Revati Shinde

Classics

2.5  

Revati Shinde

Classics

श्रावण श्रावण

श्रावण श्रावण

1 min
74


आषाढी अमावस्या संपते आणि श्रावणमासाच आरंभ होतो. हिंदू धर्मात श्रावण मासाला विशेष महत्त्व आहे.आणि महाराष्ट्रातही.

 श्रावण मास सुरू होताच सृष्टीत बदल दिसू लागतो. ऊन पावसाचा खेळ सुरू होतो. सारी सृष्टी हिरव्या रंगाने रंगून जाते .इंद्रधनुष्याचे नयनरम्य दर्शन होते. विविध सुंदर फुलांचे आगमन होते. सारी सृष्टी चैतन्यमय होते. "बालकवींची श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे" ही कविता आठवते .

शेतकरी राजाही सज्ज होतो.कोळी बांधवही समुद्राची पूजा करुन त्यांच्या कामाची सुरुवात करतात.

श्रावण मास व्रतवैकल्यांचा मास असतो. यावर्षी तर अधिक मास त्यात अधिक श्रावण म्हणजे पुरुषोत्तम मास. भगवान विष्णूची आराधना ,दीपदानाचे महत्त्व सांगणारा ,जावई लेकीचे कौतुक करणारा मास.

श्रावण मासात प्रत्येक वाराचे महत्त्व आहे. श्रावणी सोमवारी शिवामुठीचे व्रत.मंगळवारी मंगळागौर पूजन- खेळ,. बुधवारी पांढरे बुधवार .गुरुवारी बुधवृहस्पती पूजन ,शुक्रवारी जरा जिवती पूजन, महालक्ष्मी पूजन सवाष्णीचे महत्त्व , हळदीकुंकू गुळ चणे. शनिवारी शनि महात्म्य वाचन नरसोबापूजन, भाजीभाकरी नैवेद्य.

श्रावण म्हणजे सणावार. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी, दहीहंडी ,बैलपोळा, पिठोरी अमावस्या.

 या महिन्यात बेल,आगाडा, केनी कोंडा, तुळस,तेरडा दुर्वा या वनस्पतींना विशेष महत्त्व असते.

या महिन्यात सासूरवाशनीमाहेरची आठवण काढतात खेळ खेळतात मुली बाई झिम्मा फुगडी खेळतात झोपाळे बांधतात पूर्वी श्रावणी सोमवारला शाळेला अर्धी सुट्टी असायची त्याची खूप आठवण येते खूप मज्जा यायची

अशा तऱ्हेने निसर्गाचे वेगवेगळे पैलू उलगडणारा व्रत वैकल्यांचा, सर्वांना हवाहवासा वाटणारा श्रावण मास 


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics