विचारायचे 'तू शाळा सोडणार होता ना, काय झालं?' पण मी दुर्लक्ष केल्या खूप काही गोष्टी.

"जग काय म्हणेल हा विचार करू नका,

कारण लोक फार विचित्र आहेत,

अपयशी लोकांची थट्टा करतात

आणि यशस्वी लोकांपासून जळतात."

मला मालखरे सरांनी NLSTSE परीक्षेसाठी तयार केले. माझ्या परीक्षेचे ठिकाण पुणे होतं, शामराव कलमाडी हायस्कूल. पहिल्यांदाच 3 फेब्रुवारी 2018 ला मी पुण्यात येणार होतो. पुण्याचं दृश्य पाहताच खूप नवल, आश्चर्यचकित वाटले. ते बदलत्या दुनियेचे उदाहरण होते. पण शेवटी नशीब माझा महाराष्ट्रात 1935 वा क्रमांक आला. परीक्षेच्या वेळेस पप्पांनी मी लिहिलेले पुस्तक वाचले जे की मला कोणाला दाखवायचे नव्हतं. खर्या आर्थीक चांगल्या कामाचे उद्घाटन एका थोर व्यक्तीकडून झालेलं. मी कधी निराश झालो की खिडकीत येऊन बसायचो पण काही माणसांकडे बघितल्यानंतर खूपच वाईट वाटायचे.

"प्रत्येक शब्दात अर्थ असतो,

प्रत्येक अर्थात तर्क असतो,

सर्व म्हणतात की मी हसतो खूप,

परंतु हसणाऱ्या मनातसुद्धा वेदना असतात."

मला त्या खिडक्या खूप काही शिकवत होत्या. नवं बदलतं जग दाखवत होत्या. त्याचा खिडक्या अनुभव देत होत्या. त्या जिवंत परिस्थितीची जाणीव करून देत होत्या.

"जेव्हा बघतो कोण्या गरीबाला हसताना

तेव्हा विश्वास बसतो की

आनंदाचा संबंध संपत्तीचे नसतो"

मी नववीत असताना माझी सरासरी जवळपास 94 टक्के एवढी असायची. मला नववीत 92.17 टक्के गुण मिळवून मी वर्गात पहिला आलो. मी दहावीच्या दृष्टिकोनातून अभ्यास करत होतो. कारण सर्वजण म्हणतात 10वी खूप मोठा टप्पा असतो. मी निराशामय वातावरणात प्रेरणा, स्फूर्ती मिळण्यासाठी दोन पुस्तके वाचली- मन मे है विश्वास आणि गरुड झेप तसेच वर्तमानपत्रेही- संध्यानंद. परिस्थिती साथ देत नव्हती त्यामुळे वाईट गोष्टींची संगतही बाळगली नाही. आमच्यावर कर्ज होते त्यामुळे कोणता हट्टही केला नाही. मला " LOVE ACTION DHAMAKA " या चित्रपटातून नागाचैतन्य कडून पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मिळाली. तेव्हापासून मी सतत काहीतरी लिहीत असतो. ते लेखन मला आनंद देते. माझं दुखः नाहीसं होतं. माझ्या लेखनातून मला प्रेरणा मिळते.


मला 26 जानेवारीला आयपीएस महादेव तांबडे तसेच वेगवेगळ्या राजकीय कार्यकर्त्यांकडून 10 ग्रॅम चांदी व ट्रॉफी म्हणून पारितोषिक मिळाले. ती ट्राॅफी आयुष्यातीलपहिली ट्रॉफी आहे. मला ती महंमद पैगंबर ह्या निबंधाला मिळालेली. मी दहावीत असताना दोन महिने मी गावांमध्ये शिकवणी लावली. ह्या शिकवणीसाठी माझा नकार होता, कारण पैसे जात होते. पण पप्पांच्या आग्रहाणे मला खूपच फायदा झाला. दहावीमध्ये जोराने अभ्यास केला. खूपच वेगवेगळे अनुभव अनुभवले. वेगवेगळे सल्ले मिळायचे. शिक्षकांचाही खूप विश्वास होता. तसेच वाघमारे मॅडम यांनी लिखाण करण्यासाठी प्रोत्साहन दिले. सर्वांना सहकार्य केले. सर्व गुरुवर्यांचे चांगल्या प्रकारे मार्गदर्शन लाभले. दहावीत असताना 26 जानेवारी 2019 रोजी परेडमध्ये मी SECOND- IN COMMANDER होतो. आमच्या platoon ला सोलापूर हेडक्वार्टर मध्ये पहिले पारितोषिक मिळाले. कोणत्याही मित्राची साथ नसताना 'वन मॅन आर्मी' शेवटपर्यंत 'एकटा जीव सदाशिव' म्हणून राहिलो. काही मित्र झाले पण तात्पुरते. दहावी मध्ये 89.80 गुण मिळवून मी सैनिकी शाळेमध्ये पहिला आलो. दहा जून तसेच दोन जुलै रोजी लोकमत व पुढारी वर्तमानपत्रात फोटो आला. घरचे आनंदी होते. पण उच्च शिक्षणासाठी कोठे जायचे हा प्रश्न समोर होता. काहीच सूचत नव्हते. सल्ले भरपूर मिळायचे पण मदत नव्हती. मी माझ्या प्रयत्न चालूच ठेवला. CCC चा कोर्स पूर्ण केला. वेगवेगळ्या कॉलेजचे फाॅर्म भरले. नंबर तर सर्वीकडे लागला.


12 जुलै हा माझ्या आठवणीतील एक दिवस होता कारण सर्व गोष्टी सहन करून माझा फर्ग्युसन महाविद्यालयात पहिल्या यादीत नाव होते. त्यावेळेस पप्पांना जो आनंद झालता, त्याचदिवशी खर्याअर्थी त्यांच्या पुढे त्यांनी सहन केलेली परिस्थिती मान खाली घालत होती. 13 जुलै रोजी अँड्रॉइड फोन घेऊन दिला. 31 जुलै रोजी पुण्यात आलो राहण्यासाठी जागा मिळत नव्हते कोणी जवळचं म्हणून नव्हतं. हॉस्टेलचाही निकाल लागला नव्हता. दिवसभर फिर- फिरलो. 1 ऑगस्ट 2019 पासून आयुष्यामध्ये खूप मोठा बदल जाणवत होता. नवनवीन अनुभव घेत होतो. वेगवेगळे शिकायला मिळत होते, मित्रही मदत करत होते. काहीजण ताण-तणाव दूर करायचे. एकाने तर खूप मदत केली दिवाळीनंतर त्यांनं माझं आयुष्यच बदलून टाकलं 25 डिसेंबरला मी खूप निराश होतो. अशा वेळी मला सल्ला मिळाला आणि मदतही." सूर्यालाही ग्रहण लागते, मग आपण कोण?" तेव्हापासून तीच जिद्द, हिंमत, चिकाटी निर्माण झाली. 26 जानेवारी 2020 रोजी " महासंग्राम - एक ध्येय वेडा प्रवास" नावाचा blog spot तयार केला खूप प्रतिसाद मिळाला. तसेच प्रतिलिपी वरती टॉप 10 लेखकांमध्ये टाॅप लेखक तसेच टाॅप कवी म्हणून क्रमांक पटकविला.

ह्या सर्व गोष्टींचा मी आनंद घेत होतो. अशाप्रकारे माझा जिल्हा परिषद ते फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठीचा प्रवास आहे....


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational