Namita Dhiraj Tandel

Classics Inspirational Children

3.2  

Namita Dhiraj Tandel

Classics Inspirational Children

मायलेकी

मायलेकी

6 mins
248


"फुगे घ्या फुगे... ओ काका फुगे घ्या ना... ओ ताई फुगे घ्या.. शेवटचे चार राहिले बघा ना.." असे म्हणत आठ वर्षाची राणी चालत एका हॉटेलच्या बाहेर येऊन थबकली..


सगळी माणसे आपआपल्या परिवारासोबत मज्जा करत होते.. तिच्या वयाची लहान मुले कोणी पिझ्झा, कोणी बर्गर तर कुणी आईस्क्रीम खात होती.. हे सगळं दृश्य ती निरागसपणे काचे मधुन बघत होती आणि मग ती स्वतःला म्हणाली," माझ्या नशिबात पण जर असे सुख असते तर किती मज्जा आली असती ना?"


अचानक आकाशात रोषणाई सुरू झाली.. फटाके वाजायला लागले.. लोक एकमेकांना गळाभेट करू लागली होती.. कारण ती ३१ डिसेंबरची रात्र होती.. बारा वाजले होते आणि संपुर्ण जगाने नवीन वर्षात पदार्पण केले होते..


इतक्यात राणीच्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवला.. तीने मागे वळुन पाहिले तर सांता क्लॉज तिच्या समोर उभा होता.. त्याला पाहताच ती खुप आनंदी झाली..


सांता क्लॉज म्हणाला,"मला दे हे फुगे.."


राणी हसत हसत," ह्या बदल्यात तुम्ही मला काय देणार?"


सांता क्लॉज म्हणाला," जे हवं ते माग.."


राणी विचार करत बोलली," मला माझ्या आईकडे जायचं आहे.."


सांता क्लॉज म्हणाला,"राणीचे स्वप्न सत्यात अवतरू दे.. "ये राणी!!! माझ्या सोबत रथा मध्ये बस.."


तशी ती खुप खुश झाली..तिचा आनंद गगनात मावेनासा झाला... कारण ती पहिल्यांदाच रथामध्ये बसणार होती.. ती त्या रथामध्ये सांता क्लॉजच्या शेजारी जाऊन बसली.. रथाला दोन पांढरे शुभ्र मोठेसे घोडे जोडलेले होते.. सांता क्लॉजने घोड्यांना लगाम दिली तसे ते घोडे भरधाव वेगाने धावायला लागले जणु काही ते आताच आकाशात झेप घेणार..


आकाशाकडे बोट दाखवत राणी बोलली..सांता बाबा... सांता बाबा.. ते काय आहे


"तो रस्ता जादुई दूनियेकडे जातो.. तुला मी तिथेच घेऊन जाण्यासाठी आलो आहे.." सांता क्लॉज बोलला..


"सांता बाबा!!! खरंच तुम्ही मला जादुई दुनियेची सैर करण्यासाठी घेऊन चालले आहेत..


रथ आकाशात वर वर जात होता. तशी राणीला मज्जा वाटत होती.. इतक्यात तो रथ एका ठिकाणी येऊन थांबला.. तिकडे वर जाण्यासाठी पायऱ्या होत्या.. सांता क्लॉजने राणीला खाली उतरायला सांगितले.. ती खाली उतरली..


"राणी! बाळा माझा प्रवास इथं पर्यंत होता.. टाटा.." अस म्हणत सांता क्लॉज रथा सहित अदृश्य झाला..


"अरे ! ह्या तर चांदण्या.."राणीला आश्चर्य वाटले..


"ये राणी ये" अस प्रत्येक चांदणी तिचं स्वागत करत होती..


राणी पहिल्या पायरीवर येऊन पोहचली.. तिथे चांदण्याची मुख्य चांदणी चंद्रकला तिच्या स्वागतासाठी उभी होती.. "राणी! चांदण्याच्या दुनियेत तुझे स्वागत आहे.." अस म्हणत तिने सगळ्या चांदण्याना राणीची सुंदर तयारी करायला सांगितली.. सफेद फ्रॉक.. डोक्यावर सफेद फुलांचा पट्टा.. कानात , गळ्यात आणि हातात एकसरी मोत्यांचे दागिने.. पायात सफेद बुट.. अशी राणीची तयारी करण्यात आली..


"राणी!! तु तर चिमुकली परी दिसते आहेस ग.. आज आमची परी राणी तुला बघुन खुप खुश होणार एवढं मात्र नक्की.." चंद्रकलाने अस म्हणत राणीच्या कपड्यावर सुगंधी अत्तर शिंपडले..


"मला तर पंख आले.. आता मी खरोखर परी झाली.." पंखांना न्याहाळत राणी बोलली..


चंद्रकला तिचा हात पकडत.."चल माझ्या सोबत.." असं म्हणत राणीला एका भल्या मोठ्या दरवाज्याजवळ घेऊन आली.

राणी त्या दरवाज्याकडे अखंड बघत राहिली.. तिचे डोळे पाणावले.. कारण त्या दरवाज्याला चाफ्याची फुले लावलेली होती..


चंद्रकला राणीच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली.. "मला माहिती आहे.. तुला आणि तुझ्या आईला ही फुलं आवडायची ना?"


"हो! पण तुम्हाला कसे माहिती?" डोळे पुसत राणी बोलली..


"कारण परी राणीने आम्हाला ही फुले लावायला सांगितली.. चल.. टाटा.. माझा प्रवास इथ पर्यंत होता.." असे म्हणत चंद्रकला अदृश्य झाली..


राणी आता दरवाज्याच्या आतमध्ये शिरली.. तिच्या स्वागतासाठी एक सुंदर परी उभी होती.. तिने राणीचा हात पकडला.. तिला पाळण्यावर बसवत म्हणाली.. "जादुई दुनियेत तुझ स्वागत आहे.."


पाळणा बघताच क्षणी राणी आनंदाने बोलली ,"परी ताई.. हा तर फळांचा पाळणा.. ही तर माझी आवडती फळे.." तिने लटकणारी चेरी आणि स्ट्रॉबेरी अलगद तोडून खायला सुरुवात केली.. पाळण्याचे झोके घेत असताना तिचे लक्ष एका खोलीकडे गेले.. ती झोके घ्यायची थांबली..


इतक्यात परी ताई म्हणाली,"चल तुला तुझी खोली दाखवते.."


"माझी खोली! राणी थक्क झाली.. पळत पळत खोलीच्या दिशेने गेली.. ती तिथल्या पलंगा वरील मऊ मऊ गादीवर जाऊन झोपली.. झोपुनच खोली न्याहाळू लागली.. तिकडची प्रत्येक वस्तु गुलाबी रंगाची होती.. ती पलंगावरून उठून कपाटाकडे येऊन उभी राहिली. तीने तो कपाट उघडला तर त्यात रंगीबेरंगी सुंदर फ्रॉक , बुट , मोत्यांचे, खड्यांचे दागिने ठेवलेले होते.. हे सगळं बघुन ती खुश झाली होती..


समोर ठेवलेल्या फ्रिजकडे राणीचे लक्ष गेले.. " हा तर आईसक्रीमचा फ्रीज" अस म्हणत तिने फ्रीजचा दरवाजा उघडला तर संपुर्ण फ्रिज चॉकलेट, कॅडबरी आणि विविध फळांच्या रसाने भरला होता.. तिने त्यातली तिची आवडीची चॉकलेट घेतली आणि खाल्ली..


"चल, आता जेवणाची वेळ झाली.."अस म्हणत परी ताई तिला टेबलकडे घेऊन गेली.. राणी त्या टेबलाकडे बघतच राहिली.. तिची पापणीसुद्धा हलायला तयार नव्हती.. कारण त्या टेबलवर डोनट.. पिझ्झा.. केक.. बर्गर.. सँडविच.. पास्ता..आणि बरीच पक्वान्न ठेवली होती..


"एवढी पक्वान्न कोणासाठी आहे बरं! आणि इतके पक्वान्न खाणार तरी कोण?" असे म्हणत

राणी खुर्चीवर बसली.. तिने अगदी मनसोक्त काही पदार्थ खाऊन घेतले.. "वाह! खूपच छान पक्वान्न बनवली आहेत..कोणी बनवली?" राणी बोलली..


" तु नेहमी फुगे विकताना हॉटेलच्या बाहेरील काचेमधून ही पक्वान्न दुसऱ्यांना खाताना बघायची ना?आणि मग तुझी सुध्दा इच्छा व्हायची ना तशी पक्वान्न खाण्याची? त्यामुळे अगदी तुला आवडणार अशीच पक्वान्ने आमच्या परी राणीने बनवली आहेत खास तुझ्यासाठी.."परी ताई उत्तरली..


"परी ताई! कसे ग सगळ्यांना इथे माहिती की, मला काय काय आवडते?आणि मी काय काय करायची? सांता बाबा बरोबर बोलले होते तिकडे गमंत आहे म्हणून.." राणीला खुपच नवल वाटत होते.. कारण ती जे काही बघायची.. तिला जे काही आवडायचं.. ते सगळं जादुई दुनियेतील लोकांना माहिती होते..


"प्रत्येकाच्या मनातले प्रत्येक जण ओळखु शकतो हे सांगु शकत नाही.. पण आपल्या जादूई दुनियेची गंमत निराळीच आहे.. कारण आपल्या बाळाला काय हवं? काय नको? हे फक्त एक आईच चांगलं ओळखत असते..त्यामुळे आता तुला आपल्या जादूई दुनियेची खुप मोठी गमंत दाखवायची वेळ आली आहे.."परी ताई बोलली..


परी राणीचा हात पकडुन तिला बागेमध्ये घेऊन आली.. "टाटा.. माझा प्रवास इथ पर्यंतच.." अस म्हणत परी ताई सुद्धा अदृश्य झाली..


बागेमधील दृश्य मनमोहक होतं.. सगळीकडे मखमली हिरवळ पसरली होती.. रंगीबेरंगी फुले देखील होती.. त्याचा सुगंध दरवळत होता.. अधुनमधुन फुलपाखरे राणीच्या नाकावर येऊन बसत होती.. ती त्यांच्या मागे मागे पळत होती.. ती त्यांना पकडायचा प्रयत्न करत होती.. पुढे एक मोठा तलाव होता.. तलावामध्ये हंस पोहत होते.. जेव्हा अजुन पुढे आली तेव्हा तिला एक छोटा झरा वाहताना दिसला.. झऱ्याचा झुळू झुळू आवाज मनाला शांती देणारा होता.. इतक्यात मधुर संगीत तिला ऐकायला आले..


आवाज तिच्या ओळखीचा होता.. आवाजाच्या दिशेने ती बेभान होऊन धावत सुटली.. आवाज ऐकुन तिचे भान हरपले.. आवाजाचा शोध घेण्यासाठी तिची पाऊले त्या दिशेने झपझप पडू लागली.. तिला चंद्राची कोर दिसताच ती तिकडे येऊन थांबली..


चंद्राच्या कोरीवर एक परी राणी बसली होती.. आणि ती गुणगुणत होती..

चंदा है तू, मेरा सूरज है तू..

ओ मेरी आँखों का तारा है तू..


हे गाणे ऐकून राणीचा कंठ भरून आला.. तिला बिलकुल राहवेना.. ती धावत परी राणीकडे गेली .."आई.. आई" म्हणत परी राणीला जाऊन बिलगली..


दोघींचे अश्रु थांबता थांबत नव्हते..


"आई!!!! का ग मला एकटीला सोडून तु इकडे आलीस? मला का नाही तुझ्यासोबत इकडे आणलेस?.. मला तुझी खुप आठवण यायची.. नवीन आईने माझे शाळेतुन नाव काढून टाकले आणि मला फुगे विकायला पाठवायला लागली.. जेवढे फुगे विकायला नेणार तेवढे सगळे विकुन आणायचे.. एकसुद्धा फुगा घरी आणायचा नाही.. अस म्हणायची.. जर कधी एखादा फुगा चुकून फुटला किंवा फुगे परत घरी आणले तर मला खुप मारायची.. बाबा काही बोलले तर त्याच्यासोबत भांडण करायची.."


परी राणी बोलली "बाळा.. मला सुद्धा तुझी खुप आठवण यायची.. मी रोज तुला येथुन बघायची.. तु संकटाना कशी सामोरे जातेस.. खर तर आपल्या जीवनाची परीक्षा देवच घेत असतो.. पण जे होते ते चांगल्या साठीच होत असते असे समजुन पुढे चालायचं असते.. पण आता तुझे कष्ट संपले.."


"आई!!!आता नाही ना कधी तु मला एकटीला सोडून जाणार.."


परी राणी म्हणाली,"तु आता माझ्याकडेच राहणार.. ह्या जादूई दुनियेत.. तुला माहिती आहे का? आज देव सांता क्लोजच्या रुपात आले होते तुझी इच्छा पुर्ण करायला.. त्यांनीच आपली भेटण्याची इच्छा पूर्ण केली.."


"आई!!! मी जेव्हा त्यांना म्हणाले की, मला आईला भेटायचे आहे.. तेव्हा ते मला म्हणाले होते.. राणीचे स्वप्न सत्यात अवतरू दे..."


"हो... माझ्या राणीचे चे स्वप्न सत्यात अवतरले सुध्दा... आज नवीन वर्ष देखील सुरू झाले.. माझ्या राणीच्या नवीन वर्षाची नवीन सुरुवात स्वप्नातील सत्यातल्या जादूई दुनियेत.." असं म्हणत आईने मुलीला कमरेवर उचलुन बसवले.. पुन्हा गाणे गाण्यास सुरुवात केली..


नन्हां सा है, कितना सुंदर है तू..

छोटा सा है, कितना प्यारा है तू..

चंदा है तू, मेरा सूरज है तू...


समाप्त...



Rate this content
Log in

Similar marathi story from Classics