Revati Shinde

Others

2  

Revati Shinde

Others

श्रावण आणि शेतकरी

श्रावण आणि शेतकरी

1 min
42


श्रावण आणि शेतकरी यांचे एक वेगळेच नाते आहे. श्रावणामध्ये त्याचे दोन प्रिय सण येतात. एक नागपंचमी आणि दुसरा बैल पोळा. हे दोघेही त्याचे मित्र आहेत. नाग शेतातील घुशी ,उंदीर यांना खाऊन त्याच्या पिकाचे रक्षण करतो आणि बैल त्याला शेतीच्या कामांमध्ये मदत करतो .

प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये नागाचे देऊळ असते. नागपंचमीच्या दिवशी तो त्याची पूजा करतो आणि त्याला रक्षण करण्याची प्रार्थना करतो. 

 बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना रंगवून,झुली बांधून त्यांची पूजा केली जाते. त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. 

अशा तऱ्हेने श्रावणाची सुरुवात नागपंचमी आणि सांगता बैलपोळ्याने होते.

श्रावणातील ऊन पावसाचा खेळ त्याच्या पिकांसाठी आवश्यक  असतो.

श्रावणातील इंद्रधनुष्य त्याच्या आयुष्यामध्ये आशेचा किरण घेऊन येतो.


Rate this content
Log in