SANGRAM SALGAR

Romance Inspirational

4.0  

SANGRAM SALGAR

Romance Inspirational

गोष्ट सांगायला फक्त प्रेमच उरत

गोष्ट सांगायला फक्त प्रेमच उरत

3 mins
287


आयुष्य म्हटलं की प्रेम हे आलंच. आयुष्यात प्रेम नसेल तर आयुष्यात काहीच अर्थ उरत नाही. आयुष्यात प्रेम किती महत्त्वाचं आहे हे शब्दांतदेखील सांगणं कठीण आहे. प्रेम ही एक अनोखी भावना आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेम हे जन्मतास असतं. प्रेमात तसे खूप प्रकार पडतात. आपल्या आईवडीलांचे आपल्या मुलांवर असलेलं प्रेम निस्वार्थी ममतेटं प्रेम असतं. काही लोक कमनशीबी असतात. ज्यांना आयुष्यात ममतेचं प्रेम हे लहानपणीनच त्यांना अनाथ पोरकं करून जातं.

"प्रेम हे एक रसायन

प्रेमातही घडते महाभारत, रामायण "

प्रेमात इतकी ताकत आहे की त्यात महाभारत, रामायण घडू शकते. कलयुगातील प्रेमाचा अर्थ हा प्रतेकाच्या दृष्टीकोनातून वेगळा आहे. ही गोष्ट एका तरूण पिढीची आहे. योगेश, एक तरूण विचारवादी. जेमतेम परिस्थितीचे धक्के खाऊन आता महाविद्यालयीन शिक्षण घेत असतो. तो अभ्यासातही हुशार असतो. सर्वांना मदत करणारा हा एक तरूण. योगेश रहिवासी विद्यालयात राहत असल्याचने तो वसतिगृहात राहत असायचा. एकदम शांत आणि गप्प स्वभावाचा हा मुलगा. आजपर्यंत त्याने फक्त शालेय पुस्तकं वाचली होती. त्याला प्रेम वगैरे ह्यातलं जास्त काही माहीतच नव्हतं.

विद्यालय चालूच होतं. वर्गातही जास्त काही मिळून मिसळून राहत नसायचा. मित्रप्रेमावरतीही त्याचा विश्वास नव्हता. पण, मैत्री हे एक निस्वार्थी, प्रेमळ, जिवलग नातं आहे. महाविद्यालयाचे पाच-सहा महिने उलटून गेले तरी योगेशला अजून सर्व वर्गमित्र माहीती नव्हते. पहिल्यांदाच त्याने एका कार्यक्रमात सहभाग नोंदविला होता. त्या कार्यक्रमात योगिताही होती. आता ही योगिता कोण? योगिता एक अभ्यासू, हुशार, विचारवादी, सकारात्मक मुलगी. तीही योगेशसारखीच होती. पण, वर्गामध्ये ती हसून-खेळून राहायची. दिसायला तशी ती सुंदरच. दोघेही एकाच कार्यक्रमात असल्यामुळे थोडी तोंडओळख झालती. पण, अजून त्यांच्यात मैत्री, प्रेम असं काहीच नव्हतं. योगेशला कार्यक्रमात एक मदत हवी होती. योगेशने योगिताला हळूवार शब्दांत मदत मागितली. योगिता मदतीसाठी तयार होतीच. कार्यक्रम संपला पण, योगिताचे ते स्मितहास्य योगेशला आता भारावून सोडणारं होतं.

योगिता आता योगेशच्या स्वप्नातही दिसत होती. कदाचित योगेशला प्रेम झालतं. वर्गामध्ये हळूहळू ओळख झाली. एकामेकांचे संपर्क क्रमांक अदला-बदल झाले. जे योगेश समोरासमोर बोलत नसायचा आता तो रात्रभर योगितासोबत गप्पा मारायचा. योगेशसाठी योगिताचा आलेला एक संदेश आता एका उत्सवापेक्षा काही कमी नव्हता. हळूहळू त्यांच्यात मैत्री झाली. मात्र योगेशला प्रेम झालतं. योगेश सतत स्वप्नातच राहायचा. आता त्यांची खूप ओळख झालती. व्हाट्सअपवरती कश्या रात्री सरायच्या त्या दोघांनाही कळत नसायच्या. जेव्हापासून योगिता भेटलेली तेव्हापासून योगेशच्या प्रत्येक दैनंदिनीच्या पानावर ती असायची. कधी रूसणारी तर कधी मनसोक्त हसणारी. तिचा संदेश नाही आला तर त्याच्या जिवाची घालमेल होत असे.

योगेशने योगिताला कधी प्रेमाबद्दल विचारलं नव्हतं. कारणं मैत्रीही राहत नाही आणि प्रेमही हे योगेश जाणून होता. पण, अचानकच दोघांमध्ये काही कारणास्तव महायुद्धासारखं भांडण झालं. एकामेकांचे संपर्क क्रमांक सुद्धा ब्लाॅक केले. खूप दिवस उलटून गेले. योगेशचा प्रेमावरचा विश्वास कमी होत चाललेला. हळूहळू त्याला खूप त्रास झालेला. महामारीमुळे सर्वजणच घरी बसलेले. ना दोघे भेटून सविस्तर बोलू शकत होते ना एकमेकांना साधं पाहू शकत होते. जवळपास एक वर्ष होऊन गेलं. योगेशचा प्रेमावरचा विश्वास संपूर्णपणे नाहीसा झालता.

आता खूप दिवसांनी दोघे एकत्र येणार होते. काही कारणांमुळे दोघेही एकाच बसमध्ये बसले. एकमेकांनी ऐकमेकांची तिकीटे काढली. थोडंफार बोलण्याचा प्रयत्न करत होते. ट्राॅफीकमध्ये योगेशला वाटायचं की ट्रॅफिक अशीच राहावी आणि त्याने फक्त योगितालाच पाहत राहावं. त्या ट्राॅफीकमध्ये योगेशला कंटाळा येत नव्हता. म्हणतात ना प्रेम हे वेडं असतं तसचं काही त्याच्यासोबतही घडत होतं. दोघे बसस्थानकावरच जर वेळ बसले. दोघांनी ऊसाचा रस घेतला. काही छायाचित्रे काढली. जवळपास तीन-चार तास ते दोघं गप्पामध्ये रंगून गेलते. योगिता योगेशला खूप काही सांगत होती. ती त्याला आयुष्याचं महत्त्व पटवून देत होती., त्यानी केलेल्या चुका सांगत होती.

अखेरीस तो पुन्हा योगिताच्या विचारांच्या प्रेमात पडला. आणि काही तासांनंतर दोघेही आपल्या-आपल्या आयुष्याच्या वाटेने निघून गेले. त्यांच्यासाठी आयुष्यात एकादी गोष्ट सांगायला फक्त प्रेमच उरलेलं. अखेरीस त्यांचं पुन्हा मिलन झालं आणि आयुष्य सुखाने, आनंदाने जगू लागले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance