विजय वैशाली दत्ताराम पराडकर

Tragedy Action Classics

4.0  

विजय वैशाली दत्ताराम पराडकर

Tragedy Action Classics

चित्रपट आणि त्याचे परिणाम

चित्रपट आणि त्याचे परिणाम

3 mins
197


चित्रपट आणि त्याचे परिणाम


          चित्रपट किंवा सिनेमा हा शब्द आपल्यासमोर आला की, एक भली मोठी बंद खोली, डीम लाईट, भरपूर खुर्च्या त्याही अगदी मऊ मऊ अशा, एक मोठी स्क्रीन आणि त्यावर दिसणारी त्या चित्रपटात काम करणारी माणसे. मुख्य म्हणजे स्वतःला तिथे बसून पॉपकॉर्न खाताना बघणे खूप आल्हाददायक वाटते. त्याशिवाय चित्रपट पाहण्याचा आनंद नाही असेच गृहीत धरले जाते.

परंतु हे चित्रपट बनवत असताना त्यामागची मेहनत आणि याची निर्मिती करणारी मंडळी आपल्या विचारात सहसा येत नाहीत. असो...

चित्रपट जरी करमणुकीचे साधन असले तरी त्याचा योग्य प्रकारे अभ्यास केला तर समाजात त्यातून एक संदेश जात असतो. काही लोकं याचा विचार करतानाही दिसतात, त्यावर चर्चा करतात, चित्रपटाचे समीक्षण केले जाते, वेगवेगळे विचार मांडण्याचा प्रयत्न होतो. काही सिनेमे खूप चांगले बनवले जातात पण काही सिनेमांतून इतकं अवाजवी दाखवले जाते की, समाजावर त्याचा विपरीत परिणाम दिसून येतो. म्हणूनच आपण जी कलाकृती बनवतो आहोत त्याचा परिणाम जन माणसांवर काय परिणाम होईल याचाही विचार चित्रपट निर्मात्यांनी करायला हवा.

सध्याचा विचार केला तर, मोजकेच चित्रपट बनवले जात आहेत; नाहीतर गेली पाच-सहा वर्षे मागे वळून पाहिलं तर वर्षाला जवळ जवळ ५०-६० सिनेमे तरी बनायचे. त्यातही काही चित्रपट सिनेमागृहात पोहचायच्या आधीच सपशेल आपटले जायचे परंतु जे काही तिथपर्यंत जायचे तेही फक्त वाट्टेल त्या धाटणीतले असायचे त्यामुळे थोडेफार चालायचे. 

आज भरमसाट किंवा कमीही चित्रपट नाहीत. कधी कधी कलाकारांच्या वक्तव्यावरूनही न चालणारे व तग धरू न शकणारे सिनेमे हल्लीच आपण सर्वांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले आहेत. 

पूर्वी असे नव्हते. कलाकार जितका जीव ओतून काम करायचे त्यापेक्षा ते कलाकार जास्तीत जास्त लोकांमध्ये मिसळून त्या त्या सिनेमाची योग्यता जनतेला पटवून द्यायचे. आम्ही निर्माण केलेला सिनेमा तुम्ही का बघावा आणि त्यातून काय मिळणार आहे हे सुध्दा कलाकार लोकांना स्वतः सांगायचे. म्हणूनच पूर्वी चित्रपट अजरामर व्हायचे. आज कोणी अजरामर हा शब्द जरी उच्चारला तरी त्याच्याकडे प्रश्न चीन्हांनी पाहिले जाते. याचे कारण एकच, सिनेमांचा घसरलेला दर्जा.

प्रत्येक निर्माता किंवा दिग्दर्शकाला वाटत असते, माझा चित्रपट अव्वल ठरावा. म्हणूनच समाजाचा विचार न करता अश्लील किंवा आक्षेपार्ह असेल असे चित्रीकरण केले जाते. यामुळे तरुण वर्ग जास्त खेचला जातो याची जाणीव बहुधा त्यांना असावी आणि असतेच. आज लोकांची आवड बदललेली आहे. चित्रपटात एखादा चांगला संदेश नसला तरी चालेल पण लोकांना काय आवडते याकडे निर्मात्यांचा कल जास्त असतो. कलाकार आपल्याला भरपूर करोडोंनी पैसे मिळतात म्हणून कामही करतात. त्यांचाही नाईलाज असतो म्हणा, घर चालणार कसे ? पुढच्या सिनेमात काम मिळेल की नाही याची शास्वती नसते त्यामुळे नवीन कलाकार काम करण्यास मनाई करत नाहीत.

बऱ्याच कालावधीनंतर अलीकडे ऐतिहासिक चित्रपट बनविण्याकडे सर्वांचा कल वाढलेला दिसत आहे. ऐतिहासिक सिनेमे बनवताना देखील पूर्णतः अभ्यास केलेला नाही असे कधी कधी जाणवत असते. इतिहासात काही गोष्टींची नोंद वेगळी लिहून ठेवलेली असते आणि प्रत्यक्ष चित्रपटात दिग्दर्शक स्वतःच्या मनाने काहीतरी मांडत असतो आणि प्रेक्षकांपर्यंत पोहचवत असतात. मग काही प्रेक्षकांच्या असे लक्षात आल्यावर टीकेची झोड त्यांना सहन करावी लागते. मग त्यातूनही वेग वेगळे स्पष्टीकरण देण्यात येतात. त्याचा इतिहासाशी तसा काहीही संबंध नसतो. म्हणूनच ऐतिहासिक रचना बनवताना खूप गोष्टींची पडताळणी करून नंतर त्याची निर्मिती करायला हवी.

चित्रपट हे फक्त करमणुकीचे साधन नसून समाज मनावर त्याचा परिणाम होत असतो त्यामुळे चित्रपट निर्मिती करणाऱ्या प्रत्येक माणसाने याचा विचार होऊन जनतेसमोर एक उत्तम कलाकृती सदर करावी.

✍️विजय वैशाली दत्ताराम पराडकर- आण्णा ( विरार )





Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy