"अपूर्ण लग्न "भाग ३
"अपूर्ण लग्न "भाग ३
क्रमशः (भाग -३)
"अपूर्ण लग्न "
आज दोन महिने झालेत शेवटी सरिकाला घेण्यासाठी सुटीत येणार असा निरोप दिला तीला मात्र इतका आनंद झाला कि बस आयुष्यात एक स्त्रीला पूर्णत्व प्राप्त होते ते जेंव्हा ती आई होते .ती ची तीसरी भूमिका घेतली होती. सासू सासरे यांनी प्रथे प्रमाणे बाळंतीण ची खानगी करण्यासाठी पूर्ण तयारी केली होती मीही वडिलांना व इतर दोघांना पाठवले त्या गावातून एकच बस होती ती गेली किं नंतर दुसऱ्या दिवसाची वाट पहावी लागत त्यामुळे एक तास आधी सर्व लवाजमा घेवून ते सर्व बस स्टॅड अर्थात कच्च्या रस्त्यावर कडेला उभी राहिली होती . मात्र मनात संसाराची स्वप्न बघून मार्ग शोधण्यासी माणूस कसा धडपडत असतो . सासऱ्यांची परिस्थिती सामान्य होती तरीही पोटाला चिमटा घेऊन गादी , लाकडी बाज,काही थोटी मोठी भांडीकुंडी सोबत शिदोरी दिली जाते सासरी आल्यानंतर सर्व भाऊबंद शेजारी अर्थात पूर्ण गाव बोलवतात शिदोरी घ्यायला त्याला बांळत विडा असे म्हणतात . त्या निमित्ताने बाळ झाले हे अधिकृत घोषणा करण्यात येते घराचा वारस म्हणून जगजाहिर केले जाते दोन दिवस गावी गेल्यावर सोमवारी पुन्हा शाळेच्या गावी आम्हांला यावे लागेल तेंव्हा परत सोपस्कर पार पाडून यावे लागेल व शाळेत जावे लागेल . आई वडिल नांतवांला बघून आनंदी झाले आम्हांला नांतवड खेळवण्यास मिळाला काहिंना हेही भाग्य मिळत नाही काहीनां अपत्य सुख नसते मात्र नशिबाने साथ दिली आम्हांला सर्व काही सुरळीत चालू आहे .
क्रमश: (भाग ३ )
_ श्री काकळीज विलास यादवराव (नांदगाव )

