पोळा विशेष...!
पोळा विशेष...!
पोळा विशेष...!
पोळ्याच्या दोन दिवस अगोदर पासुन बैलांना औताला अथवा गाडी ला धरायच नाही. एक दिवस अगोदर खांदमळणी करायची आणि मग दुसर्या दिवशी पुरण पोळीचा स्वयपाक करायचा,बैलांना सजवायच आणि गावात मंदीर आला प्रदक्षिणा मारुन घरी आणायचे मग नैवेद्य भरवायचा. पुजेसाठी बैलजागडी चे जु (जोखड) गेरू लावून ,चुन्याचे पांढरे टिपके लावून ओट्यावर सतरंजी वर मांडायचे.सतरंजीवर थोडे गहू ,नैवेद्य ठेवायचा.घरधनी बैलजोडी घेऊन आला कि,पुजा करून नंतर मग सर्व जेवन करतात.ही झाली आपली मराठवाड्यातील प्रथा अर्थात यात काही बदल असू शकतो.कारण थोड दूर गेल कि प्रथा बदलतात.
आज मी विदर्भात पोळा अनुभवला,तोच अनुभव सांगत आहे. विदर्भात खर तर बैलांच प्रमाण मला अगदीच कमी आढळलं.भात शेतीसाठी आता Tractor चा वापर होताना दिसतो. गावात एकुण सात बैलजोड्या ,गावची लोकसंख्या 1500 असेल.बर अस काही नाही कि,शहरातली गोष्ट सांगतोय.खेड्या मध्ये एवढे कमी बैल आहेत.पण उत्साह मात्र कुठेच कमी वाटला नाही. त्या सात बैलजोड्या साठी संपुर्ण गाव सकाळ पासून तयारीला लागतो हे विशेष. दुपारी तोरण बांधून मस्त सजवले.स्पिकर वरती गाणे सुरु होते.गावातील सर्व जेष्ठ श्रेष्ठ मंडळी पारावर बसलेली. सर्वांच्या हातात अक्षता. वयाने लहान असलेले मोठ्या माणसांना अक्षता कपाळी लावून दर्शन घेत होती.तर समवयस्क एकमेकांना अक्षता लावत नमस्कार करत होते.मला ही गोष्ट नवीन होती.सायंकाळी 5 वा पोळा फुटला. काही क्षणात सर्व लोक आपापल्या घरी गेली. बैलजोड्या मालक मात्र बैलजोडी घेऊन घरोघर जात होते.घरातील महीला बैलांना नैवेद्य म्हणून भात,दही ,पुरणपोळी देत होत्या.खुप उशीरापर्यंत हे असच सुरु होत. अशातच गावातील मंदीरातून एक आवाहन करण्यात आले. उद्या म्हणजे बैल पोळ्याच्या दुसर्या दिवशी गावात तान्हा पोळा भरवला जाणार आहे.
तान्हा पोळा -
विदर्भात पोळा यामुळे मला विशेष वाटतो. तान्हा पोळा म्हणजे लाकडाची बैलाची बनवलेली प्रतिकृती घेऊन सर्व लहान मुल जमा होतात.जसा बैलांचा पोळा भरतो अगदी तसाच एव्हाणा त्यापेक्षा जास्त उत्साहाने तान्हा पोळा भरतो. यासाठी घरातील माता माऊल्या देखील सहभागी होतात. लहानापासून तर मोठ्या पर्यंत सर्वच यात मजा बघण्यासाठी जमतात.मुलांनी आणलेल्या या लाकडी बैंलांपैकी जो बैल सर्वोत्कृष्ट असेल त्यांना अनुक्रमे एक ,दोन,तीन नंबर दिला जातो .बक्षीस स्वरुपात गावातीलच ज्येष्ठ मंडळी पैसे जमा करून ती वाटतात.तान्हा पोळा खर तर संध्याकाळीच भरवला जातो. पोळा फुटल्या नंतर ही मुल घरोघरी जाऊन पैसे मागतात ,ज्याला बोजारा असे म्हणतात. बोजारा ही मुले हक्काने मागतात आणि मग कुणी एक ,दोन रूपये तर कुणी अजून काही अस देतातच. तान्हा पोळा असतो त्याच दिवशी सकाळी गावात मारबत काढली जातात.
मारबत-
सकाळी सकाळी गावातून एक मोठा पुतळा बनवून वाजत गाजत मिरवत गावाच्या बाहेर दुर नेऊन जाळतात.गावातील इडापीडा त्या बरोबर जाते असे इथले लोक सांगतात.
चिकन-
सकाळी दुध आणायचे म्हणून बाहेर पडतो तर तान्हा पोळा असल्याने एकही दुकान सुरु नव्हती. गावाच्या बाहेर मात्र काही पाल मांडलेली दिसत होती. एवढ्या सकाळी कशाची पाल लावली म्हणून बघायला गेलो तर सर्व चिकन च्या दुकाना लागल्या होत्या.एरवी रविवारी दिसणार्या चिकन च्या दुकान आज एवढ्या सकाळी कशा ? म्हणून मी एका मित्राला विचारल तेव्हा कळाले कि, इथे ही देखील एक पुर्वापार चालत आलेली प्रथा आहे.तान्हा पोळा असेल त्या दिवशी बहुतांश विशेष करून बौध्द समाजातील प्रत्येक घरी चिकन बनवल जाते. यामागचे कारण समजले नाही पण हे असतेच.असा हा विदर्भात उत्साहात साजरा होणारा पोळा आयुष्यभर स्मरणात राहील
