Namita Dhiraj Tandel

Others

3  

Namita Dhiraj Tandel

Others

अस्तित्वाचा स्वीकार भाग ३

अस्तित्वाचा स्वीकार भाग ३

2 mins
199


पंकजने तिची डायरी हातात घेतली. एक एक पान वाचताना तो तिच्या कवितांच्या विश्वात हरवून गेला. मनाच्या तळाशी साठलेला गाळ एका गहन शब्दांत प्रत्येक पानावर उमटलेला होता. क्षणभर तो तिच्या कवितांच्या प्रेमातच पडला. "मी तिच्या दिसण्यावर जात होतो. तिच्या मनाचं सौंदर्य जाणून घेण्याचा प्रयत्नच केला नाही." स्वतःशी बोलत त्याने डायरी जागेवर ठेवली आणि खाली निघुन गेला.

पंकजच्या स्वभावात पहिल्या पेक्षा खुप बदल झाला होता. तिच्या निर्मळ स्वभावाचा त्याला ठाव लागला होता. तो कितीतरी वेळा तिचा अपमान करायचा. पण तिने कधी प्रती उत्तर म्हणून दिले नव्हते की, कधी राग दाखवला नाही. घरातील सगळ्या बाबतीत ती परफेक्ट होती. येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांचे पाहुणचार, आईचे दुखणे, पंकज बद्दलची काळजी ह्या सगळ्या गोष्टीनी पंकज तिच्या वर इंप्रेस झाला होता. पाच महिन्यांत कधी तिच्यावर मनोमन प्रेम करू लागला. हे त्याला सुद्धा कळले नव्हते.

एक दिवस पंकजचा चांगला मूड बघुन आई म्हणाली, "आता बाळाचा विचार मनावर घे. माझे काय? मी आज आहे. उदया नाही कोणी बघितले आहे. नातवाचे तोंड बघितलं की, मी म्हातारी मोकळी होईल रे."

नेहमी टाळाटाळ करणारा पंकज आज रोमँटिक मुड मध्ये होता. त्याने लॅपटॉप वर गाणं लावलं होतं. पल पल दिल के पास तुम रेहती हो. त्याची चोर नजर तिने हेरली होती. पोटात येणारा भीतीचा गोळा तिला त्रास देऊ लागला होता. कारण लग्नाला पाच महिने झाले होते. पाच महिन्यांत ते एकदा देखील एकमेकांच्या जवळ गेले नव्हते.

भीतीने सीमा घामाघूम झाली होती. लग्नाची पहिली रात्र ही मधू चंद्राची रात्र असते. पण त्या दिवशी ती त्याच्या पासून अलिप्त राहिली होती. खरी परिस्थिती तिने घाबरून त्याला सांगितली नव्हती. एवढ्या महिन्या पासून सांगायला पाहत असताना भीतीने तिचा थरकाप उडायचा आणि ती पुन्हा शांत बसायची. आज ती वेळ येणार असे तिला निश्चिंत वाटू लागले. जे होईल ते होईल असा विचार करून ती खंबीर झाली.

रात्री सगळी काम आटपून झाल्यावर ती बेडरूम मध्ये आली. पाहते तर काय? आज त्याने अंथरूण खाली घातले नव्हते. तो बिछाना व्यवस्थित करत होता. तिला पाहताच तो म्हणाला," उभी का आहेस? बस.. एवढे महिने एकांतात काढलेल्या दिवसांची आज समाप्ती झाली आहे. मनापासून तुझा आज स्वीकार करतोय." असं म्हणत त्याने तिच्या केसांवरून हात फिरवला.

तिचा घाबरलेला चेहरा पाहून तो म्हणाला," तुला जी शिक्षा द्यायची आहे ती मला दे ."

घाबरतच तीने बोलायला सुरुवात केली,"शिक्षा तर तुम्ही मला द्यायला हवी. माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाची गोष्ट पहिल्या रात्री तुम्हाला सांगायची होती.पण त्या दिवसा पासून तुमचं वागणं पाहून मला असं वाटलं की, लवकरच तुम्ही मला सोडून द्याल."

पंकजचा चेहरा पूर्ण पांढरा फिकट पडला.तो म्हणाला,"काय? कोणी आहे का तुझ्या आयुष्यात?"

क्रमशः



Rate this content
Log in