डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Inspirational

3  

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Inspirational

क्षण सकारात्मक यशाचा

क्षण सकारात्मक यशाचा

5 mins
145


दहावीचा निकाल लागला आणि यशस्वी अगदी आनंदाने डॉक्टर अभय च्या केबिन मध्ये पेढे घेऊन आला. त्यांना पेढा देऊन यशस्वी ने नमस्कार केला . तो जिल्ह्यातून पहिला आलेला अठ्ठ्यांणव टक्के घेऊन आणि आता पुढे त्याला सुद्धा त्यांच्या सारखे डॉक्टर व्हायचे आहे आणि त्यासाठी लागेल तेवढी मेहनत करायची त्याच्या मनाची पूर्ण तयारी आहे हे त्याने अगदी ठासून त्यांना सांगितले.


डॉ. अभय ने यशस्वी ला अगदी मनापासून शुभेच्छा दिल्या आणि त्याच्या सकारात्मक वृत्तीचे कौतुक करत त्यांनी त्याची पाठ थोपटली. त्यांच्या जवळ असलेला महागडा पेन त्यांनी यशस्वी ला भेट म्हणून दिला. डॉक्टरांचे त्याने मनापासून आभार मानले आणि यशस्वी गेला.


आज यशस्वी ला बघून डॉ. अभय खूप खुश होते. त्याची योग्य दिशेने सुरू असलेली वाटचाल त्यांना सुखावून गेली होती.


यशस्वी केबिन मधून गेला आणि आठ महिन्यांपूर्वी चा प्रसंग त्यांच्या डोळ्यापुढे उभा राहिला....


रात्रीची वेळ ,शेवटचे दोन तीन पेशंट उरलेले. ते आटोपले की झाले. चला जरा भराभर उरकूया असा विचार करत डॉ. अभय कामाला लागले. आतला पेशंट गेला आणि यशस्वी त्याच्यावडीलांसोबत आत आला.


त्याच्या वडिलांनी सांगितलेले असे..


यशस्वी आता दहाव्या वर्गात होता. कारोना च्या ऑनलाईन क्लासेस मुळे स्मार्ट फोन त्याला वडिलांनी घेऊन दिला होता. पण या काळात आणि गुगल वरची माहिती बघून त्याला त्याचे शरीर अवयव थोडे वेगळे आहेत असे जाणवायला लागले.


त्यानें त्यासाठी पुन्हा गुगल सर्च केले तेव्हा असं असण्याचे एक कारण कॅन्सर सुद्धा असू शकते असं त्याच्या वाचनात आलं आणि त्याच्या मनात त्याला कॅन्सर तर नाही ना? ही शंका मूळ धरू लागली. त्याचं अभ्यास , खाणं, पिणं आदी साऱ्या गोष्टींवरून लक्षच उडलं.


त्याच्यातील तो बदल इतका ठळक होता की आता पालकांना सुद्धा त्याच्या वागण्याची चिंता वाटू लागली. शाळा नुकतीच सुरू झाली होती. दहावीचे हे वर्ष होते आणि पोराचे वागणे हे असे! त्याचे वडील अतिशय चिंतित झाले होते. त्याचे काय बिनसले काही कळत नव्हते. बाबांनी मग त्याला शाळेत शिक्षक रागावले का? मित्रांशी भांडण झाले का ? कुणी दुसरा काही त्रास देतो का? सारी चौकशी केली पण उत्तर मात्र नाहीच! अन् वागण्यात सुद्धा काहीच फरक नाही. आता मात्र वडिलांची चिंता वाढत होती.


त्यांनी मग त्याला फिरवून आणण्याच्या बहाण्याने बाहेर नेले आणि खूप समजवून मनातले बोलण्यास राजी केले. तेव्हा कुठे त्याने बिचकत बिचकत मनातली शंका बोलून दाखवली. अन् वडील काळजी पोटी लगोलग त्याला डॉ. अभय कडे घेऊन आले होते.


डॉ.अभय नी त्याला तपासले तेव्हा त्यांना पण थोडा वेगळा प्रकार असण्याची शंका वाटली आणि त्यांनी त्याला दुसऱ्या दिवशी सोनोग्राफी करायला संगितले.


दुसऱ्या दिवशी सोनोग्राफी चे रिझल्ट्स इतके शॉकींग होते की यशस्वी च्या आयुष्यात धरणी कंप च जणू!

सोनोग्राफी च्या रिपोर्ट्स नुसार त्याला टेस्टीज(अंडाशय) आणि सेमिनल वेसिकल नावाचा अवयव ज्यात शुक्राणू काही काळासाठी स्टोअर असतात हे दोन्ही अवयव नव्हतेच!


तिथून पुढे यशस्वी ची रवानगी सर्जन आणि युरोलोजीस्ट कडे झाली. प्रथम दर्शनी न दिसणारे अवयव शरीरात इतरत्र कुठे आहेत का? याचीही चाचपणी MRI द्वारे करण्यात आली.


पण सगळेच व्यर्थ होते. डॉक्टर यशस्वी ला बाहेर बसवून वडिलांना सगळे सांगायचे त्यामुळे त्याच्याही मनात आपल्याला काहीतरी मोठे झाले आहे हे पक्के दृढ झाले होते.


यशस्वी हा एक तर अत्यंत गुणी मुलगा होता. अभ्यासात नेहमीच अव्वल! सोबतच खेळ आणि इतरही गोष्टींमध्ये त्याची असलेली प्रगती अतिशय स्तुत्य च असायची . त्याच्या चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाने त्याने अनेक ट्रॉफी जिंकलेल्या अन् अशा या आपल्या मुलाच्या नशिबी असा दुर्दैवी योग यावा यामुळे वडील फारच हवालदिल झाले होते.


स्वतः ला सांभाळावे की मुलाला त्यांना कळत नव्हते.एकतर यशस्वी हा त्यांच्या दुसऱ्या पत्नीचा मुलगा होता. त्यांना पहिल्या पत्नीपासून मुलं झालेली नव्हती.लग्नानंतर तब्बल दहा वर्षांनी तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर दुसऱ्या पत्नीला झालेले अपत्य म्हणजे यशस्वी होते....


या घटनेने यशस्वी च्या बाबांच्या जुन्या जखमेवरची खपली उघडल्या सारखी झाली होती. दहा वर्ष लोकांच्या झेललेल्या संशयित नजरा आणि दुसऱ्या लग्नाच्या वेळी त्यांना मुलगी देतांना लोकांच्या मनात असलेले प्रश्नचिन्ह सारे आज पुन्हा फेर धरून त्यांच्या समोर नाचू लागले होते....!


त्यानंतर पुत्रप्राप्ती झाली होती. सद्गुणी पुत्र होता अन् हे संकट! त्यांचे पूर्ण अवसान आता गळाले होते. आणि यशस्वी मात्र " बाबा काय झाले मला सांगा? सगळं खरं खरं सांगा!" म्हणून त्यांच्या मागे तगादा लावून होता.


काय करावे? पोराला कोणत्या तोंडाने सांगावे ? यक्षप्रश्न होता त्यांच्यापुढे! पोराच्या मनावर याचा काय परिणाम होईल याचा विचार सुद्धा करवत नव्हता त्यांना.


शेवटी त्यांना डॉक्टर अभय ची आठवण झाली होती आणि सगळे रिपोर्ट्स घेऊन ते अभय कडे आले होते.


यशस्वी पुन्हा विचारत होता " मला नेमके काय झाले डॉक्टर? सांगा ना!"


आता डॉक्टर अभय ची कसोटी होती. पौगंडावस्थेतील मुलाला तुझ्या शरीरात जन्मजात पुरुषत्व प्रदान करणारे काही अवयवच नाही आहेत हे सांगणे एक दिव्यच होते.


डॉक्टर अभयनी सांगायला सुरुवात केली,

" यशस्वी तुला माहित आहे ना काही मुलांना जन्मजात काही अवयव नसतात किंवा असतात तर ते अगदी अविकसित किंवा खुरटलेले असतात. बाळा, असे असणे कुणाला आवडते का? नाही ना. पण आपल्या हातात इथे काही नसते कारण निसर्गत: च तसं घडलेले असते. तसेच बाळा तुझ्या बाबतीत झाले आहे. तुझ्या शरीरात मुळात बिजांडकोष च नाही आहे. त्यामुळे तुला तुझे शरीर अवयव इतरांपेक्षा वेगळे भासतात. पण त्यात ना तुझी चुक आहे ना दुसऱ्या कुणाची, ती तर मुळात निर्मिती तच झालेली चूक आहे. आणि जे आहे ते आपल्याला स्वीकारायचे आहे.


तू हुशार आहेस, ऑल राऊंड र आहेस. आणि आता तू ज्या अवस्थेत आहेस तेव्हा ह्या गोष्टी पेक्षा आपली प्रगती आणि ध्येय निश्चिती ही जास्त महत्त्वाची आहे. आणि त्यासाठी स्वतः ला अगदी झोकून द्यायची गरज आहे.


आपण शिकलो ,मोठे झालो की मग आपल्या सोबत आपला देश सुद्धा मोठा होतो. अशी कितीतरी मोठी माणसे आहेत जी फक्त याच एका ध्येयाने प्रेरित आहेत. आपले वैयक्तिक आयुष्य,कुटुंब,मुलं बाळ हे त्यांच्या आयुष्याचा भाग नाही आहेत कारण त्यांना अशा गोष्टींसाठी वेळच नाही आहे आणि पुढे मागे आपल्याला सुद्धा त्याचं मार्गाने जायचे आहे.


त्यामुळें इतर कोणत्याही गोष्टीचा विचार न करता आपला अभ्यास आणि आपलं ध्येय यावरच आपल्याला पुढे लक्ष केंद्रित करायचे आहे.

मला काय म्हणायचे आहे ते तुला कळलेच असेल अशी मी अपेक्षा करतो.त्यामुळे आता आपलं ध्येय सध्या एकच,उच्च शिक्षणाचे!"


डॉ .अभय च्या कौन्सिलिंग ने सारी दिशा स्पष्ट झाली होती.

यशस्वी च्या कमजोरीला फोकस न करता त्यांनी त्याला सकारात्मकतेने लढायला प्रेरित केले होते.


बाबांनी यशस्वी ला समजवायाचे तर तोच त्यांना सांभाळत होता.

"बाबा, मी अपंग नाही . मतिमंद नाही तर मी सुजाण आणि सुदृढ आहे. जे माझ्या वाट्याला आले ते मी स्वीकारले आहे फक्त याची वाच्यता उगीचच कुठेही करू नका. मी सगळं सहन करू शकेन पण लोकांच्या अशा उपेक्षित अन् सहानुभूतीच्या नजरा मला नकोत!" म्हणत त्याने वडिलांना सुद्धा विनाकारण च्या विचारांपासून परावृत्त केले होते.


सकारात्मकतेने आलेल्या प्रसंगाशी लढत त्याने आज ही यशस्वी मजल मारली होती.


निराशेच्या अंध:कारात खितपत पडून न राहता सकारात्मकतेने त्यावर मात केली होती.


म्हणूनच डॉक्टर अभय हे बघून खुश होते. हा विजय होता त्यांच्या समुपदेशनाचा अन् विशेषत्वाने यशस्वी ने दाखवलेल्या सकारात्मक ते चा!


हाच तो यशस्वी क्षण होता यशस्वी च्या जीवनाचा!


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational