डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Abstract

4.0  

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Abstract

तीच खरी सबला

तीच खरी सबला

3 mins
298


 डॉ.शैला तिच्या ओपीडी मधे पेशंट पाहण्यात गर्क होती. आधीचा पेशंट पाहून झाला अन् नेक्स्ट म्हणून तिने बेल दाबली. एक बाई लहान बाळाला घेऊन आत आली अन् सोबत तिच्या दोन लहान मुली..


शैला: बोला काय म्हणताय.


पेशंट : मॅडम हा माझा मुलगा आता तीन महिन्याचा झाला बघा. खूप दिसांची येईन म्हणते तुमच्या कडे पण काही येळच होईना. आज मात्र मुद्दाम येळ काढून आले बगा.


शैला: काय झालं बाळाला?


पेशंट: काही झालं नाही ओ मॅडम, पर तुमच्या आशीर्वादाने हा मुलगा झालाय बघा..!


शैला ला मात्र काही संदर्भ लागेना. तिला आधीच्याच दोन मुली त्यामुळे तिला आपण मुलं होण्यासाठी ट्रीटमेंट नक्कीच नाही दिली हे तिने ताडले . प्रेगनन्सी दरम्यान ती बाई दोन चार वेळा तपासायला आलेली तिला आठवली पण तुमच्या आशीर्वादाने मला मुलगा झालाय याचा काही तिला संदर्भ लागेना....!


तिला विचारात पाडलेली बघून पेशंट ने जुना संदर्भ दिला अन् शैला च्या डोक्यात आता लख्ख प्रकाश पडला....


तिला काही महिने पूर्वीची गोष्ट आठवली ..


एक बाई तिच्याकडे तपासायला आलेली.

जवळपास तेरा चौदा आठवडे म्हणजे तीन महिन्यांच्या वरची प्रेगनन्सी . सोबत एक छोटी मुलगी.


केस हिस्टरी घेतांना, तिला दोन मुली आधीच असल्या चं अन् ही तिसरी खेप असल्याचे शैला ला तिने सांगितले..


शैला:. काय ग ह्या दोन सोन्यासारख्या मुली असतांनाही आणखी एक कशाला ग? दोघीं नाच चांगली शिकून सावरून मोठी कर. मुलगा काय किंवा मुलगी काय दोघेही सारखेच ग!

तुम्हा लोकांना ना काहीच कळत नाही.


पेशंट: मला पण पटते ओ मॅडम पण काय करू हा नवरा अन् ह्ये सासू उठ सूट नातूच पाह्यजे म्हांतेत न..!


म्हणून आता एक वेळ तपासणी करून येतो अन् पोरगा असेल तर ठेवीन, न्हायतर पुन्हा पोरगं होऊ देणार न्हाय.


शैला :अगं पण एवढ्या दिवसांचा गर्भ पाडणे तुझ्यासाठी धोकादायक आहे.


ती फक्त चूप राहिली..


दोन चार दिवसांनी ती पुन्हा दवाखान्यात आली....


ती:मॅडम पुन्हा एकदा तपासून द्या की.


शैला: अगं दोन ,चारच दिवसांपूर्वी तू तपासून गेलीस ना?


ती: पण माझ्या समाधाना साठी एकदा ओ मॅडम..


शैला ने पुन्हा एकदा तिला तपासले .


तपासून झाले अन् ती शैला ला म्हणाली..


मॅडम, काल गेले होते तपासायला. तिथे डॉ. नी पुन्हा मुलगीच आहे म्हणून सांगितलं ..


पण मी अजून घरी सांगितलं नाही...

मला नाही पाडायचा हो हा गर्भ..,जे होईल ते मी बघून घेईल..


मी तुमचं नाव सांगितलंय ,तुम्ही नको सांगजा माह्या घरच्याईले!


चला एक भ्रूणहत्या टळतेय हे बघून शैला पण तिला हो म्हणाली.


त्यानंतर दोन चार वेळा ती तपासणी साठी आली होती.

अन् आज लेकराला घेऊन.


इतर पेशंट च्या नादात शैला मागचं सर्व विसरली सुद्धा होती.


पुढे ती म्हणाली


ती: मॅडम तुम्हाले आठवते का? मी तव्हा तपासायला आली व्हती ना तेव्हा मी तुम्हाला विचारलं होतं बघा..

गर्भ कोणत्या बाजूला लागते म्हणून तर तुम्ही उजव्या बाजूला लागतो असं सांगितलं होतं बघा.


शैला: अग पण ती गर्भाची त्या वेळची स्थिती होती. बाळ डिलिव्हरी पर्यंत अजून जागा बदलते ग .


ती : नाही मॅडम, एक तर मला मनापासून वाटतं होतं अन् माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास हाय जी. कारण मुलीच्या येळी तुम्ही जसं सांगितलं होतं तसचं झालं व्हतं अगदी!


अन् झाली असती तर झाली असती मुलगी ! काहिबी व्हणारच होतं.

पर माजी त्या पोटातल्या लेकराले माराची बिल्कुलच इच्छा नोहती. अजून थोडे कष्टले असते तिच्यासाठी...


आता तर अपरेशन च करून घेतलंय बगा..


तिचं बोलणं ऐकून खूप कौतुक वाटलं होतं शैला ला तिचं.!


मुलगी झाली तरी चालेल पण मी स्त्री भ्रूणहत्या करणार नाही हा संदेशच देऊन गेली होती की ती एक साधी अशिक्षित महिला तिच्या कृतीतून. नाहीतर असे कितीतरी पांढरपेशे लोक पाहत होती ती तिच्या रोजच्या ओपीडीत. शिकून सवरून सुद्धा स्त्री भ्रूणहत्या करायला प्रवृत्त होणारे.

अन् अशा कितीतरी सुशिक्षित स्त्रिया घरच्या दबावावरून हे सर्व करण्यासाठी प्रवृत्त होणाऱ्या.


गर्भजल परीक्षण (amniocenteses) आणि सोनोग्राफी ह्या दोन्ही प्रक्रिया खरं तर वैद्यकीय क्षेत्राला लाभलेले वरदानच!

गर्भात काही जनुकीय दोष किंवा इन्फेक्शन आहे का? हे बघण्यासाठी असलेली ही चाचणी! पण यात गर्भाच्या लिंगाचे निदानही होते हे आढळून आल्याने कोणत्याही परिणामांचा विचार न करता सर्रास ही चाचणी केली जाते.

सोनोग्राफी चे सुद्धा तसेच आंतरिक अवयवात,अंगात काही दोष असल्यास ते निदर्शनास आणून देणारी ही चाचणी !पण हीचाही उपयोग सर्रास गर्भलिंगनिदानासाठी करून घेतला जातो. ही खरी शोकांतिका आहे.


बरं या चाचण्यांची विश्वासार्हता तरी शंभर टक्के असते का? तर नाही...! तरीही वर्षानुवर्षे हे सुरूच!


खूपदा मुलगा म्हणून सांगितलेला गर्भ जन्मानंतर मुलगी तर मुलगी म्हणून गर्भपात केलेला गर्भ मुलाचा असल्याचे आढळून येते. पण लोकांची मानसिकता काही बदलत नसते.


अनेक सुशिक्षित,सक्षम स्त्रिया जेव्हा घरच्या दबावाखातर हा निर्णय घेतात त्या पार्श्व भूमीवर ही अशिक्षित स्त्री अबला नाहीतर सबला भासली होती तिला...!


त्या स्त्रीचे तिच्या निर्णयाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन केले शैलाने कारण ती एक मिसाल होती स्त्रीच्या निर्णय क्षमतेची,तिच्या सबलतेची!


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract