अपूर्ण लग्न भाग -४
अपूर्ण लग्न भाग -४
अपूर्ण लग्न (भाग ४ )
समाधान आज खूप खूष होता कारण स्वतःच्या घरि तो आपल्या बायकोला व बाळाला घेवून येणार होता इकडे आई वडिलांना नातवाला खेळवण्याचे सुखाला मुकावे लागणार कारण फार वर्षानीं त्यांचे स्वप्न साकार झाले होते व तिकडे मुलाची नोकरी व त्याचा संसारात लुडबुड नको म्हणून आनंदाने आमची जाण्याची तयारी करत होते आम्ही नातवाला भेटायला रोज येवू त्याला चांगले सांभाळा ! सूनबाई त्याला आंघोळ नीट घाल ! लहान मुलांना काय झाले हे सांगता येत नाही ते आईलाच कळते मात्र आज च्या मुलींना फक्त मेकम व इतर सर्व कळते मात्र संसारातील खरी सत्य व स्वप्न कळत नाही कारण त्यांना जुने म्हातारे माणसे ! सासू अशी माणसे घरात अडचण वाटते आजी बाईचा बटवा या अंधश्रध्दा व अडाणीपणाचे दोतक वाटते त्यामुळे त्यांना , बाळांना त्रास होतो . संस्कार ह्या विचित्र प्रथा वाटतात अनुभवाचे बोल त्यांना वेडेपणा वाटतो . मात्र डॉक्टर सांगेल ते खरे वाटते व त्यांनी घेतलेला खर्च अत्यावश्यक वाटतो मात्र गेल्या पिढयांन पिढ्यांचा अनुभवांचा डॉक्टर आम्हाला नकोय धुनी ,काढा ,लेप बाळंतीचे खाण्याची पथ्ये यांना नकोय कारण हि पिढी सुसक्षित झाली . संस्कृती सोडून विकृती छान वाटते . फिगर मेन्टेन रहाण्यासाठी या बाळाला सहा महिने दुध पाजत नाही परिणामी त्याची प्रतिकार शक्ती कमी रहाते व ते कुपोषित होते मग यांना डॉक्टर प्लॅन देतात कॉम्प्लॅन बॉय , पिंकू ग्राईफ वॉटर , हर्षल प्रॉडक्ट हि मात्र चालतात फास्ट फुड देवून मुळे फक्त शरिराने फोफसी होतात पण शारिरीक व मानसिक रित्या मात्र अंपग बनतात मग यांचे क्लॉस सुरू होतात उन्हाळी । हिवाळी , पावसाळी शिबीरे ! व्यक्तिमत्व विकास ! क्लासेस !
नविन आईवडील बनण्याऱ्यांसाठी पालकत्व एक जबाबदारी !
बालकांनी कसे वाढवावे ! पाळणाघरे कशी निवडावीत ! त्यांचे साठी दाईची निवड कशी करावी ! या सर्व व्यावसायिक लोकांचे ग्राहक म्हणजे आजची सुशिशि पिढी ! मात्र जी गरिब अशिक्षित व ग्रामिण भागात आर्थिक स्थिती चांगली नसल्याने पर्याय एकच घरगुती उपाय व उपचार पद्धती सुरू ठेवणे ! परिणामी ग्रामिण भागातील लोकांचे जीवन कठीण असले तरी समाधानी संस्कृती न सोडलेले सुसंस्कृत समाज ! आजही माणूसकी व माणूसपण जपणारी पिठी स्वतःचे दुःख गिळून दुसऱ्यांचे सुख हिरावून न घेणारी पिठी त्यातील माझे आई वडिल होते. आम्हालां निरोप देतांना मला त्यांचे तील दुःख व भावना चेहऱ्यावर मला वाचता येत होत्या मात्र माझी सारिका त्यांचा आर्शिवाद घेवून आम्ही निघोलो होतो एका विनाअनुदानित शिक्षकाचा अनुदानित स्वरूपात बदल झालेला संसार . . . .
(क्रमशः पुढे भाग -५ )
*********
श्री काकळीज विलास यादवराव ( नांदगाव )
