आगळी वेगळी रक्षाबंधन
आगळी वेगळी रक्षाबंधन
"वाह! किती छान राखी आहे" अभी हातावरची राखी निहाळत म्हणाला." दादा अगदी माझ्यासारखी ना" सायली गोड हसत म्हणाली. "हो, अगदी तुझ्यासारखी आणि हो, ही तुझी ओवाळणी." "अय्या! किती छान" सायली नाजूक नेकलेस कडे पाहत म्हणाली. "वहिनी आता तू बस." "मी? "हो, अग पण" सायलीने तिला ओवाळले आणि तिच्या नाजूक हातावर राखी बांधली.
"अगं सायली आता हे काय " "वहिनी, रक्षाबंधन म्हणजे काय"" भावाने बहिणीची रक्षा म्हणजेच रक्षण करणे" "बरोबर, मग आई-बाबांच्या नंतर दादा सोबत तू ही माझे रक्षण केलेस, मला कधीच त्यांची उणीव भासू दिली नाहिस म्हणून, तिला पुढे बोलवेना. "सायली,अगं ए वेडाबाई,उगी, उगी" वहिनी तिला कुशीत घेत म्हणाली. "बरं मग मलाही तुला ओवाळणी दयावी लागेल" "वहिनी तुझा आशिर्वाद, हा मायेचा स्पर्श म्हणजेच खरी ओवाळणी,अशीच तुझी माया सदैव माझ्यावर राहू देत". "हो ग बाई, माझी गुणाची बाय ती."
"आत्या, आत्या आम्ही पण तुला राखी बांधणार" चिन्मयी आणि राजू म्हणाले. "का बरं?" "आई बाबा बाहेर गेले कि तुच आम्हाला सांभाळतेस, खाऊ देतेस गोष्टी सांगून झोपावतेस, प्रोटेक्ट करतेस, खरंच तुही आमची बॉडीगार्ड़च आहेस" आणि त्यांनी खरंच तिला राखी बांधली .सायलीने त्यांना प्रेमाने जवळ घेतले, चॉकलेट दिले.
अशा तऱ्हेने त्यांनी एक आगळी वेगळी रक्षाबंधन साजरी केली
