संसारात सोडायला शिका
संसारात सोडायला शिका
रोहीत रडत रडत बोलू लागला," अरे यार,मी तिच्या साठी काय काय नाही केल ? तिच्या मागच्या वाढदिवसाच्या दिवशी तिला आवडतो म्हणून गुलाबी रंगाचा छान ड्रेस दिला आणि रोमॅन्टीक डीनर पण दिला.एवढच नाही श्रीक्या,तिन मला फस्ट टाईम दिलेल्या चाकलेट चा कागद सुध्दा मी अजून पर्यंत खिशात पाकीटात घेऊन फिरतो."
खर तर मला रोहीत्याच बोलन ऐकुण जाम कंटाळा आला होता.हे अस रोजचच होत. मी तिच्या साठी हे केल तिनं माझ्यासाठी ते केल. मला ऐकून वीट आला होता.पण आज का कुणास ठाऊक का पण मला मात्र माझ्या लिखाणाला त्याच्या या वाक्यातून विषय मिळाला.मनात विचार आला श्रीक्या तुझ आणि प्रियंका च लग्न होऊन आता पाच वर्षे झाली ,तु तिच्या साठी काय केल आणि तिने तुझ्या साठी काय केल याचा हिशोब केलास का ? मनात विचार आला कि चला आज तो ही हिशोब करू. मी हिशोब मांडायला घेतला आणि दोन चार ओळीत हिशोब संपला. प्रत्येकजण म्हणत असतो कि, मुलगी आपल्यासाठी आई बाप सोडून येते. यातही माझ्या मनात शंका आली . आई बाप कुठे सोडता येतात का...? ति काय एखादी वस्तू आहे का...? मुळात आपल असण आणि नसण त्यांच्यामुळेच आहे. त्यांच्यापासून आपण भले तर दुर राहू शकतो पण सोडले अस म्हणता येणार नाही. झालं, माझ इथेच लिखाण थांबलं . कारण प्रियंका ला मी एखादा ड्रेस किंवा आणखी काही घेऊन दिल्याचं मला आठवलं नाही आणि तिने माझ्यासाठी काही घेतल असही काही दिसल नाही. मग आता , म्हणून मी थोडा उलट विचार केला आणि बघतो तर काय मला आमच्या आयुष्यात आणि प्रेमाच गमक मिळाल. एकमेकांसाठी काय केल हा विचार करण्यापेक्षा आम्ही एकमेकांसाठी काय सोडल याचा हिशोब मांडत गेलो आणि लिखाण पुढे सरकत गेलं.
आयुष्याची सुरुवात माझ्यासोबत करायची म्हणून तिने शिक्षण सोडल आणि लग्न बंधन बांधल. लग्न बंधन बांधत असताना जोडीदार कसा असावा या मुलींच्या काही अपेक्षा असतात त्यांचा देखील तिनं त्याग केला. कारण ती शहरातील सरकारी नोकरदाराची मुलगी. शेती आणि मातीचा गंध नाही. मी खेडूत शेतकरी पुत्र, शिक्षण झालेल पण नोकरीसाठी वणवण फिरणारा.तरी देखील घरच्याच ऐकुन माझ्यासोबत लग्न केल. अर्थात तिच्यासाठी मलाही काही सोडावं लागलं. ती माझ्यासाठी खेड झाली ,मग मलाही तिच्यासाठी शहर व्हाव लागल म्हणून मग मी शेती आणि गाव सोडला आणि शहरात नोकरीसाठी हातपाय मारले. एक वर्ष शहरात राहून काही पैसा बचत होत नाही म्हणून नोकरी सोडून दुकान टाकलं . दुकान टाकायच तर भांडवल आवश्यक असत मग पैसा कुठुन येणार . अशा वेळात बापाने कर्ज काढून पैसे दिले आणि बायकोने लंकेची पार्वती होत आपले सर्व दागिने मोडून मला पैसा दिला. एक दिड वर्षात यातही अपयशच आलं . पण तिनं साथ सोडली नाही. तिच्या आई कडून पैसे मागवून पुन्हा नव्या उमेदीने लढायला पुण्याला पाठवलं . चार सहा महीने तिने आणि मुलीने माझा विरह सोसला अर्थात मलाही तो सोसावा लागला पण तो माझ्या भल्यासाठी होता. पुण्यात नोकरी लागली म्हणून तीला आणि मुलीला घेऊन पुण्यात आलो . चार पाच महीने पुण्यात राहीलो आणि तिला सरकारी नोकरी लागली. आता अर्थात सोडण्याची बारी माझी होती. म्हणून मी नोकरी सोडली आणि तीच्या सोबत एका खेडेगावात मुलगी संभाळू लागलो. आता ऐक वर्ष होतोय मी मुलगी संभाळून ,तिला घरकामात मदत करून , नोकरीच्या कामात मदत करतो. मला नोकरी सोडताना माझी,पुण्यातील मालकीन म्हटली होती , " श्रीकांत इतना अच्छा job मत छोडो, पुणे से दुर जाकर तुम्हारा करीयर नही बनेगा. गाव मे जाकर तुम क्या करोगे. वहा बनना बेबी सिटर ." पण मला प्रेमाचा नवा अर्थ कळाला होता . प्रेमात एकमेकांसाठी काही करण महत्वाच असेलही पण आमच्या दोघांच प्रेम हे ऐकमेकांसाठी काही तरी सोडण्यात आहे.
आज लग्नाला पाच वर्ष होत आहे या पाच वर्षांत आम्ही एकमेकांसाठी काही तरी सोडतच आलोय यापुढेही सोडतच राहू.कधी ती सोडेल ,कधी मी सोडेल. या पाचव्या मॅरेज एनिव्हर्सरी निमित्ताने हा मात्र शब्द देतो कि, एकमेकांना मात्र कधीही आणि कुठल्याही परिस्थितीत सोडणार नाही.
