Vilas Yadavrao kaklij

Abstract Tragedy Crime

3  

Vilas Yadavrao kaklij

Abstract Tragedy Crime

"सवत "भाग 2

"सवत "भाग 2

10 mins
244


मदन नेहमीप्रमाणे सकाळी शाळेत जायला निघाला. तेव्हा मदन च्या आईवडिलांनी मदन ला विचारले. अरे ! ही रत्ना .तिच्या मुलीला घेऊन आलेली आहे . किती दिवस राहणार ? तिची घरची मंडळी नाते वाईक वाट बघत असतील तेव्हा मात्र मदन बर ! बघू असं म्हणून नोकरीला निघाला . मात्र संगीताला माहिती झाल्यामुळे तिने सासूबाईला सांगितले. रत्ना ही दुसरी तिसरी कोणी नसून माझी 'सवत ' आहे. व तुमच्या मुलाने तिच्याशी दोन वर्षांपूर्वी लग्न केले आहे ! ते तुम्हाला ,मला न सांगता . आज मला त्यांनी घरात राहायचे असेल तर तिचा स्वीकार कर . किंवा घटस्फोट दे ? अशी धमकी दिली आहे .

मी तुमच्यासाठी , माझ्या मुलांसाठी , संसारासाठी ; समाजामध्ये आपली प्रतिष्ठा आहे . लोक चांगल्या नावाने ओळखतात त्याला बट्टा लागू नये म्हणून असं करते. मदनच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली . त्यांच्या वडिलांना जेव्हा माहिती झाली की लहानपणापासून मदन इतका साधा भोळा दिसणारा . मात्र तीन वर्षे होऊनही त्याने लग्न केल्याचे सांगितले नाही ?आपल्याशी तो खोट्या पद्धतीने वागला .मनस्ताप झाला. मनोमनी ते दुःखी होऊ लागले . मात्र मदन हा त्यांचा एकुलता एक मुलगा आणि त्यांचे स्वप्न पूर्ण केल्यामुळे काही बोलता येत नव्हते . लवकरच मदन बदली झाली. तेंव्हा मात्र मदन त्या गावी रुजू होण्यासाठी एकटाच निघाला. त्याला काय करावे सुचत नव्हते . कोणत्या ही एका पत्नीला नेले तर ? दुसरीला राग येणार ! त्यामुळे त्याने एकटाच जाण्याचं ठरवलं . दोन दिवसाचा प्रवास करून त्या गावी पोहचला त्याने राहण्याची सोय केली . एका खेडेगावांमध्ये बदली होती . नोकरी म्हटली त्या बदलीच्या गावी जाणे भाग होते. मदन त्या गावी ड्युटीवर रूजु झाला . मोठी शाळा होती . चार-पाच सहकारी शिक्षक होते .त्यांच्या ओळखीने त्याने गावामध्ये एक खोली घेतली. आणि जेवणाची व्यवस्था करण्यासाठी त्याने काहींना विचारले तेव्हा. त्या गावात कोणीही डबा देण्यासाठी तयार नव्हते . तेव्हा सहकारी मित्राणे अंगणवाडी ची सेवीका माझ्या ओळखीची आहे . म्हणून त्याने अंगणवाडी सेविका यांना विनंती केली . तिने डब्बा देण्यास तयारी दर्शविली. जेवण्याचे नी राहण्याची व्यवस्था झाल्यामुळे मदन आनंदा त होता . आठवडा भर ड्युटी करून शनिवारी घरी जायचे व सोमवारी परत शाळेवर यायचे असे त्यांनी नियोजन केले होते . आठवडा आनंदात गेला .दुसऱ्या आठवड्यात बऱ्यापैकी गावांमध्ये ओळखी वाढल्या. अंगणवाडी सेविकेला पगार कमी असल्यामुळे घरामध्ये स्वयंपाका साठी, किराणा,भरण्यासाठी पैशांची गरज होती. तेव्हा अंगणवाडी सेविका खेड्यामध्ये अंगणवाडी सेविकेला 'बाई ' असे संबोधले जात. त्यामुळे मदने अंगणवाडी सेविकेला किराणा आणण्यासाठी आगावू रक्कम दिली व आवडीच्या जेवणाचे पदार्थ आवडी निवडी सांगितल्या ! त्याप्रमाणे मदनला रोज सकाळी व सायंकाळी अंगणवाडी सेविका कडून डबा मिळत असे .त्यामुळे जेवणाची चिंता नव्हती. एक दिवस मात्र भरपूर वाट बघू नही डबा का ? येत नाही . वा अंगणवाडी सेविकेच घर थोड्या दूर अंतरावर असल्यामुळे कळत नव्हत . तेव्हा कोणत्या प्रकारची फोन ,मोबाइल ची सुविधा नव्हती. सायंकाळ झाल्यामुळे अंधार पडल्याने तर निरोप देण्यास दुसरा मार्ग नव्हता .शेवटी मदन स्वत :च चौकशीसाठी निघाला . सुगंधाचे घर शोधत घरी पोचला . एक छोटेसे खोलीमध्ये सुगंधाने संसार थाटला होता . घरामध्ये तीन मुलं व सुगंधा पलंगावर पडलेली होती .आवाज दिला . मात्र कोणी प्रतिसाद देत नव्हतं . म्हणून मदने आत प्रवेश केला. सुगंधा तापाने फणफण त पडली होती . त्यामुळे ती उठून स्वयंपाक करू शकत नव्हती . व जास्त ताप असल्यामुळे झोपली होती . डॉक्टर ची व्यवस्था नव्हती . त्यामुळे मी काही करू शकत नव्हतो .. मग त्यांनी विचारले .गावापासु बरेचअंतरावर डॉक्टर राहत होते . त्या गावात कधी तरी येत असत . तेव्हा मदने स्वतः जवळ असलेल्या तापाच्या गोळ्या स्वतःच्या हाताने दिल्या .सुगंधा ला बरे वाटले .


 आजच्या दिवस घरात कोणी नाही वाटतं चौकशी केली तिच्या दोन मोठ्या मुली व एक लहान मुलगा मोठ्या मुलीला विचारले पप्पा कुठे आहेत तेव्हा. ती मुलगी सांगू लागली पप्पा वारले आहेत .मदनला याविषयी काही कल्पना नव्हती. सकाळी दुसऱ्या दिवशी शाळेत सहकाऱ्यां जवळ चौकशी केली. सुगंधा चा नवरा अतिशय दारू पीत असल्यामुळे व्यसनाच्या आहारी जाऊन स्वतःची प्रॉपर्टी व सर्व काही विकून दारू पित . त्यामूळेच त्याचे लिव्हर खराब होऊन त्याचा मृत्यू झाला होता . त्याला आज दोन-तीन वर्षे झाली होती व सुगंधा या गावी पोट भरण्यासाठी आली होती .गावात पोलीस पाटील व इतरांच्या सहकार्याने स्वंय पाकात कुशल आणि पारंगत असल्यामुळे तिला सुरुवातीला अंगणवाडी सेविकेची सहाय्यक म्हणून काम दिले होते . मात्र नंतर सर्वकाही बघू लागली व हळूहळू पूर्ण वेळअंगणवाडी सेविका म्हणून तीर्धा नेमणूक झाली .त्यामुळे बऱ्यापैकी हजार पंधराशे रुपये पगार मिळत होता . खिचडी शिजवणे मूळे मुलींचे व तिचे जेवणाची गरज भागत होती . अशा पद्धतीने काट कसर करून व सुटीच्या दिवशी शेतीच्या कामाला जाऊन ! सुगंधा आपला संसार हाकत होती . सुगंधाला आई वडील कोणीही नव्हते .एकट असल्याकारणाने व त्याने सारी संपत्ती विकल्यामुळे मागे पुढे आधार म्हणून कोणी नव्हते. दोन पैसे मिळतील . संसाराला हातभार लागेल . या अपेक्षेने तिने मदन साठी डब्बा देण्याचे कबूल केले होते . मात्र गेल्या दोन आठवड्या पासून तयार करून देणे ते पाठवणे तिने प्रत्यक्ष मदनला बघितले नव्हते . किंवा मदने तिला बघितले नव्हते . मात्र जेव्हा मदन तिच्या घरी आला . तिला काही गोळ्या दिल्या सकाळी तिला बरे वाटले. दुसऱ्या दिवशी सकाळी डबा करून तिने मला पाठवला व निरोप पाठवला आता तब्येत बरी आहे . काळजी नसावी आपला डबा रोज वेळ येईल ! तेव्हा मात्र मदन ला बरे वाटले. मात्र मदन ने सुगंधाला ताप बघण्यासाठी हात लावला होता . तिच्या अंगात असलेला ताप आणि तिचे तेजस्वी शरीर !गोरी पान . अगदी कमी वयाची .

 चवळीच्या शेंगा प्रमाणे पातळ अशी 'सुगंधा' मदनच्या नजरेत भरली. व तिच्या हाताला चव असल्यामुळे अतिशय रुचकर आणि चविष्ट जेवण बनवत होती .हळू सहानुभूती म्हणून मदन मदत करू लागला . काही दिवसाने सुगंधाला मदन हा जवळचा काळजी करणारा . आपलाच माणूस वाटू लागला. आईला मदत करणे. हे गुण मदने त्याच्या वडिलां कडून घेतले होते . दुसऱ्याच कल्याण करणारे गुण मात्र ! मदने स्वतः विकसित केले होते. दोन -दोन , तीन - तीन आठवडे गावी जाण्यास जमत नव्हते. घरी दोन सावतीचा संसार व्यवस्थित चालू होता. घरी रत्नाची एक मुलगी. आणि आता रत्नाला दुसऱ्यांना दिवस गेले होते ! तिकडे मात्र दोन बायका असून सुद्धा मदनला दुसऱ्याच्या हाताने डब्बा घ्यावा लागत होता . खावा लागत होता . त्यामुळे त्याच्या मनात सतत सुगंधाला कोणी आधार नसल्यामुळे त्यांचा सहवास आपल्या वतीने ती जवळी क साधण्याचा प्रयत्न करू लागली. शेवटी निर्सगाने दिलेल्या शारीरिक गरजा भागवण्यासाठी शरीर आणि मन प्रयत्न करत असते. त्याप्रमाणे सुगंधाची मन ,शारीरिक भूक . आणि तारुण्याचे आकर्षण ! ती मदन च्या प्रेमात पडली व मदन चे स्वप्न बघू लागली. मदन मात्र कातरीत सापडला होता .शाळेचे भरपूर काम होते . परीक्षा झाल्यामुळे मदन सायंकाळी पेपर तपासत बसला . बराच वेळ झाला कळलेच नाही . रात्रीचे सात साडेसात झाले असतील. पण ? सुगंधाने डबा पाठवलेला नव्हता . त्यामुळे तो वाट बघत होता .आणि वादळाने पावसाचं वातावरण असल्यामुळे खेड्यातील विज गेली होती . एकदा गेली कि एक दोन दोन दिवस वीज पुरवठा सुरळीत होत नव्हता .

आज सकाळ पासून वादळी वारा आणि पावसाळी वातावरण असल्यामुळे सकाळपासून गेली होती . मदन मेणबत्तीच्या प्रकाशात आपलं शाळेचा काम करत होता . पावसाळी वातावरण असल्यामुळे डब्याला उशीर झाला असेल. म्हणून मदने दुर्लक्ष केले व येईल म्हणून वाट बघत होता . अचानक ! दरवाजावर टक-टक वाजल मदने दार उघडल तो समोर सुगंधा ! स्वतः डबा घेऊन आली होती . मदन ला हायसं वाटलं .ये ! पहिल्यांदा घरी आली .मदने घाईघाईने पाणी दिले मात्र नको म्हणत अग बस पहिल्यांदा रूमवर आली . बस बाहेर पावसाळी वातावरण असल्यामुळे व अचानक जोराचा पाऊस चालू झाला. ना मदन कडे छत्री , होती .ना सुगंध कडे ! त्यामुळे सुगंधाला रूमवर थांबणे शिवाय आता पर्याय नव्हता .

 साधारण अर्धा एक तास झाला असेल ! तरी पाऊस थांबण्याचे नाव घेत नव्हता. शेवटी तोपर्यंत जेवण करून घ्या ! तिने स्वतःच्या हाताने डबा उघडून मदनला जेवण करण्यास सांगितले . मला आज पहिल्यांदा सुगंधाच्या हाताने जेवण घेताना घरी संगीता चा भास झाला . हळूहळू त्याने काही पदार्थ तीला खायला दिले . दोघांनी आनंदाने जेवण संपवल बाहेर पाऊस उघडण्याच नाव घेत नव्हता. वाऱ्यामुळे अचानक मेणबत्ती विझली ! मदन काडीची पेटी शोधण्यासाठी निघाला ! मात्र अंधारामुळे त्याला काडी पेटी ही सापडत नव्हती. इकडे सुगंधा अंधारात उभी होती . बाहेर जाता येत नव्हतं तिला मनोमन वाटले जर अचानक कोणी बघितले तर ? गुरुजी च्या घरामध्ये ! काय होईल म्हणून ती घरी जाण्याची तयारी करु लागली . मात्र अंधारामुळे काही सुचत नव्हत . काडी पेटी बघत- बघत अचानक . सुगंधाशी धडक झाली !अंधारात खाली पडली . दोघेही खाली पडले . तेव्हा गुरुजींनी सुगंधाला पकडले आणि स्वारी म्हणून हात देऊन उठवल. सुगंधाच्या अंगामध्ये शहारे आले . गेल्या कित्येक वर्षापासून पुरुषाच्या अंगाला स्पर्श झालेला नव्हता. व शरीर त्यास स्वर्शाची वाट बघत होती . कारण ? निसर्गाने शरीरामध्ये अशा प्रकारची इंद्रिय व अवयव काही संवेदना या विशिष्ट कालावधीमध्ये त्या जाणवतात ? त्याप्रमाणे सुगंधाला आज अंगामध्ये कळा चमकल्या सारखा अंगावर शहारे आले .आणि तिने मदन ला घट्ट मिठी मारली. मदन ही घरी गेलेला नव्हता. पुरुषालाही एखाद्या स्त्रीचा स्पर्श झाला . कि त्यामध्ये असलेले पूरूषी मन जागृत होते .त्याप्रमाणे मदन ही भांबावला . मात्र सुगंधाची मीठी एवढी जबरदस्त होती की त्याला प्रतिकार काही करू शकला नाही . आणि निसर्गाने जणू त्यांच्यासाठी अंधार केला होता . त्यामुळे त्यांना दारही बंद करण्याची गरज भासली नाही . दोन ते तीन वर्षांपूर्वी नवऱ्याची साथ सोडलेली सुगंधा तिच्या शरीराची भूक एवढी तीव्र झाली होती . कि ?ती भागल्याशिवाय तिचं मन मदन ला सोडायला तयार नव्हत आणि शेवटी सुगंधाने आपली इच्छा पूर्ण करून घेतली ! मदन ही कित्येक दिवसां पासून उपाशी असल्यामुळे त्यालाही कोणत्या प्रकारचे कष्ट न घेता संधी चालून आली होती .त्यामुळे त्याने सुगंधाचा पुरेपूर उपभोग घेतला. बाहेर पाऊस थांबला होता. एक-दीड तासाने सुगंधा घाईघाईने आवरत घरी गेली ! मात्र मनोमन इतकी आनंदात झाली होती की पहिल्यांदा तिला आधार देणारा पुरुष आणि दैवाने त्याचे नाव 'मदन' होते. तिला सर्व मिळाल!. त्यामुळे रोजच तिला त्याची कोणत्या कारणाने त्यांची भेट घ्यावीशी वाटत होती. कोणत्या ना कोणत्या कारणाने आपली भूक भागवत होती . एक-दोन महिन्यांमध्ये मदन घरी चक्कर मारत होता .घरून परत आला कि त्या गावी महिनाभर. जात नव्हता कारण मदन ला कोणत्याही प्रकारची कमतरता भासत नव्हती . त्याला हव्या त्या गोष्टी !त्या ही या गावी मिळत होत्या. मात्र इतर कोणत्याही प्रकारची काळजी घेत नसल्याने सुगंधाला दोन मुली व एक मुलगा आणि ती त्यांच संगोपन करत होती . त्यातच मदन ने केलेला पराक्रम ! तिच्या शरीराने. आणि मदन पासून सुगंधाला दिवस गेले होते तिने मला सांगितले नाही . कारण .मदन ला सांगितले तर तो आपल्या पासून दूर जाईल. ! दुसऱ्या आठवड्यामध्ये बालवाडी सेविकांच ट्रेनिंग असल्याने सुगंधा तालुक्याच्या गावी गेली .तेथे असंख्य अंगणवाडीसेविकांचा जमाव जमला होता . व त्यांना सर्व प्रकारच्या मेडिकल सुविधा . पिडीत . गरोदर महिला तां सरकार्य करण्याच्या गावातील त्यासाठी सर्व कायदे प्रकारची माहिती दिली जात होती .महिलांवर होणारा अत्याचार त्यापासून रोखण्याची कारणं किंवा महिलांना आरोग्याच्या समस्या कशा निर्माण होतात ? त्या कशा सोडवाव्यात याची सुगंधाला चांगल्या प्रकारची माहिती व कायद्याचे ज्ञान झालं होतं . त्यामुळे सुगंधा त्या खेडेगावांमध्ये अतिशय आनंदाने आणि दिमाखाने राहत होती . साधारणत : तीन महिन्यानंतर तिला दिवस गेल्यामुळे शरिरावर सगळ्या प्रकारची चिन्ह दिसत होती . आजूबाजूच्या महिला त्या खेड्यातील वयस्कर बाया यांना शंका येऊ लागली .एक आजीने तर डायरेक विचारले अगं सुगंधा ! तुला नवरा वगैरे नाही तुझा नवरा जाऊन दोन वर्ष झाली .मग ? तुझ्या शरीरावर एवढेच कशाला ! काय कुठे माती खाल्ली की काय ? सुगंधाची अतिशय काळी ठिक्कर पडली . एक स्त्री ही दुसऱ्या स्त्रीच शहराची ताबडतोब ओळख करून शकते .त्याप्रमाणे त्या महिलांनी सुगंध आकडे काय तो प्रकार ओळखला व सल्ला दिला कि एक सोडून गेला ! आता दुसरा सांभाळणारा बघ . अन्यथा ही पोर सांभाळणे तुझ्या हातातलं सोप काम नाही .कारण सध्या तारुण्याचा आस्वाद घेतात व सोडून देतात . स्वतः सांभाळ म्हणून आजीने सल्ला दिला. सुगंधा अचानक भानावर आली . तीला वाटले की मदन ला या सर्व गोष्टी सांगाव्यात . तिने मदन ला त्या साठी त्याच्या रूमवर गेली . झाला प्रकार सांगितला मात्र मदनचे बारा वाजल्या प्रमाणे त्याचा चेहरा झाला . त्याला काय करावे ते सुचत नव्हते .त्याने तिला सांगितले. तालुक्याच्या गावी गावी जाऊन अॅबोर्शन करून घे! मात्र सुगंधाने नकार दिला व त्याला ठणकावून सांगितले कि तू माझा वापर केला आहे व मला आधाराची गरज आहे त्यामुळे तूला माझ्या शी लग्न करव लागेल किंवा माझा सांभाळ करावा लागेल. त्याला नकार दिल्यास मी पोलिसात तक्रार करेल ? व एका विधवा महिले वर बलात्कार केला . म्हणून गुन्हा दाखल करेल .कारण तिला स्त्रियांचा वर झालेला अत्याचार याविषयी सर्व कायद्यांची माहिती मिळालेली होती व तीने याचा गैरवापर करून बदला घेण्याचे ठरवले. दोघांमधला वाद विकोपाला गेला . मदन ला दुसरा पर्याय नव्हता व सुगंधा कोणत्याही प्रकारे ऐकायला तयार नव्हती . तीने बलात्काराचा गुन्हा दाखल केला तर ? आपल्याला सात वर्षाची शिक्षा आणि नोकरीवर पाणी सोडावे लागेल . व तिकडे आपले आई-वडील व घरी दोन्ही सवती. यांचा विचार करून मदने सामोपचाराने प्रकरण मिटवण्याचे ठरवले .व तो तिच्याशी चांगुलपणाने वागू लागला .आता जर सुगंधा शी लग्न केले . तर घरी संगीता हा गुन्हा दाखल केल्या शिवाय राहणार नाही व आपला सारा वेळ वाया जाईल त्याच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्लन करू लागला . सुगंधाचा कशा पद्धतीने प्रॉब्लेम सोडवायचा ? याविषयी तो विचार करू लागला........ ?.

------------------------

क्रमश : पुढील..भाग-3...



Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract