संधीचं सोनं
संधीचं सोनं
परप्रातांतून आलेला एक साधा तरुण गंग्या पडेल ते काम करून पोटाची खळगी भरत होता. साऱ्या झोपडपट्टीत सर्वांचा आपला झाला होता. दोन वर्षांपासून रोज सकाळी बाहेर पडला की केेव्हाही परत यायचा. काही दिवसांपासून एक मुलगी लग्न करून आणली. मात्र कामाचे स्वरूप सांगत नव्हता. काम व रहाणीबदल घडते 'होता इतरांना मात्र मदत' सहकार्य पूर्वीप्रमाणे सुखदुःखात सहभागी व्हायचा.
एक दिवस अचानक गेला तो परत आला नाही. पोरीने पोलीसांत तक्रार दिली पण उपयोग होत नव्हता. पोलिस रोज चकरा मारीत आणि अचानक सर्वांना प्रिय आमच्या गल्लीतील आण्णा याला उचलले; सारा मोहल्ला आंदोलन 'मोर्चा; उपोषणे केली पण आण्णाला जामीन मिळाला नाही. तीस वर्षांपूर्वा अण्णा सर्वांचा प्रिय होता देवाप्रमाणे. सर्वांचा विश्वास कुणालाच काही कळेना. परप्रातांत सहा मर्डर केलेला. वॉंटेड तीस वर्षांत हाती लागला व त्याला कारागृहात पाठवले. त्याने नाव 'जात' सर्व काही बदलून आण्णाचे बुजगावणे मागे लपत होता व गरीब जनतेच्या भावनांशी खेळ खेळत होता व गंग्या दुसरा कोणी नसून गुप्तहेर पोलीस होता. त्याने आणलेली मुलगी ही मात्र निसर्ग नियमाने जवळ आलेली एक प्रेमकहाणी. सर्व माहिती गंग्याने सांगूनही प्रेम आंधळे असते. ही डोळसपणे त्याची बळी होती. गंग्या तिला घरीही नेऊ शकत नव्हता व सोडूही शकत नव्हता.
शेवटी जाताना गंग्याने तिला मोकळे करून परप्रांतात गेला. जातांना तिच्या पोटात संधीचं सोनं ठेवून गेला. मात्र मनात अपराध्याची भावना घेवून गेला .
