Namita Dhiraj Tandel

Others

3  

Namita Dhiraj Tandel

Others

अस्तित्वाचा स्वीकार भाग ४

अस्तित्वाचा स्वीकार भाग ४

3 mins
224


"एवढे दिवस आम्हाला अंधारात ठेवलं. संसार म्हणजे खेळ म्हणून वागत होतीस का? सगळं नाटक कशा साठी करत होतीस?" तो खुपच चिडला होता. 


तिच्या डोळ्यांतून अश्रुधारा कोसळत होत्या. तिला असे रडताना पाहून तो तिच्या अंगावर ओरडला," का असं केलंस? काही बोलणार आहेस की नाही? तु आईची पसंती आहेस ना. चल तिच्या समोर." 


"नाही. आई कडे नको. त्या आजारी असतात. उगाच काही कमी जास्त झालं तर?" ती घाबरली होती.


सीमाने स्वतःला शेवटी आवरले. डोळे पुसून तिने हकीकत सांगायला सुरुवात केली."जेव्हा माझा जन्म झाला . तेव्हा सगळे खुश झाले होते. कारण घरात वंशाचा दिवा जन्माला आला होता. पण मी जशी जशी वाढत होते. तसे तसे मी मुली सारखे राहणीमान करू लागली होती. पंजाबी ड्रेस, फ्रॉक मला खुप आवडायचे. सजणे सवरणे मला प्रिय झाले होते. एक दिवस आई बाबा घरात नसताना मी आईची साडी घालून आरश्या समोर उभी होती. इतक्यात ते घरी आले . मला त्या वेशात पाहून खुप ओरडले. एवढंच नाही तर गावाच्या जत्रेत रामलीला मध्ये स्त्री ची भूमिका केली होती. त्या दिवशी बाबांनी मला घरी आल्यावर बेदम मारले. माझे चालणे वागणे सगळे मुली सारखे होते. मी तृतीय पंथी असल्याचे आई बाबांना कळून चुकले. पोटाच्या गोळ्याला कधी कोणी उघड्यावर टाकतं का? नाही ना. कारण तृतीय पंथीची जागा वेशी बाहेर असते. माझ्या आई वडिलांना मला घराबाहेर काढायचे नव्हते. म्हणून राहते गाव सोडून आम्ही दुसऱ्या गावी लांब स्थायी झालो. जिकडे कोणी ओळखीचे नव्हते. माझ्या आई वडिलांनी माझे खुप लाड केले. पण त्यांचा अपघाती मृत्यू माझ्या साठी कठीण काळ घेऊन आला. मी एकटी कुठे राहणार म्हणून मामाने मला घरी आणले. काही वर्षांनी मामाला सुद्धा देवज्ञा झाली. मामी खूपच वस्ताद असल्यामुळे तिने माझ्या आईचे दागिने व आमचे राहते घर स्वतच्या नावावर केले. मला बळजबरीने लग्न करायला भाग पाडले आणि म्हणाली,"लग्न झाल्यावर नवऱ्याला अंगाला स्पर्श करायला देऊ नकोस. काहीतरी वाद निर्माण करून सोडचिठ्ठी घे. पोटखळगी मात्र सोडायची नाही. असे केले नाहीस तर सगळीकडे तु किन्नर असल्याचे घोषित करेन. तुला कायम तृतीय पंथाच्या वस्तीत आयुष्य घालवावे लागेल." आता तुम्हीच सांगा. लहानाची मोठी होई पर्यंत माझ्या आई वडिलांनी मला साधारण व्यक्ती म्हणून वागणूक दिली. अचानक तृतीय पंथी वस्तीत मी कशी जाऊन राहू? त्यांच्या एका टाळीचा आवाज मला स्वतःच्या काना खाली वाजवल्या सारखा वाटतो. तुम्हीच सांगा असे जीवन मी कसे जगणार? सगळ्या बाजूंनी माझेच मरण निश्चिंत आहे. तिने संपूर्ण हकीकत त्याच्या पुढे मांडली.


काही न बोलता तो एका कुशीवर झोपला. लाईट बंद करून ती सुद्धा बिछान्यावर पडली. डोळे बंद होते पण दोघांच्या विचारांचे चक्र चालूच होते. पंकजच्या डोक्यातील रातकिडे रात्रभर किरकिर करू लागले होते. कॉलेजचे प्रेम आई मुळे यशस्वी झाले नाही. तिच्या पसंतीने लग्न केले तर हा विवाह योग्यच नाही. आता ही गोष्ट घरा बाहेर कुणाला कळली तर? सगळ्यांची बदनामी होईल. सीमाचे काय? काय करेल? कुठे जाईल? तिची तर ह्यात काही चुकीच नाही. तिचा निरागस चेहरा त्याच्या डोळ्या पुढे लहरत होता.


सीमा दुसऱ्या दिवशी घरातून निघण्याच्या तयारीत होती. कुणाला काही न सांगताच ती घरा बाहेर पडणार होती. नेहमी प्रमाणे आई व पंकज उठायच्या आधीच ती उठली. चोर पावलांनी घर सोडणार इतक्यात आईचा आवाज आला. "कुठे निघालीस आम्हाला टाकून?"


क्रमशः


Rate this content
Log in