STORYMIRROR

Namita Dhiraj Tandel

Classics

3.2  

Namita Dhiraj Tandel

Classics

सुखद सप्तरंगी इंद्रधनुष्य

सुखद सप्तरंगी इंद्रधनुष्य

3 mins
497


राणी व अभयचे एकमेकांवर खूप प्रेम होते.. दोघंं एका गावात राहत होतेे.. पण जात वेगळी असल्यामुळे समाजाची भिती दाखवून राणीच्या वडिलांनी तिला अभयशी नाते तोडायला सांगितले.. राणी देखील घाबरून त्याच्यापासून लांब गेली..

   

राणी एकदा चुलत बहिणीच्या लग्नाला मुंबईला आली.. लाल साडीत केसाचा फ्रेंच रोल व मोत्त्यांचे दागिने परिधान केलेली राणी सुंदर दिसत होती.. लग्न मांडवात बहुतेक नजरा तिच्यावर खिळल्या होत्या.. त्यावेळी तिला एक लग्नाची मागणी आली.. ते मागणं तिची चुलत मामी घेऊन आली होती.. राणीबरोबर घरातील दहा मंडळी मुलाचे घर पाहण्यासाठी गेले.. घर सुंदर आणि टापटीप होते.. नवरा मुलगा विकास एका कंपनीमध्ये मॅनेजर होता.. दिसायला उंच, धडधाकट आणि सावळा.. घराणे देखील नावाजलेले शिवाय जातीतले होते.. राणीच्या घरातील मंडळीनी मागे पुढे काही न पाहता होकार दिला आणि सहा महिन्यांत लग्न लाऊन दिलं..


कामकाजाची पूर्वीपासूनच सवय असल्यामुळे सगळ्या जबाबदाऱ्या ती योग्य रीतीने सांभाळत होती.. प्रत्येक सणासुदीला, लग्न, कोणाचे काही दुःख अशा वेळी जात होती.. पण तिचा नवरा तिच्या बरोबर कधी दिसत नव्हता.. सगळे तिला प्रश्न करायचे.. पण त्यांना सुट्टी नाही असे सांगून ती टाळायची.. तिच्याकडे बघून असे कधी वाटले नाही की तिला काही दुःख असावे?


कारण त्यामागे खुप मोठ रहस्य दडलेले होते.. विकासचे लग्नाआधीच एका मुलीवर प्रेम होते.. पण ती ख्रिश्चन धर्मातली असल्यामुळे ह्याच्या घरच्यांनी विरोध केला होता.. पण विकास त्याच्या निश्चयावर ठाम होता.. सगळ्यांच्या सांगण्यानुसार राणीशी लग्न केले होते.. म्हणून तो राणी बरोबर कुठे येत जात नव्हता.. शिवाय तिच्या शरीरालादेखील कधी स्पर्श केला नव्हता.. विकास आज सुधारेल उद्या सुधारेल ह्या आशेवर राणीने पूर्ण वर्ष घालवले.. सगळ्यांच्या प्रश्नाची उत्तरं नेहमी देऊन तिची चिडचिड झाली होती.. घरामध्ये वातावरण खूप बिघडले होते.. एक दिवस विकासने तिला खूप मारहाण केली.. राणी घरातू

न कधी निघून जाते ह्याचीच वाट विकास पाहत होता आणि तो दिवस आला.. त्या रात्री ती घरातून माहेर वाटेस निघाली.. पण एवढ्या रात्री ती कुठे गेली किंवा काय केलं का? ह्याचा जरादेखील तपास विकासने केला नाही..


राणीच्या घरच्यांनीसुद्धा ठरवले की जोपर्यंत विकास घेण्यासाठी येत नाही तोपर्यंत तिला पाठवायचे नाही.. पूर्ण एक वर्ष वाट बघून शेवटी राणीच्या घरच्यांनी घटस्फोटासाठी कोर्टात अपील केले.. विकासने लगेच घटस्फोट स्वीकारून चार लाख रुपये पोटगीसुद्धा देऊन टाकली.. बिचाऱ्या राणीने सगळे दिवस अंधारात काढले होते. त्यापुढे ही रक्कम काहीच नव्हती.. विकासने घटस्फोटानंतर लगेच ख्रिश्चन मुलीबरोबर लग्न केले..


एकीकडे राणीने समाजाला घाबरून अभयशी लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता आणि दुसरीकडे हा विकास होता की, त्याने समाजाला दाखवण्यापुरता राणीशी लग्न केले अन् तिच्या आयुष्याची पार वाट लावली..


जेव्हा सगळीकडे राणीच्या घटस्फोटाची वार्ता गावात पसरली तेव्हा अभयच्या वडिलांनी राणीच्या घरी येऊन लग्नासाठी मागणी घातली आणि म्हणाले, "पोरांनी समाजापोटी एवढी वर्ष अंधारात काढली.. आता जातभेद काही बघायची नाही.. आधीच त्यांच्या मनासारखे झाले असते.. तर ही वेळ आलीच नसती.."


राणीच्या वडिलांनी हात जोडुन त्यांची माफी मागितली आणि गळाभेट घेतली.. पुन्हा दोघांंच्याा आयुष्यात सप्तरंगी इंद्रधनु उमटले... चि.अभय आणि चि. सौ. का राणी यांचा विवाह सोहळा संपन्न झाला.. तीन महिन्यात घरात गोड बातमी देखील आली.. अभय तिच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करत होता.. सासू आणि सासरे तिला मुलीसारखं जपत होते..


आकाशात काळे ढग येतात आणि पाऊस सैरावैरा पडत राहतो.. काही वेळाने वादळ शांत होऊन आकाश अगदी स्वच्छंदी होऊन जातं.. त्यानंतर

सूर्याची किरणे सगळीकडे प्रकाश घेऊन येतात आणि आकाशात उमटते ते सप्तरंगी इंद्रधनुष्य... प्रत्येकाच्या आयुष्यात एखाद्या सैराट वादळानंतर सुखद इंद्रधनुष्य उमटतेच...


Rate this content
Log in