Namita Dhiraj Tandel

Romance Fantasy Inspirational

4.0  

Namita Dhiraj Tandel

Romance Fantasy Inspirational

व्हॅलेंटाईन प्रेमाचा स्वीकार

व्हॅलेंटाईन प्रेमाचा स्वीकार

6 mins
254


प्रियंका सुयशची वरिष्ठ अधिकारी होती.. दहा वर्ष एकत्र कार्यरत असताना दोघांमध्ये मैत्रीचं निखळ नातं निर्माण झालं होतं..प्रियंका सुयशला मनापासुन मित्र मनात होती.पण सुयश प्रियांकाच्या प्रेमात पडला आहे .. ही गोष्ट जगजाहीर होती..


व्हॅलेंटाईन आठवडा सुरू झाला होता.. त्याच आठवडयात शनिवारी ऑफिसची पार्टी होती.. नेमकाच प्रपोज डे सुद्धा त्याच दिवशी होता.. पार्टी सुरू असताना सुयशला कोणी सहकारी मागुन चिडवत होता.. दारू पिऊन प्रियंका आणि सुयश बद्दल काहीतरी अभद्र बोलत होता.. ते ऐकुन सुयशची तळपायाची आग मस्तकात गेली.. त्याने त्या सहकाऱ्याला मारायला सुरुवात केली.. घोळका पाहून वरिष्ठ अधिकारी जमा झाले..


प्रियांका सुयशला म्हणाली,"सुयश!काय प्रकार आहे हा.."


सहकारी घडला प्रकार दारूच्या नशेतच बोलत होता.. प्रियांका नाराज होऊन तशीच पार्टी सोडुन घरी जाण्याची तयारी करू लागली.. सुयश तिच्या मागोमाग आला.. त्याने मनाशी ठाम निश्चय केला होता.. आज तो प्रियांकाला मनातले सांगितल्या शिवाय राहणार नाही.. प्रियांकाने कार पार्किंग मधुन बाहेर काढली.. गेटच्या बाहेर सुयश उभा होता.. खिडकीच्या काचेवर खुणावत त्याने काच उघडायला सांगितली.. तिने काच खाली करताच तो बोलायला लागला.."मला तुझ्या आई आणि बाबांसोबत काही महत्वाचे बोलायचे आहे.."


"सुयश! काय बोलणार आहेस तु आई बाबांना.."


"तुझ्या बाबांकडे आपल्या लग्नाची मागणी करायची आहे.. लग्नासाठी तुला प्रपोज करतो आहे.. will you marry me? तो स्पष्ट बोलुन गेला.."


"अरे ! पण मला लग्न करायचं नाहीये.. किती वेळा प्रत्येकाला तेच सांगायचं.." ती नाराज होत बोलली..


"अगं संपुर्ण आयुष्य तु एकटी कशी काढणार आहेस.. मला तुझी घुसमट सहन होत नाही.. मी लहान असताना माझे बाबा देवाघरी गेले.. माझ्या आईची परिस्थिती मी डोळ्यांदेखत बघितली होती.. तुझ्या बाबतीत तसं काही घडायला नको.. एकटं जीवन हलाखीचे असते.." मनातलं तो बाहेर काढत होता..


"सुयश! पण माझी लग्न करायची अजिबात इच्छा नाही.. मग तो कोणीही असो.." असं म्हणत तीने कार सुरू केली आणि भरधाव वेगाने घराकडे निघाली..


डोळ्यांतून बरसणाऱ्या अविरत धारा मात्र तिच्या मनाला पार चिंब भिजवून जात होत्या.. तिने कधी विचार देखील केला नव्हता की, सुयश सारखा मुलगा तिच्या प्रेमात पडू शकतो.. आजच्या काळात विधवा स्त्रीचा कोण स्वीकार करेल? शिवाय पाच वर्षाची मुलगी मधुरा.. असंख्य प्रश्नांनी तिच्या मनावर भडिमार केला होता.. खरं तर सुयशचा हा निर्णय तिच्या काळजाचा ठाव चुकवणारा होता..


ती घरी पोहचली.. आईला मधुराची विचारणा केली असता आई म्हणाली,"मी तिला आज लवकरच जेवण भरवले. खुप खेळत होती म्हणुन लवकर झोपली.."


"ठीक आहे".. असं म्हणत ती रूममध्ये निघुन गेली..


काहीतरी समस्या आहे हे आईच्या लक्षात आले.. काही वेळानंतर आई तिच्या रूममध्ये आली.. तेव्हा प्रियांका उसासे घेत रडत होती.. आईने विचारणा केली.. "काय गं? कोण काही बोललं का?"


"सुयशला माझ्याशी लग्न करायचं आहे.. तो उदया लग्नाची मागणी करायला येणार आहे.. अगं! प्रत्येकाला मी किती वेळा सांगू मला लग्न करायचे नाही म्हणुन.."


"पियु! सुयश चांगला मुलगा आहे.. त्याला तुझ्या परिस्थितीची जाणं आहे.. आणि आम्ही कधीपर्यंत.. जीवंत असेपर्यंत तुला सहारा देऊ.. नंतर काय?"


"मला कोणाची दया नको.. आदित्यला मी कधीच विसरू शकले नाही.. कुणावर मी पुन्हा प्रेम करू शकणार नाही.." हात जोडत ती आईला बोलली..


"आदित्यला तु विसरून जा.. सुयश सारखा दुसरा चांगला मुलगा शोधुन देखील सापडायचा नाही.. आता कुठलाच विलंब नको.. आम्ही सुयशला होकार द्यायला तयार आहोत.." असं म्हणत आई उठून गेली..


प्रियंका निःशब्द झाली होती.. संपुर्ण पणे ती भूतकाळात हरवली होती.. प्रियांका आणि आदित्य आयटी च्या शिक्षणासाठी कानपूरच्या कॉलेज कॅम्पसमध्ये एकत्र होते.. दोघांची मैत्री प्रेमामध्ये बदलली गेली.. शिक्षण पुर्ण होताच दोघांनाही चांगल्या कंपनी मध्ये जॉबसाठी कॉल आला.. मात्र तो मुंबईत आणि ती पुण्याला असे दोघंही विभागले गेले.. दोघांनाही शनिवार आणि रविवार दोन दिवसाची सुट्टी असायची.. जास्त करून आदित्य पुण्याला तिला भेटायला जायचा.. प्रियांकाचा स्वभाव बिन्धास्त आणि स्टायलिश असल्यामुळे त्याच्या आईला तिचा स्वभाव खटकायचा.. त्यांना ती पसंत नव्हतीच.. प्रियांका काळी सावळी असली तरी दिसायला रेखीव होती.. प्रियांकाच्या आई आणि बाबांना प्रियांकाची काळजी असायची.. लग्नानंतर हीचं कसं होणार?


काही महिन्यांनी त्याच्या लग्न घटिका समीप आल्या.. लग्नाचा कार्यक्रम उत्तमरीत्या पार पडला.. दोघंही दांपत्य हनिमूनसाठी बाहेरगावी देखील फिरून आले.. काही दिवसांनी आदित्यला पोट दुखीचा त्रास होऊ लागला.. पोट दुःखी बंद होण्याच्या गोळ्या तो केमिस्ट मधुन आणायचा आणि खायचा.. गॅस मुळे कदाचित दुखत असावं म्हणुन तो लक्ष देत नव्हता.. अचानक एक दिवस त्याच्या पोटात असह्य वेदना होऊ लागल्या.. त्याला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.. पोटात कॅन्सरची गाठ झाली असुन शेवटची पायरी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.. काही दिवसांत त्याला देवज्ञा झाली.. सगळीकडे शोकांतिका पसरली.. दोन्ही परिवार दुःखाच्या सागरात पार बुडाले होते.. कारण ज्या महिन्यात आदित्यला देवज्ञा झाली होती.. त्याच महिन्यात आठ दिवसांपूर्वी प्रियांकाला मुलगी झाली होती.. एका बाजुला आदित्यचे दुखणे डोळ्यासमोर पहिले होते तर दुसऱ्या बाजुला गर्भकळा प्रियांकाने सहन केल्या होत्या.. आठ दिवसांच्या नवजात मुलीला घेऊन तिने आदित्यचा अंतिम संस्कार बघितला होता.. सासूबाईंना प्रियंका पहिल्या पासुन पसंत नव्हतीच.. त्यामुळे मुलगा जाण्याचं खापर त्यांनी तिच्यावर फोडून तिला माहेरी रवाना केलं.. आयुष्यभर दुःखाचे गाठोडे घेऊन तिला पुन्हा दुसऱ्या कुणासोबत संसार थाटायचा नव्हता.. विचारात फसलेली असताना तिला झोप लागली...


रविवार असल्यामुळे ती निवांत उठली.. मोबाईलचा नेट ऑन केला तर स्क्रीनवर सुयशचा मेसेज दिसला.. तो त्याच्या आई, दादा व वहिनीला घेऊन संध्याकाळी घरी येणार होता.. प्रियांकाच्या मनाची धडधड वाढली होती.. तिने आईला सांगताच आईने घरात तयारी करायला सुरुवात केली..


संध्याकाळ झाली आणि सगळ्याच्या प्रतीक्षेची सीमा संपली.. सुयश, आई आणि दादा वहिनी आले.. प्रियांकाने सुयशच्या आईला वाकून नमस्कार केला.. आई व बाबांनी हात जोडले.. आई हात जोडत भरलेल्या डोळ्यांनी त्यांना म्हणाली,"तुमच्या मनाचा मोठेपणा की, आमच्या मुलीचा संसार पुन्हा उभारायाचं स्वप्न सुयशने बघितलं.. तुम्ही देखील त्यासाठी स्वीकार केला.."


"अहो! प्रियांकाच्या नशिबात होतं ते घडलं.. सुयश तिची रात्रंदिवस काळजी करत असतो.. म्हणुन आम्हाला पण वाटलं की, सुयश सारखं प्रेम आणि काळजी प्रियांका वर दुसरं कोणी करणार नाही.. शिवाय मधुराला आम्ही सुयशचे नाव द्यायला तयार आहोत.." सुयशची आई प्रियांकाच्या डोक्यावरून हात फिरवत बोलली..

हे ऐकुन प्रियांकाच्या डोळ्यात पाणी भरून आले.. इतक्या वर्षाच्या तिच्या घुसमटीला मोकळा श्वास मिळाला होता..


इतक्यात प्रियांकाची आई म्हणाली, "चहा नाष्टा मी गार्डन मध्ये आणायला सांगते.. आपण गार्डन मध्ये बसुया.." अस म्हणत सगळी मंडळी बंगल्याच्या पाठीमागील गार्डनमध्ये जाऊन बसली..


सुयशने सोबत अंगठी आणली होती.. दोन्ही कुटुंबाची संमती घेऊन त्याने तिच्या अनामिकेत अंगठी घातली.." प्रियु! माझ्या प्रेमाला दहा वर्षांनी मान्यता मिळाली..हा व्हॅलेंटाईन आठवडा कायम माझ्या आठवणीत राहील.. आय लव यू.. तसेच आई बाबा मी तुमचा देखील खुप आभारी आहे.."


सुयशचे वाक्य ऐकुन सगळे हसायला लागले.. प्रियंका मात्र निर्मळ अगदी शांत मिश्कीलपणे हसली.. तिच्याकडे पाहताच सुयशच्या आईने विचारणा केली.. "प्रियु! तुला हे मान्य आहे ना.."


प्रियांका लाजताच हो म्हणाली..


"आमची प्रियंका पुर्वी सुयश सारखी बिन्धास्त अन् बडबडी होती.. तिच्या सासुला तिचा तसा स्वभाव आवडत नव्हता.. आणि मग आदित्य पण गेला.. "एवढं म्हणत त्या गप्प झाल्या..


"तुमची प्रियंका आता आमची झाली आहे.. आमच्या सुयशला आवडली ना म्हणजे आम्हाला पण आवडली.." सुयशची आई स्पष्ट व्यक्त झाली..


प्रियांकाचे आई व बाबा मनोमन देवाचे आभार मनात होते.. चहा आणि नाश्ता झाल्यानंतर काही वेळाने चिमुकल्या मधुराचा हात पकडुन सुयश तिच्या सोबत खेळण्यात मग्न झाला.. मधुरा देखील त्याच्या सोबत आनंदाने खेळत होती.. ते दृश्य पाहून प्रियांकाच्या मनाला उभारी आली .. एकांतात ती सुयशला म्हणाली," आदित्यच्या आठवणी आजही मनात घर करून आहेत आणि राहतील.. आणि दुसरं म्हणजे तुझ्या सारखा काळजी घेणारा चांगला मित्र कोणी होऊ शकणार नाही.. जो माझ्या सोबत मधुराचा देखील स्वीकार करतो आहे."


"ह्या जगात ज्या गोष्टी घडायच्या असतात त्या घडुन राहतात.. त्याला तुम्ही आम्ही काही करू शकत नाही.. मला तर एवढंच माहिती आहे की, आपण एकमेकांसाठी बनलो आहोत.. तु माझी व्हॅलेंटाइन आहेस.. " हसत त्याने प्रेम व्यक्त केले.....


दुसऱ्यांच्या आयुष्यातील दुःख बाजुला करुन चांगल्या गोष्टी घडवून आणण्यासाठी काही लोक प्रयत्न करत असतात.. असेल त्या परिस्थितीत त्या व्यक्तीचा स्वीकार करतात.. तोच खरा प्रेमाचा साक्षीदार समजावा...


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance