STORYMIRROR

विजय वैशाली दत्ताराम पराडकर

Action Inspirational Thriller

3  

विजय वैशाली दत्ताराम पराडकर

Action Inspirational Thriller

अलक

अलक

1 min
222

कालच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत असताना, एका शिवभक्ताने महाराजांच्या चरणाशी तलवार ठेवली.

आज आपला मुलगा जेल मधुन सुटून येणार याचा आनंद शेवंतीच्या चेहऱ्यावर दिसत असूनही तिचे मन थोडे अस्वस्थ होते. खरंच त्या माऊलीला न्याय मिळाला का ? 

हा विचार सतत शेवंतीच्या डोक्यात पिंगा घालत होता. किशोर जवळ येऊन आईला मिठी मारणार तोच महाराजांच्या चरणाजवळची तलवार उचलली गेली; तलवारीची लखलखती पात सूर्याच्या प्रकाशात लकाकली आणि कुणाला कळायच्या आत किशोरच्या मानेवरून फिरून त्याचे शीर रक्ताच्या चिळकांड्या उडत धडावेगळे झाले.

आज एका आईने एका आईला आणि त्या बलात्कार पीडित मुलीला न्यायालयात न मिळालेला न्याय मिळवून दिला होता.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Action