डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Abstract

3  

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Abstract

# ती पण स्वतंत्र व्यक्तिमत्व..

# ती पण स्वतंत्र व्यक्तिमत्व..

2 mins
211


अलक १


"काय ग नोकरीचे काय करणार तू? नाही, आता डिलिव्हरी नंतर बाळाला सांभाळणं ही पहिली प्रायोरिटी आहे ना आई म्हणून तुझी!" सासूबाई

"हो सहा महिने हक्काच्या सुट्या आहेतच ,तोवर बाळ वरच्या दुधावर चं होईल.मग आम्ही आळी पळीने मॅनेज करू सगळे." ती

"काय बाई हे! तुम्हा आजकालच्या मुलींचे न काही समजतच नाही." सासूबाई


सुनेला काय चुकले कळतच नव्हते. मुलाच्या भविष्यासाठी नोकरी सुद्धा तेवढीच आवश्यक होती.


---------------------------------------


अलक २


प्रेगनन्सी चा शेवटचा trimester असूनही ती नेटाने आपले प्रोजेक्ट पूर्ण करत होती.सगळे तिचे कौतुक करायचे . तिच्या पुरुष सहकाऱ्याला मात्र तेव्हा तिची थोडी मदत करावी असं वाटलेच नाही.उलट ती फुकटची सहानुभूती मिळवते असा समज.


तिचे दिवस सुद्धा भरत आलेले अन् प्रोजेक्ट सुद्धा पूर्णत्वास चाललेला. आता मात्र त्याने तिला तिने तिच्या maternity leave घ्याव्या असे सुचवले.


सहानुभूती वगैरे काही नाही हो,ती बाजूला होताच संपूर्ण प्रोजेक्ट चे श्रेय लाटायला तो मोकळा ना!


--------------------------------------


अलक ३



माझी डॉक्टर असलेली मैत्रीण. दोघेही पतिपत्नी ओपीडी मधे बसायचे. मधल्या वेळात तिचे पती जवळच्याच  गावातील पेशंट बघून यायचे. त्यावेळात ती च ओपीडी बघायची.


बाकी पेशंट ला एवढा प्रॉब्लेम नसायचा पण वयस्क बायांना मात्र डॉक्टर साहेबच लागायचे.हा आहे एका बाईचा दुसऱ्या बाईवरचा विश्वास.😜


ती मला हसतच सांगत होती. लुगडेवाल्या बाया पेशंट म्हणून आल्या न की मी बघतच नसते. नवऱ्याला सांगते ए बघ तुझी पेशंट आली.😀


---------------------------------------


अलक ४



सिया नुकतीच ऑफिस मधून घरी आली. जाम थकली होती ती! आधीच मंथ एंड ची कामं करून त्रस्त, वरून बस मधली गर्दी अन् बसायला जागा न मिळाल्याने उभ्यानेच प्रवास करावा लागला होता.

घरी आल्यावर आयता चहा हाती येईल तर बरे असे वाटत होते.


घरी गेली अन् पाच मिनिटं बसलीच राहिली ती. सासूबाई तिरप्या नजरेने बघतच होत्या. तेवढ्यातच नवरा घरी आला. बॅग सोफ्यावर भिरकवून मस्त ऐसपैस बसला तो हुश्श करत.


"अगं किती थकून आला तो,त्याला काही चहापाणी देशील की अशीच बसली राहशील?" सासूबाईंचे लगेच फर्मान!


लगेच तिचे मन म्हणाले एवढी सहानुभूती माझ्याही साठी दाखवली असती तर बरं वाटलं असतं.



---------------------------------------


अलक ५



" आई जेवायला घेऊ का सगळ्यांना? " नवीन सुनेने सासूला विचारले.

" एकत्र जेवायची पद्धत नाही आहे या घरात! आधी सगळ्यांना वाढायचं मग मागून आपण बसायचं. आवडत नाही ह्यांना असं सोबत बसलेलं!" सासूबाई


ती सोडून सगळेच जेवले. सगळ्यांचे उरकल्यावर मागून ती!

सासऱ्यांना मात्र आज हे चित्र बरं नव्हतं वाटलं.

"अगं जुनं गेलं ते गेलं आपल्यासोबत ! आता मला वाटते आपण सगळे सोबतच जेवूया का?"

सासरे बुवांनी दबक्या आवाजात च सासूबाईंना विचारले.


माझी मेलीची कधी दया नाही आली आणि या आजकालच्या पोरीवर एवढी दया म्हणून सासूबाईंनी आकांडतांडव केला."



--------------------------------------

स्वातंत्र्य मग ते व्यक्तिस्वातंत्र्य का असेना प्रत्येकालाच प्रिय असते. जसे पुरुषाला तसेच स्त्रीला सुद्धा.स्त्रीकडे आम्ही स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून कधी बघणार??

एक स्त्री सुद्धा दुसऱ्या स्त्रीकडे त्या दृष्टीने बघत नाही ही शोकांतिका आहे.

हा लढा काही प्रमाणात अजूनही तसाच आहे.


काळ बदलला, आव्हानं बदलली पण संघर्ष मात्र तसाच चालू आहे आणि तो अविरतच चालणार आहे. तिच्या प्रगतीचा पायाच संघर्ष आहे आणि तो च तिच्या प्रगती पथातील मैलाचा दगड आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract