डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Others

3.9  

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Others

करा हो लगीन घाई

करा हो लगीन घाई

4 mins
197


  अज्ञेया साठी प्रणित चे स्थळ सांगून आलेले. अगदीच अनुरूप स्थळ असल्याने घरी त्या स्थळावर विचार सुरू झाला. स्त्री रोग आणि प्रसूती शास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेणारीअज्ञेया अन् मेडिसिन मधे एम डी करणारा प्रणित.

फोटोंवरून दोघेही अगदी एकमेकांना अनुरूप वाटणारे...!


स्थळ बरं वाटल्याने अज्ञेया च्या आई बाबांनी दिलेल्या नंबर वर बोलणी करायला फोन केला. कर्म धर्म संयोगाने अज्ञेया ची आई आणि प्रणित ची आई यांचे माहेर एकाच ठिकाणचे निघाले आणि त्या दोघीही एकाच शाळेत मागेपुढे शिकल्याचे सुद्धा कळले. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या अन् औपचारिकता जाऊन एक अनौपचारिक बंध त्यांच्यात निर्माण झाला.


दोघींनाही आता मनोमन हेच स्थळ पक्कं व्हावं असं मनातून वाटू लागलं. मोठ्यांच्या मनातून तर खूप वाटत होतं हो पण मुख्य प्रश्न होता अज्ञेया अन् प्रणित चा. तसं फेसबुक वरून दोघांनीही एकमेकांचे प्रोफाइल पाहिलेले. वर वर दोघांनाही एकमेक पसंत. पण आजकालच्या काळात एकमेकांना पूर्ण समजून घेणे सुद्धा गरजेचे! नाही का?


मग काय दोघीही आयांनी आपापल्या लेकांना फोन नंबर ची देवाणघेवाण केली अन् बघा रे बाबांनो म्हणून त्या वाट बघू लागल्या.



पहिल्या बोलण्यात दोघेही एकमेकांबद्दल सकारात्मक वाटले अन् मग दोघीही आता निदान बघून घ्यायचा कार्यक्रम तर उरकून घेऊया या मुद्द्यावर आल्या.


मग एक तारीख फिक्स केली.!


अरेरे!!!पण नेमकी त्या दिवशी वेळेवर एका हाउस ऑफिसर ला महत्वाचे काम आल्याने अज्ञेया ची इमर्जन्सी ड्युटी लागली. अन् बेत तिथेच फिस्कटला...!


पण दोघीही मैत्रिणींनी आपली खिंड मात्र लढवत ठेवली.


पुढेही असेच एक दोनदा तारीख ठरवल्या नंतरही कधी त्याचं नाही तर कधी तिचं नाही असं होत होत तारखा नेमक्या बरगळतच गेल्या.


आता हा घाट घालावा कसा ? हा या दोघींनाही प्रश्न पडतच राहिला.


एकदा अज्ञेया च्या आईला त्या भागात काम असल्याने जाण्याचा योग आला त्यामुळे मैत्रीच्या नात्याने प्रणित च्या घरची धावती भेट घेतली गेली. प्रणित ची आई सुद्धा तिकडे आली की अज्ञेया च्या घरी जाऊ लागली.


हे सारे सुरू असतांनाच कोरोना आला अन् मग सारेच अवघड झाले. दोघेही पुरतेच अडकले.


प्रणित एक तर मेडीसिन डिपार्टमेंट ला वरून त्याची फायनल इअर ची परीक्षा! सारेच अवघड झाले आता.

कोविड मुळे त्याला सुद्धा घरी यायला जमेना!


एकदाची प्रणित ची परीक्षा कशीतरी आटोपली. अन्  चार पाच दिवसांसाठी प्रणित घरी आला.


मग पुन्हा दोघी आयांची फोना फोनी झाली अन् वापस जातांना प्रणित ने अज्ञेया ला भेटावे असे ठरले.


वापस जातांना अज्ञेया ला प्रणित ने फोन लावला. पण भेटायचे कुठे??? हा मात्र यक्ष प्रश्न होता.


हॉस्पिटल च्या परिसरात असलेली कोविड रुग्णांची गर्दी,काही नातेवाईकही होते पण या अशा काळात जायचे कुणाकडे? हा प्रश्न! अन् बंद असलेले हॉटेल्स!

अशा पार्श्वभूमीवर बिचारे दोघेही एका बंद हॉटेल समोर एकमेकांना भेटले एकदाचे!!!!


प्रत्यक्षात एकमेकांना पाहून पसंतीची मोहोर उमटली अन् आता पुढची बोलणी सुरू झाली.


पहिल्या कोविड ची लाट ओसरली अन् दोघांच्याही वेळेची सांगड घालत एकदाचे लग्न पक्के झाले.


साखरपुड्या चा मुहूर्त ठरवला गेला अन् सगळे कामाला लागले.


साखरपुड्याचा मुहूर्त जवळ आला अन् अचानक कोरोना चे रुग्ण वाढू लागले. पाहता पाहता दुसऱ्या लाटेने अक्षरशः सगळीकडे घेरून टाकले.


झाले !!! हा ही कार्यक्रम कॅन्सल झाला....!


हळूहळू कोरोना ची लाट थोडी ओसरली.



आता सरळ लग्नच लावून टाकूयात म्हणून सगळ्यांनी विचार केला.


सगळ्यांचे वॅक्सीनेशन सुद्धा आटोपले.


पुन्हा तोच तारखांचा घोळ!!!!


कधी हिचं जमते तर त्याचे नाही अन् त्याचे जमते तर हिचे नाही!!!


एक तारीख फिक्स झाली चला ...! म्हणून सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकत तयारीला सुरुवात केली तर नेमकी प्रणित ची स्पेशलायझेशन ची परीक्षा समोर गेली.


पुन्हा नवी तारीख जमवली गेली. आता मात्र कसेही करून या तारखेला लग्न नक्की च! असं ठामपणे ठरवलं गेलं


हळूहळू ओमायक्रोन चा धोका संभवतो अशी चाहूल लागली पण आता पाच दहा लोकांत करायचे पण लग्न करायचेच हे पक्के ठरले.


कर्म धर्म संयोगाने ह्या लाटेची सुरुवात तरी जीवघेणी नसल्याने अन् त्यांच्या भागात त्या वेरीइंट चा प्रादुर्भाव नसल्याने आज अज्ञेयाचे लग्न आनंदात पार पडत होते.


अगदी मेहंदीच्या दिवसापासून सगळी नात्यातली मंडळी उत्साहाने सामील झाली .


सगळे जण पुरेशी काळजी घेऊन होते पण उत्साहाला सुद्धा उधाण आले .


बारगळलेला साखरपुड्या चा कार्यक्रमसुद्धा अगदी जिवलगांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला .तिच्या सगळ्या बहीण भावांनी केलेल्या छोटेखानी संगीत कार्यक्रमाने कार्यक्रमाला चार चांद लागले .


अतिशय जवळच्या अन् कमी लोकांच्या उपस्थितीत पार पडलेला हा सोहळा अगदी देखणा झाला होता. प्रणित आणि अज्ञेया ने घाई गडबडीत जमवलेला डान्स सुद्धा मस्तच झाला होता. उशिराने का होईना पण कार्यक्रम अगदी मनाजोगता पार पडला होता.


हळदीच्या दिवशी सुद्धा सगळ्या नातेवाईकांनी अगदी धमाल मस्ती केली होती. सगळ्या कुटुंबाचा एक सौहार्द मेळाच जणू भरला होता तिथे!


सगळ्या जिवलग बहिणी ,भाऊ ,भाऊजी,वहिनी सगळ्यांनी अगदी छोटेखानी गेम्स,अंताक्षरी ,संगीत पासून अगदी धमाल उडवून दिली होती.


खूप दिवसांनी ह्या अशा वातावरणात सगळे मनभरून भेटले होते.पुन्हा येऊ शकणाऱ्या तिसऱ्या लाटेचे सावट येण्याआधीच भेटीचा हा योग सगळ्यांनी जगून घेतला होता.


अन् आज तर ती घटिका आली होती ज्याची सगळी आतुरतेने वाट पाहत होते सगळे...!


अज्ञेया एवढी शिकली सवरलेली, कॉन्फिडन्ट पण आज मात्र तिचीही धडधड वाढलेली...!

शुचिर्भूत होऊन तयार होऊन गौरीहर पुजून मुहूर्ताची वाट बघत बसलेली अज्ञेया..!!!!


मैत्रिणींच्या गराड्यात त्यांच्या चिडवण्यात लाजेने चूर झालेली,आई बाबांच्या प्रेमाला आपण दुरावू हा विचार करून हळवी झालेली अन् प्रणित शी जीवन गाठ बांधायला आतुर झालेली...!


अनेक संमिश्र भावना तिच्या मनात दाटलेल्या...!


अन् जवळ आलेल्या वरातीत बंडवर गाणे वाजत असलेले....


बँड बाजा वरात घोडा

घेऊन या नवरोजी

लगीन घटिका समीप आली

करा हो लगीन घाई...


अन् वरात जवळ आलेली बघून अख्ख्या मंडपी वराच्या स्वागताची लगीन घाई झालेली अन् अज्ञेया ला सुद्धा मनात हुरहूर लागलेली बऱ्याच काळानंतर साधून आलेल्या या घटिकेची...!



आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा.

असेच अजून वाचण्यासाठी मला जरूर फॉलो करा.

लेख शेअर करायचा असेल तर माझ्या नावासकट च शेअर करा.

या लेखनाचे सर्वाधिकार लेखिके कडे सुरक्षित!

धन्यवाद!







Rate this content
Log in