Revati Shinde

Others

2  

Revati Shinde

Others

माझ्या आठवणीतले गाव

माझ्या आठवणीतले गाव

2 mins
33


"आई, मला उद्या माझ्या आठवणीतले गाव 'या विषयावर निबंध लिहायचाय, हेल्प कर ना प्लीज" मनवा दिपालीला म्हणाली. "काय माझे गाव" "हो ना" "बरंबरं" " आधी जेवून घे, थोडा आराम कर, मग आपण लिहू, "ओके ,हो चालेल ,असेही उद्या सुट्टीच आहे." मनवा जेऊन झोपली पण दिपालीला मात्र आज वामकुक्षी नको होती कारण तिला गाव,गावातील त्या सुंदर आठवणींमध्ये रमायचे होते. दिपाली चे बालपण कोकणातील एका निसर्गरम्य गावात गेले होते.

नारळी, फोफळी, ताडा ची झाडे.केळीच्या बागा,आंबा फणसाच्या ,अबोली मोगरयाच्या वाड्या.करवंद,जांबळे अशा रानमेव्याने भरलेले ते गाव. दरया, डोंगर ,बार माही वाहणारी नदी, भातशेतीने ने भरलेले कूंणगे, खळखळणारे झरे, धबधबे, ओढे आणि अथांग समुद्र आणि बोटीतील तो प्रवास .

गावातील घरेही खूप सुंदर, चिऱ्याची कौलारू. घरा समोरील सारवलेले अंगण, त्यातील तुळशी वृंदावन. कष्टाळू मायाळू माणसांनी भरलेल्या ओट्या. वरची आळी, खालची आळी,खोता ची वाडी. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे धुळीने ,लाल मातीने माखलेली लाल परी आणि तिच्या मागे पळणारी पोरं.

दिपाली ला तिच्या आजीची आठवण झाली. सकाळ झाली की ती तिची लगबग सुरू होई. तिचे बाबा तालुक्याला शिक्षक होते आजी आणि आई सकाळी स्वयंपाकाला लागायच्या. आजी गरमागरम घावणे करायची. वापळलेला चहा आणि ते खाऊन ती शाळेत जायची. शाळा पूर्ण दिवस असायची .मधल्या सुट्टीत जेवायला घरी यायचे. घाईघाईत जेवायचे आजी प्रेमाने ओरडायची"अगो दिपल्या, जरा दमान, शाळा काय खय पळान जातंली "तिचा तो मालवणी स्वर कानाला गोड वाटायचा. मच्छीचे जेवण असले की दोन घास जास्तच जायचे.

पावसाळ्यात आम्ही पण मुलं मुलं मासे पकडायला जायचो. खूप मज्जा यायची. थंडीमध्ये अंगणात रात्री शेकोटी पेटवायची आणि भुताखेताच्या गोष्टी करायच्या. झोपायला गेले की मात्र भीतीने गाळण व्हायची मग आईच्या कुशीत शिरून गप्प झोपायचे.

गणपती आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत गावामध्ये पाहुण्यांची ,चाकरमण्याची गर्दी व्हायची .सगळी भावंड एकत्र आले की धमाल असायची. गावच्या जत्रेत तर विचारूच नका. मंदिरे दे,वांच्या मुर्त्या फूलानि सजायच्या. खूप सुंदर वाटायच्या. जत्रेत खूप फिरायचे, खरेदी करायची, पाळण्यात बसायचे,गरम गरम भजी,खाजे,कुरमुरया चे लाडू खायचे, आणि फोटो काढायचे. दशावतार तर ठरलेलाच. शिमग्यात घरोघरी शंकासुर फिरायचा मुलं घाबरून माडीवर जाऊन लपायची.

दिपलीच्या गावाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे गावाला शिक्षणाचे महत्त्व पटले होते .खेडेगाव असूनही दहावीपर्यंत शाळा होती .त्यामुळे शिक्षण व्यवस्थित झाले. शिक्षण ही उच्च दर्जाचे होते . शाळेच्या आठवणी नी तिचे डोळे भरून आले. वडिलांची बदली मुंबईला झाली आणि गाव सोडावे लागले. गाव सोडताना मनाला खूप यातना झाल्या. आजी असेपर्यंत गावाशी थोडा तरी संबंध होता. आजी गेली आणि सगळे संपले. बाबांनी गावचे घर विकले आणि ते कायमचे मुंबईकर झाले.

लग्नानंतर एकदा ती गावी गेली होती.पण आता गाव बदलले होते. पायवाटा जाऊन डांबरी रस्ते आले होते. गावातले जुने चेहरे दिसेनासे झाले होते आणि नवे चेहरे अनोळखी होते. पूर्वीची ओढ आता राहिली नव्हती. पण दिपालीच्या आठवणीतले गाव मात्र अजूनही तसेच होते आणि तिला ते तसेच ठेवायचे होते .

दिपाली विचारांच्या तंद्रितून जागी झाली. पेन वही हातात घेऊन तिने लिहायला सुरुवात केली 'माझ्या आठवणीतले गाव'.


Rate this content
Log in