Revati Shinde

Classics

3  

Revati Shinde

Classics

माझी शाळा

माझी शाळा

2 mins
212


आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे शाळा. शाळेत असताना नेहमी वाटायचे मोठं व्हावं नोकरी करावी पण मोठं झाल्यावर, जबाबदाऱ्या आल्यावर कळलं शाळेसारखे सुख कुठेच नाही. खरंच शाळेत असताना आपण फुलपाखरासारखे असतो. किती निस्वार्थ मैत्री, प्रेम असते. शाळेबद्दल, आपल्या गुरुजनांबद्दल किती आदर असतो. 

आजही मला माझी शाळा खुप आठवते. तो वर्ग, तो बेंच ,मैत्रिणी त्या गप्पा, गोष्टी, मधली सुट्टी,खाऊचा डबा एकत्र बसुन खायचा, परीक्षेचे टेन्शन, निकालाचा दिवस ,प्रगती पुस्तक सारे सारे आठवते. शाळेच्या जवळून गेलं की तो घंटेचा आवाज कानात घुमतो. ते पाढे, कविता, राष्ट्र गीत, प्रार्थना आठवतात .

पावसाचे आणि शाळेचे तर एक अतूट नाते असते .सुट्टी संपून शाळा सुरू झाली की रेनकोट, बूट ,पुस्तके वह्या, युनिफॉर्म ची घाई. वह्या पुस्तकाना कव्हर घालायची. पूर्वी कव्हर घालताना घरी बनवलेला गोंद वापरला जाई. कधीकधी भावंडाची पुस्तक नवीन कव्हर घालून वापरायची त्यातही एक वेगळीच मजा होती. शाळेतून येताना भिजण्यासाठी मुद्दाम छत्री घरी विसरून जायचं. पण शाळा सुटायच्या आधीच आई वर्गाच्या बाहेर छत्री घेऊन उभी असायची. मन खट्टू व्हायचं पण क्षणभरच दुसऱ्या क्षणी आईबरोबर घरी जाण्यात सुरक्षित वाटायच.खाऊ साठी हट्ट करता यायचा. पाऊस वाढला की सुट्टी मिळायची. मग काय अजूनच धमाल.

शाळेतील कार्यक्रम,सहली,खेळ ,किती आठवणी.शाळेतल्या गमती जमती मुलाना सांगताना ंमन भरून येते. बघता बघता आपली मुले शाळेत जाऊ लागली. मग त्यांच्या शाळेचा तो पहिला दिवस .त्यांचे रडणे,केविलवाने चेहरे बघून आपलेही डोळे भरून येतात.का ते नाही कळत.मग त्यांचा अभ्यास घेताना,परिक्षेची तयारी करताना ,आपली भुमिका बदलते पण आठ्वणी मात्र बदलत नाहित.त्यांच्या सोबत आपलेही त्यांच्या शाळेशी नवीन नाते निर्माण होते.बघता बघता मुले मोठी होतात.आपली नातवंडे शाळेत जाऊ लागतात .सारं बदलेल्ं असतं पण शाळेशीअसलेले आपले नाते नव्याने सुरू होते अगदी अंतापर्यंत.


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics