Namita Dhiraj Tandel

Others

3.8  

Namita Dhiraj Tandel

Others

अस्तित्वाचा स्वीकार - भाग ५

अस्तित्वाचा स्वीकार - भाग ५

3 mins
285


दोघींच्या रडण्याचा आवाज ऐकून पंकजला जाग आली. तो लगेच उठून बाहेर आला. आई सीमाशी बोलत होती.

"मागच्या खेपेस तुझी मामी आली होती. तुला स्वयंपाक खोलीत धमकावत असताना दाराच्या आड मी सगळं ऐकलं होतं. मी काय करावं आणि काय बोलावं? मलाच काही सुचत नव्हते. कारण कमी शिकलेली आणि गावा कडची सून मलाच पाहिजे होती. ह्यांत मीच माझ्या मुलाचे नुकसान केले. त्याचे प्रेमाने लग्न होऊ दिले नाही आणि दुसऱ्या बाजूला...." स्पष्टीकरण देत आईने हंबरडा फोडला.

" पंकज! तुम्ही दुसरे लग्न करा. मी कुठे गेली. काय झालं. ह्या गोष्टीची कुणालाही कानोकान खबर लागणार नाही. तुम्ही माझ्या बाबतीत निश्चिंत राहा. इथून बाहेर पडल्यावर माझी खरी ओळख मी कोणाला दाखवणार नाही." सीमा हुंदके देत बोलत होती.

पंकज तिला समजावण्याच्या स्वरात बोलू लागला,"लग्नाला फक्त पाच महिने झाले आहेत. हा संसार कायम तुझाच राहील. सप्तपदी चालून आपण एकमेकांस वचन दिले आहे. भरलेला संसार असा अर्ध्यावर सोडून द्यायचा. तुला असे रडवून रस्त्यावर सोडू शकत नाही. तुला वणवण फिरून ज्या यातना मिळतील. ते पाप आम्ही कुठे फेडणार? तुला दुःख देऊन आम्ही तरी सुखी राहू का? ह्या सगळ्यांत कोणाची चुकी नाही. हे सारे नियतीचे खेळ. जे घडायचं तेच घडतं. त्या गोष्टीस तुम्ही आम्ही कोणी टाळू शकत नाही. मी पुर्णपणे अस्तित्वाचा स्वीकार करायला तयार आहे." पंकजने बोलणं संपवत आईकडे नजर टाकली.

आई काही बोलायच्या आधीच सीमा बोलायचा प्रयत्न करू लागली. कारण रडून रडून तिच्या मुखातून शब्द व्यवस्थित फुटत नव्हते. "सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे ह्या घराची परंपरा पुढे चालवायला वारस तर पाहिजे. जसे देवघराला देवां शिवाय शोभा नाही. तसेच घराला अपत्या शिवाय. मला असे वाटते आपला अपारंपारिक विवाह कधीच यशस्वी होऊ शकणार नाही. उचक्या देत ती बोलून मोकळी झाली.

सीमाच्या डोक्या वरून मायेचा हात फिरवत आई म्हणाली.. "जर पंकजच्या बाबतीत काही अशी समस्या असती आणि तुला नंतर माहिती पडले असते. तर तू काय केलं असतं? त्याला सोडून गेली असतीस का? नाही ना. मग आम्ही तुला कसं काय सोडणार.. मला नातवंडं पाहिजे आहेत.. पण तुझा त्याग करून नाही.. तू घरात आल्यापासून सगळया गोष्टीची काळजी व्यवस्थित घेतलीस. माझे पथ्य औषध पाणी सगळं अगदी नियमा नुसार.. अगदी पोटच्या मुलीसारखी काळजी घेतेस.. मुलीला कुणी घराबाहेर काढतं का?" अखेर आईच्या मनाचा बांध फुटला.

"ज्यांना मुल होत नाही. ते काय करतात? जर संसार सुखाचा करायचा असेल. तर त्यासाठी देखील मार्ग आहेत. आपण मुलं दत्तक घेऊ. अनाथ आश्रम मधील मुलांना आई वडिलांची गरज असतें. अक्षर वळणदार कसे काढावे हे आपल्या हातात असते. अगदी तसंच लहानपणी पासून मुलांवर जसे संस्कार होतात. तशी ती मुलं घडतात. पालक आपल्या मुलांच्या बाबतीत कर्तव्य दक्ष असतातच. पण ते एक व्यक्ती सुद्धा घडवत असतात. आपले नाते रक्ताचे ना सही. पण आपण एक मुलगी व एक मुलगा दत्तक घेऊन आपलं कुटुंब पूर्णत्वास नेऊया." पंकजने मत स्पष्ट केले.

"तुम्ही किती सकारात्मक विचारांचे आहात. मी तुमची आयुष्यभर ऋणी राहीन. माझ्या आई वडिलांचे माझ्यावर खुप आशीर्वाद आहेत. म्हणूनच तुमच्या सारखी सदगुणी माणसं माझ्या आयुष्यात प्रेमाचे रंग भरायला आली. नाहीतर माझा पंथ..." इतक्यात पंकजने तिच्या ओठावर हात ठेवला.

"आपला विवाह अपारंपरिक असला तरी देवा ब्राह्मणाच्या साक्षीने पारंपरिक होता आणि कायम पारंपरिक राहील. तुझे आई वडील असे पर्यंत तु जसे नॉर्मल आयुष्य जगत आली होतीस. त्यांच्या इच्छे नुसार तुला तसेच आयुष्य जगण्याचा अधिकार आहे." पंकज व्यक्त झाला. आई देखील त्याच्या मताशी सहमत झाली.

सागराच्या संथ लाटे प्रमाणे सीमाचे मन हेलकावे घेत होतं. प्रेमाची नौका तिला अनेक विचार करण्यास भाग पाडत होती. निसर्गाने दिलेली ठेव ह्यामध्ये बदल करता येत नाही. कुणाचा अपारंपरिक विवाह यशस्वी होईलच असे नाही. कारण इथे प्रत्येकाच्या नशिबाचा भाग वेगळा......


(समाप्त)


Rate this content
Log in