डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Inspirational

4.1  

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Inspirational

राजे शिवाजी अन् स्वराज्य

राजे शिवाजी अन् स्वराज्य

3 mins
193


अगदी बोटावर मोजण्या एवढे मावळे, ना युद्ध साहित्य, ना कुठलेच आर्थिक पाठबळ तरी दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर एका नव तरुणाने स्वराज्य स्थापन करावे!!!!!!

कित्येक गडकोट काबीज करावेत!!!!

कसं शक्य आहे हे????, नाही हा भ्रम असावा असं वाटण्या इतपत अनाकलनीय होतं हे सगळं.


अनेक जागीर अन् गडकिल्ल्यांचे स्वामी असल्याने एक दोन किल्ले जाऊनही पातशाहीला फारशी जाग आली नव्हती किंवा एका बालकाच्या उस्फुर्त बाललीला समजून त्यांची हेटाळणी केली गेली. अन् हेच शिवरायांच्या पथ्यावर पडले.


गडामागुन गड जिंकत राजेंनी ही स्वराज्याची विजयी घोडदौड कायम ठेवली.अन् मग पातशाही हादरली..!

शहाजीचा एवढासा पोरं आम्हाला शह देतोय???

चिरडून टाकू बंड त्याचे!! या उन्मादात च पातशाही गाफील राहिली अन् राजेंच्या स्वराज्याची पाळेमुळे अजून घट्ट रोवली गेली!!!!


अगदीच काही हाताशी नसतांना हे शक्य कसे झाले राजांना????

सगळ्यांना पडणारा प्रश्न काही वावगा नव्हता. खरंच कसं साध्य केलं हे सारं राजांनी???


यामागे होती राजांची कुशल युद्धनीती. युद्ध जिंकायला बळासोबतच बुद्धीचातुर्य,कल्पना शक्ती याचीही जोड असली की परिणाम किती वेगळे असू शकतात हे राजांनी त्यांच्या स्वराज्य स्थापनेतून दाखवून दिलं.


गनिमी कावा हा युद्धाप्रकार लोकप्रिय केला तो राजांनीच!

शत्रू बेसावध असतांना त्याच्यावर हल्ला करून त्याला जेरीस आणणे. कमी लोकांच्या सहाय्याने सुद्धा  त्यांचे वेगवेगळे गट करून काही विशिष्ट वेळेनंतर केलेले हल्ले,त्यामुळे शत्रूच्या संख्येविषयी समोरच्या गटात संभ्रम निर्माण व्हायचा अन् आपोआपच त्याचे मानसिक खच्चीकरण व्हायचे अन् हेच राजेंच्या पथ्यावर पडायचे.


राजांनी खुल्या मैदानात युद्ध कधी केलेच नाही कारण तुटपुंजे सैन्य अन् रसद यांच्या जोरावर अशी खुली युद्धे जिंकली जाऊ शकत नाहीत याची त्यांना पूर्ण कल्पना होती.


राजांची खूपदा टोळीनायक म्हणून हेटाळणी सुद्धा केली गेली पण अशा वल्गना ना राजांनी कधी भिकच घातली नाही.


त्यांची युद्धनीती अन् त्याचे नियोजन पाहिले की आजच्या मॅनेजमेंट गुरूंनी आश्चर्याने तोंडात बोटे घालावी असे जबरदस्त नियोजन असायचे.


राजांची अजून मोठी ताकद म्हणजे जीवाला जीव देणारे त्यांचे सवंगडी!

"आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं" म्हणत लेकाचं लग्न मागे ठेऊन प्राणार्पण करणारा तानाजी असो की राजे विशाळ गडावर पोहोचल्याचा संदेश मिळतपर्यंत प्राण पणाने खिंड लढवणारा बाजीप्रभू असो!

राजांना वाचवणारा जीवा महाला असो की प्रती शिवाजी म्हणून शत्रूला चकमा देणारा नेताजी असो...!

लाख गेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा मात्र जगलाच पाहिजे या भावनेने स्वराज्यासाठी लढणारा प्रत्येक मावळा म्हणजे राजांची फौज होती. एक एक लाखोंना भारी होता. हेच ते वैभव राजांच्या सेनेचे!!!

राजे तरी कुठे त्यांना सेना मानायचे?? त्यांच्यासाठी त्यांचे, माता,पिता ,सखा,बंधू सारे तेच होते. साऱ्यांचे सुखदुःख निवारण करणे राजे आपले कर्तव्य मानत होते.


जिजाऊंचे राजांवर असलेले संस्कार इतके बळकट होते की परस्त्री राजांनी नेहमीच मातेसमान मानली.

तिच्या अब्रुशी खेळणाऱ्या लोकांना कठोरात कठोर शिक्षा दिली.


राजांनी धर्म मग तो कोणताही असो नेहमीच त्याचा सन्मान अन् आदरच केला. उत्तम समजनिर्मितीचा धर्म हा पाया आहे हे राजांनी जाणले होते. सगळ्याच जाती अन् धर्माच्या लोकांना राजांच्या सेनेत अन् मंत्री मंडळात

स्थान दिलेले होते.


राजे न्याय प्रिय अन् कर्तव्यकठोर होते. राजांनी केलेले निवाडे बघितले की त्यांच्या कर्तव्य कठोरतेची जाणीव होते. जेणे करून पुन्हा ती चूक करण्यास कोणी धजावू नये हा त्यांचा उद्देश त्यातून सफल व्हायचा.


राजांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे राजांनी अनेक गडकोट काबीज तर केलेच पण अनेक गड कोट नव्याने निर्मिले सुद्धा. कारण गडकोटांचे भुई कोटांपेक्षा दुर्गम अन् सुरक्षित असणं राजांनी हेरलं होतं .म्हणूनच राजांची महत्वाची ठाणी,राजधानी ही गडकोटावरच होती.


राजांच्या राज्याचे अजून महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे राजांचे आरमार


राजांची दूरदृष्टी अन् काळाची पावले ओळखून नियोजन करण्याची वृत्ती यातून पुरेपूर दिसून येते.


राजांचे परराष्ट्रीय धोरण खूपच जाणिवेचे होते. शत्रूच्या मनातील कावा ओळखण्यात ते निष्णात होते.

राजांच्या हयातीत महा राष्ट्राच्या भूमीत इंग्रजांना कधीच पाय रोवता आले नाही हे राजांच्या ह्याच गुणांचे प्रतीक होते.


स्वराज्या च्या बेगमी साठी स्वारी केली पण स्त्री,अबालवृद्ध यांना कधी हात लावला नाही आणि जे केले ते आधीच अधिसूचना देऊन!!!

पण शिवाजी या नावाचा दरारा च इतका होता की न लुटता ही लोकं स्वतः हुन मदत करायला पुढे यायचे.


अफजल खानाचा वध,आग्र्याहून सुटका, शाहिस्तेखानाची कापलेली बोटं ही सारी सुंदर उदाहरणं आहेत राजांच्या बुद्धीचातुर्याने भरलेल्या युद्ध नीती ची!!!


अशा या महापराक्रमी, जाणता राजा असलेल्या जिजाऊच्या लेकाचा छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला अन् मां जिजाऊने पाहिलेले सुंदर स्वप्न साकार झाले ,साकार झाले.....!


पुन्हा अशी माता जिजाऊ अन् असा शिवबा होणे नाही!!!


नुसती शिवजयंती साजरी करून,हर हर महादेव च्या घोषणा देऊन अन् शिवाजी महाराज की जय म्हणून शिवबा आमच्या अंत:करणात वसणार नाही.त्यासाठी करावा लागेल जगर शिव विचारांचा!!!

त्यापुढे जाऊन मला असे वाटते की....


शिवराय जपावा मनात

शिवराय रुजावा विचारात

शिवराय करावा आत्मसात

शिवराय आणावा आचरणात


तेव्हाच कुठे ही शिव विचारांची बीजे अखंड तेवत राहतील..


संतास रक्षितो... शत्रू निखंदतो

भावंड भावना..संस्थापितो

ऐसा युगे युगे...स्मरणीय सर्वदा

माता पिता सखा... भूप तो


या ओळींमध्ये चपखल बसणारे राजांचे व्यक्तिमत्व साकारण्याचा अल्पसा प्रयत्न अन् राजांना

माझ्या लेखणीचा हा मानाचा मुजरा!!!!


त्रिवार अभिवादन राजे त्रिवार अभिवादन...!



Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational