STORYMIRROR

Vaishnavi Kulkarni

Classics

3  

Vaishnavi Kulkarni

Classics

समृद्धी

समृद्धी

1 min
387

अंगणातील वृंदावनात बहरलेली हिरवीगार तुळस म्हणजे समृद्धी |

चौफेर दरवळणारा उमललेल्या सुमनांचा सुगंध म्हणजे समृद्धी ||


देवघरात मंद तेवत अखंड तेज पसरवणारा नंदादीप म्हणजे समृद्धी |

घरात तार स्वरात घुमणारा लेकी सुनांचा हास्यस्वर म्हणजे समृद्धी ||


गृहलक्ष्मीच्या तपश्चर्येने घरातल्या प्रत्येक

सदस्याच्या मुखावर पसरलेली असीम शांती म्हणजे समृद्धी |

दारी येणारा प्रत्येक याचक उदरतृप्तीचे

आत्मिक समाधान मिळवतो ही खरी समृद्धी ||


सात्विक गृहिणीचे तेज म्हणून भरलेली धान्याची कोठारे म्हणजे समृद्धी |

अन् कितीही शिणलेली असो ,

अहोरात्र कष्ट करून संसाराचा अवजड गाडा

हसतमुखाने लीलया पार करणारी घरातली लक्ष्मीरुपी ,

अन्नपूर्णारुपी स्त्री म्हणजेच समृद्धी ||


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics