अपूर्ण लग्न " (कथा क्रमशः भाग - ५)
अपूर्ण लग्न " (कथा क्रमशः भाग - ५)
भाग -६
"अपूर्ण लग्न "
क्रमशः - समाधान मानावे लागते व जगावे लागते यात्रमाणे समाधान पगाराची अपेक्षा करत दिवस काढा होता एका खाजगी संस्थेत नोकरी असल्याने बंधने पाळावी लागत होती . पगार शासनाचा कामे शाळेची व रुबाब संस्थेतीत बॉसचा स्वतःची नेमणुक मुख्याध्यापक म्हणून ! मुलगा सचिव व इतर सर्व पदाधिकारी सर्व कारभार घरातच सारी सरकारी नियम धाब्यावर बसवून कामकाज सुरू होते सध्यांकाळी किंवा बोलवेल तेंव्हा ते मुख्याध्यापक हजर एक सरकारी कर्मचारी क्लास टु चा दर्जा पोस्ट ग्रॅज्युएट व्यक्ती मात्र स्वाभिमान गहाण ठे वून संस्था चालकाच्या घरि त्याचे खुर्ची समोर एकाद्या अपराध्या प्रमाणे उभे रहावून साधा पदवीधरही नसणारा सचिव , १२वी नापास बायको सहसचिव इतरांचे तर विचारू नका ! या सरकारी नोकरी खाजगी वर्चस्व व स्वाभिमान गहाण ठेवून एक मास्तरकी चे बुजगावणे म्हणून जगणे स्वतःच्या डोकयाचा वापर करून विद्यार्थ्यासाठीच्या योजना सुरू करायच्या नाहीत वा परस्पर योजना राबवायच्या नाहीत फक्त आम्हांला पैसे कसे कमवायचे एवढे सांगा बस ! बाकी त्यांचे हात वरपर्यत पोहचलेले असत तक्रार करण्याची कल्पनाही करू शकत नव्हते ! अर्थात मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार ? या प्रमाणे वागायचे त्याचा राग शाळेत इतर कर्मचारी वर काढायचा बस शाळेत चार शिपायांची नेमणुक मात्र एक संस्था मालकाच्या घरी घरगडी म्हणून काम करत व इतर दोन त्यांचे पेट्रेल पंपावर नेमणुक करण्यात आली तीसरा शेती चा रखवालदार साऱ्या सिस्टिमला माहिती तरीही वर्षो न वर्ष हे चालुच होते ? ! या मुख्याध्यापकच्या आधी नात्यातील होते पण शहाणपणा केला त्याचे वर भष्ट्राचाराचा आरोप करून गुन्हा दाखल करण्यात आला . कोर्टात केस दाखल केली पगार बंद बदनामी जास्त मेडिया त्यांचा फोटो सह बातमी छापून आली . . वकिलास फि देणे व केस लगणे जमत नव्हते शेवटी केस सोडून दिली व एक भ्रष्टाचारी शिव्का असलेला स्वतःच्या गावात मजुरी करून पोट भरत आहे . भावी पिढीला स्वाभिमान , अभिमान शिकवणारा मास्तर आज सारी मुले आई वडिलांची स्वप्ने व जीवनात 30 वर्ष शिक्षणात घालून आज मजुर म्हणून व मुलगा , मुलगी स्वतः सारखी शिकवून उच्च शिक्षण घेऊन भविष्य घडवण्याची स्वप्न ती स्वप्नच राहिली घरात भांडणे वाढली बायको मुलांना घेऊन माहेरी निघून गेली आज एकटा देवदास म्हणून जीवन जगत आहे . वैयाक्तिक काहीही गुन्हा नसतांना!
सत्ता तेथे शहाणपण ! ज्या ठेकेदारा कडे मजुर म्हणून काम करत आहे तो तर त्याच संस्था चालकाच्या घरी वाकू वहात होता व मी एक फावडे घेवून वाळू खाली करत होता ! व त्या ट्रॅक्टरचा ड्रायव्हर एक द्वाड , खोडकर मूलगा मध्येच शाळा सोडून गेला होतो तो म्हणाला सर ! तुम्ही म्हणत होता ! प्रामाणिक पणा , शिस्त , शिक्षणाने माणूस मोठा होतो सर तुम्ही मला सांगत होते . आणि आज ? कोण मोठा आहे सर माझेकडे चार ट्रॅक्टर , वाळूचा ठेका ! बंगला व सर पाच एकर जमिन घेवून सुखाने जीवन जगत आहे! मला तीन मूली व एक मुलगा शहरात शिकत आहे झोपडीचा बंगला झाला . एका मुलाची कंपास बॉक्स चोरला म्हणून दिवसभर मला ऑफिस बाहेर उभे ठेवून बापाला सांगून तुडवला होता तो माझा शाळेचा शेवटचा दिवस झाला मी बापाला घाबरून पळून गेलो इकडे तिकडे फिरत दिवस काढले पडत ते काम केले . कष्टाने शिक्षणाशिवाय मोठा झालो . माझेवरही ठेकेदाराने अनेक चोरीचे आरोप केले होतें पोलिसांनी तुडवले होते. पण पैशे देवून बाहेर येण्याचे मार्ग कळाले होते. व आज सर माझेवर अनेक गुन्हे दाखल आहेत तरीही सरपंच , सांगा सर !
क्रमशः (भाग - ७)
@@@@@@@@@@@
श्री. काकळीज विलास यादवराव (नांदगाव )
