समुद्रावरच बेट
समुद्रावरच बेट
" समुद्रावरच बेट "
सागरकाठीच्या छोट्या खेड्यातील रोहन दर संध्याकाळी समुद्रावर जाऊन वेट घालायचा. लाटांच्या आवाजात त्याला एक वेगळीच शांती मिळायची.
एका दिवशी अचानक त्याच्या लक्षात आलं—किनाऱ्यावर वाळूत विचित्र आकार उमटले होते. माणसाचे नव्हते, प्राण्याचेही नव्हते. ते अगदी समुद्राच्या खोल तळातून आलेल्या कुणाचेतरी पाऊलखूण वाटत होते.
रोहन थोडा घाबरला, पण कुतूहलाने त्या खुणांचा मागोवा घेतला. थोडं पुढे गेल्यावर त्याला समुद्रात अर्धवट गाडलेलं एक जुनं लोखंडी पेटी सापडलं.
तो उत्साहाने पेटी उघडतो—आणि आत चमचमणारे शंख, काही जुन्या सोन्याच्या नाणी आणि एक पत्र! पत्रावर लिहिलं होतं:
“जो कुणी ही पेटी शोधेल, तो समुद्राचा मित्र. पण लक्षात ठेव, समुद्र घेऊनही जातो.”
रोहन घाबरून आजूबाजूला बघू लागला. लाटांचा आवाज अचानक प्रचंड झाला, जणू समुद्र त्याच्याकडे थेट काही सांगत होता.
त्या दिवसानंतर गावकरी म्हणतात, रोहन पुन्हा कधीच समुद्रावर वेट करायला गेला नाही…
****************
श्री. काकळीज विलास यादवराव नांदगाव )
