पुणे ते टेंभुर्णी
पुणे ते टेंभुर्णी
घरी न जाण्याचा खूप संकल्प केलता पण पसरत्या आजाराला थांबविण्यासाठी सरकारकडे काही औषध नव्हतं. आजार होता कोविड-19 (कोरोना वायरस). हा आजार चिनवरती मात करून त्याने दुसऱ्या देशांकडे झेप घेतलेली. त्यातलाच भारत एक आणि त्या भारतातलं पुणं विद्येचे माहेरघर. विद्यार्थ्यांचा सोशल मीडियावर हाहाकार पसरलेला. त्यांची धावपळ चालू होती. काही जणांनी स्वप्ने तुटलेली. कोणाच्याही मनाध्यानातही नव्हतं की एका आजाराने ह्या विश्वाचं इतकं नुकसान होईल. खूप जणांनी घवघवीत यश मिळेपर्यंत घरी न जाण्याचा संकल्प केलता त्यातलाच मी पण एक. पण घ्या आजारापुढे नतमस्तक व्हावं लागलं.
आदल्या दिवशी काय झोपच आली नाही घरी जायचं म्हटल्यावर. अभ्यासाचही नियोजन करत होतो. सकाळी उठण्याचा आळस खूप होता पण नाईलाज लवकर उठलो, स्वारगेटला पीएमटीचे धक्के खात आलो. पीएमटी पण कमालीचे मध्येच बंद पडली सर्वजण खाली उतरल्यानंतर मिनिटा-दोन मिनिटातच चालू झाली. स्वारगेटला आल्यानंतर एक आगळं वेगळं दृश्य होतं. जिकडे बघेल तिकडे तोंडालाच बांधलेले प्रत्येक इसमाने. जो तो आजाराचाच विषय काढायचा. विद्यार्थीही जड पावलांनी बस स्थानकावरती होते.
बस स्थानकावर पोहोचल्यानंतर बसची वाट पाहत बसलेलो. तेवढ्यात माझे लक्ष एका म्हाताऱ्या, वयस्कर आजीकडे गेलं. तिला दिसत नव्हतं. ती आजी आंधळी होती. तिला कोणाचीतरी मदत हवी होती. सर्व तरुण, सुशिक्षित मंडळी होती पण कोणाचे हात मदतीला धावत नव्हते. ती आजी म्हणायची 'कोणीतरी चहा आणि बिस्कीट आणून द्या माझ्याकडून पैसे घेऊन जा' पण आजकालचा माणूसकी सोडून पैशाच्या मागे धावत आहे. गोष्ट होती फक्त दहा ते वीस रुपयांची, प्रत्येकजण त्या आजीचं ऐकायचा आणि दुर्लक्ष करून निघून जायचा. हिच आहे का आपली माणुसकी? काही वेळानंतर एका तरुण मुलाने त्या आजीला न पैसे घेता सर्व उपलब्ध करून दिलं. खरच आजी खूप खुश झालेली. खरचं युवकांची आपल्या देशाला, समाजाला गरज आहे.
प्रवास चालू झाला. गर्दी तशी बर्यापैकी होती आणि वायरसमुळे रेल्वे बंद करण्यात आल्या होत्या. प्रत्येकजण आपाआपली काळजी घेत होता. तोंडाला रुमाल किंवा मास्क बांधत होता. माझ्याजवळ एक मोठी बॅग होती पण बस पूर्ण भलल्यामुळे एका वयस्कर आजीला जागा करून देण्यासाठी मी ती वर ठेवली. आज सर्वीकडे आजारात जाळं पसरलेलं पण काहीजण चेष्टा-मस्करी वरतीच घेत होते. एका गोष्टीचं नवल वाटायचं की ते म्हणजे मास्क वरती ही लिहिलेलं "अपना टाईम आयेगा" खरच आज ती वेळ आलेली. ही वेळ आपल्यासाठी लवकरात-लवकर आजारावर औषध काढण्यासाठीची. प्रयत्न चालूच होता पण यश मिळत नव्हतं.
रात्रीच्या जागरणानं डोकं जरा जास्तच फणफणत होतं. झोप लागलेली पण निसर्ग काही झोपू देत नव्हता. तो मला बारीक लक्ष देऊन निरीक्षण करायला सांगायचा. खरं आहे निसर्ग सदैवच आपल्याला साथ देत आलेला आहे. माणूस कितीही चुकीचं वागला तरी त्याला निसर्ग साथ देतीच. कोरोना वायरस हा जास्त तापमानात जगू शकत नाही असे वैद्य म्हणतात, त्याचप्रकारे निसर्गाने उनाड माळासारखे स्वतःचा अवतार करून तो कोरोनाला पळवण्यासाठी मागे लागलाय हे म्हणायला हरकत नाही.
आज एका वायरसमुळे सर्व जवळपास रेल्वे प्रवासही बंद झाल्यामुळे बसमध्ये गर्दी वाढत होतीच. खूप वर्षानंतर आज आजीबाईंचेही आजीपण बसमध्ये आढळून आलतं पण कलियुगात आज त्याच आजीची गरज भासते. जागतिकरणामुळे आजीला आपण विसरून न्यूक्लिअर फॅमिली "न्युक्लियर फॅमिली" असा वेगळा नियम प्रत्येकजण लागूच करत आहे. प्रवासामध्ये मी एका आजीला माझ्याजवळचा फरसाणा खाण्यासाठी दिला. ति आजीपण खूप खूश झाली. ती भाकर आणि भेंडी खात होती. ती नको-नको म्हटली पण मीच थोडा आग्रह केला. तिला शेवटी-शेवटी मी त्यांच्याच कुटुंबातला वाटू लागलो.
प्रवास म्हणजे खरंतर बसचे धक्केच असतात. पण प्रवासात मन तल्लीन होऊन वेगळ्या विचारातच ते मग्न असतं. वेगवेगळेपण शोधत असतं कारण दररोजच्या जीवनाला कंटाळलेलं असतं त्यालाही ताजेतवानं होण्याची गरज असते. ते प्रवासात विरंगळून जातं. प्रवास आपल्याला आपल्या डेस्टिनेशन काही वेड लागलेलं असतं. आपण पुढचाही आपोआप विचार करत असतो. आपल्या आठवणी त्याच विचारात पुन्हा ताजातवान्या होतात, आणि त्यांना वास्तविक रूपही मिळते.
आता गाडी टेंभुर्णीमध्ये आलेली. बसमधून कधी उतरेल असे झालतं पण मोठ्या बॅगा असल्यामुळे उतरण्यासाठी उशीर लागला पण खालून बसमध्ये चढणाऱ्या काही माणसांमध्ये माणुसकी असल्यामुळे त्यांनी मला बाहेर निघण्यासाठी थोडक्यात मदतच केली. खरच मी त्यांचाही आभारी आहे. आता ओढ लागेलेली बघण्याची. खूप दिवस झालं, घरी आलोच नव्हतो. त्यांना आनंदी बघण्याची इच्छा होती. बसमधून खाली उतरलो. गाव तसा वेगळाच दिसत होता. जागतिकीकरण आणि प्रगतीचे एक जिवंत उदाहरण पाहत होतो. पप्पांना फोन लावणार तेवढ्यात मला काही अंतरावरून ते दिसल्यामुळे मी त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला.
गेल्या आठवड्यापासून खूप टेन्शनमध्ये होते पण मला कधी कळूच दिले नाही. पप्पा घरी निघण्याच्या मार्गावर होतेच. तेवढ्यात मी त्यांच्या पुढे उभा राहिलो. त्यांना आनंदाचा धक्काच बसला. मला बघितल्यानंतर त्यांच सर्वच टेंशन नाहीसं झालं. ही गोष्ट आमच्या घरी कामाला असणार्या रोजगारांनाही त्यांनी सांगितली. एका मुलासाठी आपल्या वडिलांकडून काय अपेक्षा असते अजून? तो क्षण माझ्यासाठीचा अविस्मरणीय होता. तो क्षण मी विसरूच शकत नाही.
अशा प्रकारे माझा आजचा प्रवास कधी संपला समजलेच नाही...