SANGRAM SALGAR

Others

2  

SANGRAM SALGAR

Others

अक्षय ऊर्जा दिवस 2020

अक्षय ऊर्जा दिवस 2020

1 min
201


सौरऊर्जा काळाची गरज

जर का विजेचा शोध लागला नसता तर? तर आपल्याला प्रत्येक परिस्थितीला अडचणीला सामोरे जावे लागले असते. शास्त्रज्ञांच्या कठीण परिश्रमामुळे अखेरीस विजेचा शोध लागला. प्रत्येकाला त्या ऊर्जेचं आश्चर्यचकित वाटू लागलं. जसजसा विजेच्या साधनांमध्ये बदल होत गेला तसाच आपल्या गरजाही वाढू लागल्या. आपल्याला सोयीचे जीवन जगू वाटू लागलं त्यासाठी उर्जेची खूप मोठी मदत आपल्याला लाभली.

आज ऊर्जेमुळे आपण जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊ शकतो, भ्रमणध्वनीच्या माध्यमातून संवाद साधू शकतो. जगात जागतिकीकरणामुळे मानवाच्या गरजा खूप वाढू लागल्या तो अधिकाधिक ऊर्जा चा वापर करू लागला पण आपलं दुर्भाग्यच म्हणावे कारण त्यातून प्रदूषणाचे प्रमाण वाढलं त्या प्रदूषणामुळे वेगवेगळे अडचणींना सामोरे जावे लागते. पण खूप संशोधन करून सौरऊर्जा प्रकल्प आला. हा प्रदूषण करत नाही आणि सूर्याच्या उर्जेवर सर्व गोष्टी होतात. खरंच सौरऊर्जा काळाची गरज बनली आहे. आपण तिचा आपल्या जीवनात योग्य रीतीने वापर केला पाहिजे.


Rate this content
Log in