विजय वैशाली दत्ताराम पराडकर

Abstract Inspirational

3.8  

विजय वैशाली दत्ताराम पराडकर

Abstract Inspirational

सण आणि उत्सवांचे महत्व

सण आणि उत्सवांचे महत्व

6 mins
829


        किशोर भल्या पहाटे धावत धावत किरणच्या घरी पोहचला धापा टाकत आलेल्या किशोरला बघून डोळे चोळत त्याला घरात येवून बसायला सांगितले. किशोरने चप्पल काढली आणि खुर्चीवर बसला. किरण तसाच त्याच्या समोरच्या खुर्चीवर बसून अर्ध्या झोपेतून उठल्या मुळे पुन्हा पेंगु लागला. किशोरने त्यालाणावज देत आईने दिलेली फराळाची पिशवी त्याच्या हातात दिली. आईने पाठवले आहे म्हणजे नक्कीच काहीतरी छान असणार हे त्याला माहीत होते. पिशवी उघडून पाहिले तर दिवाळीचा फराळ होता.

किरण आधी ती पिशवी इथेच ठेव आणि पटकन फ्रेश होऊन ये नंतर खा. आपल्याला फटाके फोडायला पण बाहेर जायचे आहे. किशोरने जणू आदेशच दिला.


किरण हा कुणाच्याही अध्यात मध्यात न पडणारा मुलगा. ऑफिस मध्ये किशोर आणि याची घट्ट मैत्री जमली आणि दोघेही अगदी एकमेकांच्या जीवाला जीव देऊ लागले. किरणला तसा सण आणि उत्सव यातले जास्त काही कळत नव्हते त्यामुळे तो यापासून थोडा अलिप्त राहायचा. परंतु किशोर त्याला भेटल्यापासून वेगवेगळ्या सणांची त्याला हळू माहिती मिळू लागली पण त्याला याच सणांच्या निमित्ताने प्रदूषण करणे पटत नाही.


आज किशोर घरी आल्यावर त्याला समजले की दिवाळीचे दिवस आहेत तर आता प्रदूषण वैगेरे होणारच म्हणून आज घराच्या बाहेर पडायचं नाही असे त्याने ठरवले होते. पण किशोरच्या पुढे त्याला काही करता आले नसते आणि येतही नव्हते.


आंघोळ वैगेरे करून किरण बाहेर आला किशोरकडे बघून त्यानेही रोजचेच पण टापटीप दिसतील असे कपडे परिधान केले. आता किशोरने त्याला फराळाच्या पिशवीत असलेले एक कारीठ देऊन डाव्या पायाच्या अंगठ्याने फोडायला सांगितले. कारीठवर अंथा दाबताच ते फुटून त्याच्या बिया बाहेर आल्या त्यातली एक बी किशोरने सांगितले तसे आपल्या कपाळावर लावली. 

' काय रे किशोर असे कितीतरी सण दर महिन्याला येतात, सगळेच साजरे करतोस की काय ? ' किरणचा हा प्रश्न ऐकून त्याने किरणला समोर खुर्चीवर बसायला सांगितले. किरण हे बघ तू म्हणतोस तसे आपल्या भारतात अनेक सण आहेत टी आपली संस्कृती आहे. त्यामुळे साजरे करणे यात काही गैर नाही. मी तुला सर्व सणांचे महत्त्व सांगतो. 

आपल्याला आजही किशोरकडून काहीतरी महत्त्वाची माहिती मिळणार म्हणून तो त्याच खुर्चीवर थोडा सावरत बसत ' हो सांग मला जाणून घ्यायची आणि समजून घ्यायची खूपच इच्छा आहे.'


किशोरने सांगण्यास सुरवात केली...

माणूस जन्माला येतो तेव्हापासूनच सण चालू होतात. आपण ज्यावेळी या जगात जन्म घेतो त्याच वेळी आपल्या आईसाठी तो दिवस एका सणासारखाच असतो. तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आई होण्याचा जोणानंड असतो तो त्या मौलिसठी एक सणच असतो. घरातले सर्व आनंदी होतात आणि मूल जन्माला आले म्हणून मिठाई किंवा गोड पदार्थ एकमेकांना वाटून तो आनंद साजरा करतात. हा सुध्दा एक सण असतो.


तसं पाहिलं तर सणांशिवय आपले आयुष्य व्यर्थ आहे असेच म्हणावे लागेल. कारण आपल्या जीवनात सणांचे महत्व खूप मोठे आहे. पूर्वजांनी जी काही सणांची रचना म्हणा किंवा त्यांचा कालावधी आहे तो अगदी विचारपूर्वक केलेला आहे. कोणत्या ऋतूत कोणता सण करायचा आणि त्यावेळी कोणते पदार्थ आपल्या आरोग्याला हितकारक आहेत याची केलेली योजना खरंच योग्य प्रकारे आहे.

आपण व्यवस्थित लक्ष देऊन दिनदर्शिकेत पाहिलं तर प्रत्येक महिन्याला आणि प्रत्येक हंगामात हे उत्सव उत्साहात, साजरे करून माणूस सुखी, एकोप्याने, उल्हसात व आनंदाने राहू शकतो. 


आपल्या भारतात मानले गेलेले सण-उत्सव आपल्या संस्कृतीचे एकप्रकारे प्रतीक आहेत. 

🔷दसरा साजरा करीत असताना अन्यायाला मूठमाती देऊन न्यायाच्या बाजूने उभे राहण्यास आपल्याला हा दसरा समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत असतो. याच्या दुसऱ्या बाजूने विचार केला तर कोणीही किती पराक्रमी, सर्वशक्तिमान असेल तरी त्याच्याकडून घडलेल्या एका चुकीमुळे त्याचा पराभव होऊ शकतो. मुंबईच्या ठिकाणी आणि सध्या गावच्या ठिकाणीही जवळ जवळ सगळीकडेच नवरात्र उत्सव साजरा केला जातो. या नवरात्रीत राधा कृष्ण यांची एक लीला म्हणून दांडिया हा प्रकार फार प्रचलित आहे. सर्वजण मोठ मोठे गोलाकार जमा होऊन हा दांडिया प्रकार खेळला जातो. यालाच गरबा असेही म्हटले जाते.

🔷यानंतर येणारा दिवाळी सण हा त्या दिवसापासून अनेक रंगा ढंगात सजलेला असतो. दिवाळी एकप्रकारे आपल्याला ओरडुन ओरडून सांगत असते की, अंधकरातून मुक्त होऊन कायम प्रत्येकाने प्रकाशाकडे वाटचाल करायला हवी. यावेळी हरेक घरात गोड पदार्थ बनलेले असतात त्याचाच आस्वाद घेत जवळ जवळ पंधरा दिवसांचा कालावधी नटून थाटून हा दिवाळी सण साजरा केला जातो. ज्यांच्या घरी दिवाळी होत नाही किंवा त्यांना करता येत नाही त्यांच्या घरी जाऊन काही युवा वर्ग गटागटाने दिवाळीचा फराळ पोहोच करतात. आपण जो आनंद घेत आहोत तसाच आनंद या लोकांनाही घेता यावा हा यामागचा एक उत्तम आणि सामाजिक हेतू असतो.

🔷होळी सण आला की, सर्वांचे मन आणि हृदय उल्हासाने, उत्साहाने आपोआप आनंदी होते. याचे कारण म्हणजे रंगांची उधळण, नृत्याचा अविष्कार, सुमधुर असे कानावर पडणारे संगीत, लोककला जोपासणे. हे असे आपले सण आपल्याला नेहमी एकत्र जोडून, नात्यांत गुंफून ठेवण्यास मदत करीत असतात. होळीला गावाला तर मोठा उत्सव म्हणूनच साजरा केला जातो. आपल्या गावातून पालखी म्हणजेच गावच्या देवांना दुसऱ्या गावी नेऊन जणू काही देवांनाही त्या उत्सवात सामावून घेऊन खेळे, नमन, याच नमानात वेग वेगळे वगनाट्य दाखवले जाते. यातून एक पौराणिक कथा आणि त्यातून एक समाजाला संदेश दिला जातो. संकासुर हे एक चंचल तितकेच प्रेमळ पात्र पाहायला मिळते. कृष्ण अवतार, त्यांचे सवंगडी पेंद्या आणि सुदामा यांचीही कला साकारली जाते. उग्र स्वरूपात, दात विचकत हसत येणारी ताटीका आणि सीता स्वयंवराचे आमंत्रण न दिल्याने तांडव करणारे दशानन म्हणजे रावण हे पात्र अप्रतिम वठवले जाते. याचाच आनंद घेत घेत पालखी पुन्हा आपल्या गावात आली की खुणा काढणे, आणि होळीच्या दिवशी पालखीतून देवांना प्रत्येकजण स्वतःच्या खांद्यावरून नाचवतात. ही सुद्धा एक कला आहे. असा हा होळी सण अगदी अंतःकरणाने आनंदाने साजरा केला जातो.

🔷जगात भाऊ बहीण हे एक पवित्र नाते समजले जाते. लहानपणापासून बहीण आपला भाऊ सदैव आपले रक्षण करण्यास सक्षम असावा यासाठी रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. शक्य असेल तसे भाऊ बहिणीच्या घरी किंवा बहीण भावाच्या घरी जाऊन त्याच्या हातावर राखी बांधून भावाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी प्रार्थना करते. रक्षाबंधन भाऊ बहिणीच्या नात्यांतील निःस्वार्थ पवित्र प्रेम, आपुलकी याचा गौरव केला जातो.

🔷यानंतर मकर संक्रांत, महाशिवरात्री,श्रीराम नवमी, गणेश चतुर्थी हे सण आणि उत्सवही आपली संस्कृती जपत भव्यदिव्य रुपात प्रतिबिंबित करत साजरे केले जातात.


आतापर्यंत सर्व नीट ऐकून घेत असणारा किरण किशोरला मध्येच थांबवून ' मग आपल्या देशासाठी ज्यांनी बलिदान दिले त्यांचे काय ?' त्यांचे महत्त्व काहीच नाही का ?

किशोर त्याला सांगू लागला.....

🔷आपल्या भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणजेच १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, गांधी जयंती, लोकमान्य टिळक जयंती, १४ नोव्हेंबर बालदिन, असे अनेक आपले राष्ट्रीय सणही आहेत.

या सणांचा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये सुवर्ण इतिहास आहे. हा इतिहास भारतातल्या प्रत्येक नागरिकाने जाणून घेतला पाहिजे. याचा अभ्यास करायला हवा तरच अनेक हुतात्म्यांचा आणि त्यांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाचा संघर्ष कळू शकेल. यासारखे राष्ट्रीय सण आपल्या देशभक्ती आणि त्यागाचे संदेश देतात.


....... सणांच्या वेळी शाळा, महाविद्यालये सरकार कडून आदेश असल्याने त्या त्या काळात बंद असतात त्यामुळे मुलांना आपल्या कुटुंबासोबत हे सण साजरे करण्यास मिळतात. सणांच्या निमित्ताने सर्वजण काळ, दुःख विसरून , चींतांपासून मुक्त काही वेळ मुक्त होत आनंदाच्या प्रवाहात वाहत जात जीवनातला तोड काळ आनंदाने जगत असतात.

आपण जे सण, उत्सव जल्लोषात साजरी करतो हे आनंद आणि करमणुकीचे साधन असले तरी यातूनच प्रत्येक माणसाला ताजेपणा, एक प्रेरणा मुळात असते. लोकांचे मन समृद्ध, प्रसन्न, निर्मळ होते. प्रत्येकाच्या मनातून जातीवाद, प्रांतवाद घसरून जाऊन आपल्या ह्रुदयात एक सहकार्याची भावना व बंधुत्वाची भावना निर्माण होऊन अत्याचार रोखण्यासाठी पावले उचलली जाऊन देशात न्याय शांती राखण्यास प्रेरणा मिळते.


खरोखरच किशोर अगदी किरणला समजेल अशा पद्धतीने सांगत होता आणि त्यालाही या सणांचे महत्व पटत होते.

तरीही त्याने एक प्रश्न केलाच.

किशोर मग काही लोकं सणांच्या नावाखाली वर्गणी गोळा करतात आणि त्याचा गैवापर होतो यावर तुझे काय मत आहे?

किशोरला हेही त्याला समजून सांगायचे होतेच पण त्याने मध्येच थांबल्यामुळे नाही जमले.

...बघ किरण,

🔷या सणांमध्ये काही लोकं याच सणांचे पावित्र्य भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. एकत्र आल्यानंतर जुगार खेळणे, मद्यपान करणे असे अनुचित प्रकार सध्या समाजात वाढताना दिसत आहेत. यातूनच एकमेकांमध्ये वाद होऊन मारामारी पर्यंत हा वाद जातो. आपल्या सणांचे पावित्र्य राखणे हे आपले म्हणजे समाजाचेच काम असते. असे करून आपण आपल्याच सणांना गालबोट लावत असतो. हे प्रत्येकाने समजून घेऊन सण, उत्सव आनंदाने साजरे करून इतरांनाही आनंदी ठेवावे आणि स्वतःही प्रफुल्लित, आनंदी राहावे.


हे सर्व ऐकताना आता किरणलाही खूप काही समजले होते.

किशोर बोलत असताना त्याने मस्त चहा केला होता, दोघांनी हसत हसत चहासोबत आईने दिलेला फराळ खाल्ला आणि पुढच्या वर्षी असाच फराळ घेऊन पुन्हा ये. असे म्हणून दोघेही खाली फटाके फोडायला निघून गेले. दिवाळीचा दिवस दोघांनीही खूप मजेत घालवला. आजच्या रात्रीच्या जेवणाचा बेत किशोरकडे असल्याने आज आईच्या हातचे जेवण मिळणार या खुशीत किरण किशोर बरोबर त्याच्या घरी गेला. आईला भेटून त्यालाही खूप आनंद झाला. जेवण करून परतीच्या मार्गावर असताना मनातून' भारतीय सण किती महत्त्वाचे आहेत ' याचा विचार करत घरी पोहचला.

आजचा दिवस कधी विसरता येणार नाही असे स्वतःशीच पुटपुटत उद्याच्या दिवसाची सकाळ अनुभवण्यासाठी गाढ झोपी गेला.

...............


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract