Jyoti gosavi

Classics

3  

Jyoti gosavi

Classics

संत तुलसीदास

संत तुलसीदास

3 mins
136


संत तुलसीदास यांच्या जयंती निमित्ताने


 तुलसी मानस चरित लिहिणारे. तुलसी रामायण लिहिणारे, तुलसीदास, त्यांच्या अनेक रचना प्रसिद्ध आहेत. त्यातील मला आवडलेली एक रचना


ठुमक चलत रामचंद्र

बाजत पैंजण या रे

किलकि किलकि उठत धाय गिरत भूमि लटपटाय 

धाय मात गोद लेत दशरथ की रनियां ॥


अंचल रज अंग झारि विविध भांति सो दुलारि ।

तन मन धन वारि वारि कहत मृदु बचनियां ॥


विद्रुम से अरुण अधर बोलत मुख मधुर मधुर ।

सुभग नासिका में चारु लटकत लटकनियां ॥


तुलसीदास अति आनंद देख के मुखारविंद ।

रघुवर छबि के समान रघुवर छबि बनियां ॥


श्रीकृष्णाच्या बाललिलांचे अनेक ठिकाणी वर्णन आलेले आहे .परंतु रामाच्या बाललीला फार कमी आहेत. 

त्यामध्ये एक त्याने आकाशीचा चंद्र मागितला होता , आणि कौसल्येने तो आरशामध्ये दाखवून, रामाची समजूत काढले तो बालहट्ट, आणि संत तुलसीदासांनी लहान असणारा राम जेव्हा नुकताच उभा राहिला, चालू लागला, आणि मग तो कसा चालत होता, कसा पडत धडपडत होता, कसा किलकारी मारत होता, याचे अगदी छान वर्णन या गाण्यांमध्ये केलेलं आहे . 


प्रथम हे गाणं अनुप जलोटा यांच्या तोंडून ऐकलं आणि

 ते मनावर गारुड करून गेलं. 


ठुमक चलत रामचंद्र

बाजत पैंजण या रे

किलकि किलकि उठत धाय गिरत भूमि लटपटाय 

धाय मात गोद लेत दशरथ की रनियां ॥


सर्वसाधारण प्रत्येक घरामध्ये लहान मुलाच्या जशा बाललीला असतात, अगदी तसेच वर्णन यामध्ये केलेले आहे. 

पायामध्ये पैंजण आहेत, त्यांचा आवाज होत आहे. आणि रामचंद्र एक एक पाऊल पुढे टाकत, "ठुमकत ठुमकत" चालत आहे. आणि मध्येच आनंदाने एखादी किलकारी /आरोळी मारतो आणि चालण्याचा प्रयत्न करता करता, पुन्हा जमिनीवर पडतो. 

त्याचे पाय लटपटतात आणि अशावेळी, दशरथाच्या सर्व राण्या धावत जाऊन त्याला उचलून घेतात. 

साधारण सगळीकडे असंच असतं .

मुलाच्या पायात छुम छुम वाजणारे पैंजण का घालायचे? 

त्यानिमित्ताने मुल त्याच्या आवाजाने एक एक पाऊल टाकायला शिकते, 

 बाळ पडतो, धडपडतो, धुळीत पडतो ,आणि आई धावून मुलाला उचलून घेते 


अजून मला इथे महादेवी वर्मा यांची कविता आठवते. 


मै रोयी माॅ काम छोडकर/ आई मुझको उठा लिया/ झाड पोछकर चूम चूम

 गिले गालों को सुखा दिया


अंचल रज अंग झारि 

विविध भांति सो दुलारि ।

तन मन धन वारि वारि कहत मृदु बचनियां ॥


मग त्या राण्या धावून बाळाचे अंग झटकतात, अंगाला लागलेली माती पुसून टाकतात. 

एखादी आई जशी बाळासाठी "तन-मन धन" सगळं काही आपलं अर्पण करते, तसं ह्या अगदी त्याला मनापासून शांत करायच्या मागे असतात. त्याच्याशी अगदी मृदू मंजुळ वचन बोलतात. 

आपण नाही का 

"अलेले अलेले लागलं का बाला" असे बोबडे बोल बोलतो ना! 

किंवा "उगी उगी" आणि उगाच एखादा जमिनीला फटका, "हात रे" करतो ना! तसंच त्या तिघीजणी राम पडला, धडपडला, रडला, तर जीव पाखडून त्याला शांत करतात. 


विद्रुम से अरुण अधर बोलत मुख मधुर मधुर ।

सुभग नासिका में चारु लटकत लटकनियां ॥


मग त्या राण्यांचं वर्णन केलेल आहे, की त्यांचे अरुणोदय होताना जशी दिशा लाल असते तसे लाल लाल ओठ आहेत. 

त्यांचे सरळ सुंदर नाक आहे. आणि त्या नाकामध्ये नथनी लटकत आहे. 

आणि त्या मुखाने रामाला एकदम गोड गोड मधूर बोलत आहेत. 

जेणेकरून राम शांत व्हावा


तुलसीदास अति आनंद

 देख के मुखारविंद ।

रघुवर छबि के समान

 रघुवर छबि बनियां ॥


तुलसीदास जणू प्रत्यक्ष हा सोहळा आपल्या डोळ्याने पाहत आहेत. आणि रामाचं मुख कमळ/ मुखारविंद म्हणजे मुख कमळ. न्याहाळत आहेत. 

त्यांना खूप आनंद झालाय.


 त्यांच्या मनात एकदा विचार येतो की, याची तुलना कशाशी करावी? 

चंद्र, सूर्य, कमळ, चांदण्या, यातील कोणतिही उपमा त्यांना पटत नाही. 

आणि शेवटी ते रामाच्या छबीची उपमा रामाशीच करतात .

म्हणजे रामा शिवाय दुसरा कोणतीही उपमा देण्यास त्यांना योग्य वाटत नाही. असा हा अतिशय मधुर दोहा/ गाणे  ते वाचकांना ऐकायला आवडेल .


यामध्ये कोणते देवत्व वगैरे न दिसता, आपल्याच घरातील एखादं "छोटुला / गोडूला चालत आहे ,पडत आहे ,धडपडत आहे. आणि आपण किंवा त्याची माता त्याची समजूत घालत आहे असे वाटते. 



Rate this content
Log in

Similar marathi story from Classics