तुमच्या जीवनातील तंत्रज्ञानाचे
तुमच्या जीवनातील तंत्रज्ञानाचे
अहो, आता जो मी हातात मोबाईल घेतला आहे. आणि त्या वरती टाईप करून स्टोरी मिररला जे काही साहित्य पाठवते तेच मुळात आत्ताच्या तंत्रज्ञानामुळे. नाहीतर, मी एवढे सारे हाताने कधी लिहिले असते? आणि कधी पोस्टात जाऊन टाकले असते? झटपट लगेच दुसऱ्या दिवशी किंवा दोन-चार दिवसात त्याचा रिझल्ट पण कळतो. म्हणजे किती लोकांनी वाचले, किती लोकांनी लाईक केले, किती लोकांना आवडले वगैरे वगैरे. एकविसावे शतक हे तंत्रज्ञानाचे शतक म्हटले जाते. त्यात कित्येक जुन्या गोष्टी गेल्या आणि नवीन गोष्टी आल्या पुर्वी प्रवासाला जाताना टेप रेकॉर्डर, कॅसेट इत्यादी न्यावे लागत असे आता एक पेन ड्राईव्ह भरला की तुमचे काम संपले.
या मोबाईलच्या बाबतीतच किती क्रांती झालेली आहे जसे काय एखादा अल्लाउद्दीनचा जिनीच. घड्याळ पाहिजे घड्याळ, पिक्चर पाहिजे पिक्चर, पुस्तक वाचायचे पुस्तक, कोणाशी चॅट करायचे, करा! दूरवरच्या एखाद्या अमेरिकेतल्या मित्राशी, नातेवाईकांशी बोलायचे आहे एका सेकंदात कॉन्टॅक्ट लागतो. आपल्या जवळच्या मंडळीची ख्या
ली खुशाली कळते एवढेच काय त्यांना प्रत्यक्ष बघण्यासाठी व्हिडिओ कॉल ची देखील सोय आहे. काय दिले नाही या तंत्रज्ञानाने? फक्त माणसाला चांगले घेता आले पाहिजे. कोणत्या गोष्टीचा अतिरेक झाला की ती विकृती बनते.
आता लहान मुलांच्या हातात सतत मोबाईल दिला बालपणातच त्यांना सोडावॉटरच्या बाटल्या सारखा जाड काचेचा चष्मा लागतो. अंडोलन्स किंवा पौगंडावस्था या अवस्थेत नको त्या साईट बघितल्या तर मुले बिघडतात. त्यांच्या स्वतःच्या प्रकृतीकडे, ध्येयाकडे ,लक्ष राहत नाही. शेवटी काय घ्यायचं आणि काय नाही हे आपल्या स्वतःवर अवलंबून आहे. मात्र तंत्रज्ञानाला आता पर्याय नाही थ्रीडीच्या मदतीने तर कितीतरी मोठी आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रियादेखील करता येतात. अनोळखी भागात गेलो तर तुमचा मोबाईल तुम्हाला रस्ता दाखवतो. म्हणजे, आता जगण्यासाठी ऑक्सीजन, अन्नपाणी या इतकाच मोबाईल आवश्यक आहे. फक्त अतिरेक नसावा. एक हात तंत्रज्ञानाच्या हातात दुसरा हात संस्कृतीच्या हातात अशी सर्वांची सांगड घालून पुढची वाटचाल केली पाहिजे.